Aadharwad Foundation

Aadharwad Foundation The Aadharwad Foundation is a charitable organization (NGO) established to help poor farmer families. Founder & President: Shyam Wadhekar

The Aadharwad Foundation is a registered charitable Trust (NGO) established to help poor and needy farmers families, especially in the region of Marathwada in Maharashtra, without restriction to any cast, community or religion. It intends to help farmers morally, financially or in any other way, in order to prevent them from committing su***de. It provides assistance for their farming and also imm

ediate financial aid in case of medical or any other emergency. It also support education of their children and if required then provide best possible financial aid for their higher education or preparation of competitive exams. It also undertake large scale relief programs during natural disasters and pandemic situation. They are implemented sometimes jointly with Government authorities and sometimes independently but are always designed to help large number of people and for a longer period.

जिथे कमी, तिथे आम्ही !!!
10/01/2026

जिथे कमी, तिथे आम्ही !!!

धोंडीराम साळुजी निंबाळकर जालना-मंठा रोडवर अपघातग्रस्त. वैद्यकीय उपचारांसाठी अर्थीक मदत केली. गोरगरीबांवर संकट येऊच नये, ...
08/01/2026

धोंडीराम साळुजी निंबाळकर
जालना-मंठा रोडवर अपघातग्रस्त.
वैद्यकीय उपचारांसाठी अर्थीक मदत केली.

गोरगरीबांवर संकट येऊच नये, आलेच तर सोबत मदतीचे हात देखील पुढे यावेत.

आपलाच,
श्याम वाढेकर
अध्यक्ष आधारवड फाऊंडेशन, परतुर

स्वप्न पहा, मेहनत करा आणि ताकदीने झेप घ्या,तुमच्या पखांना बळ आम्ही देऊ ! कु. आरती संतोष शिंदे रा. शिंदे हातडी ता. घनसावं...
02/01/2026

स्वप्न पहा, मेहनत करा आणि ताकदीने झेप घ्या,
तुमच्या पखांना बळ आम्ही देऊ !

कु. आरती संतोष शिंदे
रा. शिंदे हातडी ता. घनसावंगी
शिक्षण: एम.बी.बी.एस. काशीबाई नवले महाविद्यालय पुणे

जेमतेम २ एकर शेती असलेल्या बापाने व्याजाने पैसे काढुन आपल्या पोरीला वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी प्रवेश मिळवून दिला आहे. मुलीची वार्षीक फिस भरण्यासाठी ‘आधारवड फाऊंडेशन’ कडुन त्यांना रु. १,००,०००/- मदत करण्यात येणार आहे. आरती आणि तिचे आई-वडील ह्यांची राहात्या घरी भेट घेऊन मदतीचा पहिला धनादेश रु. २५,००० सुपुर्द केला. यावेळी सोबत पांडुरंग नवल, विष्णु कदम, सखाराम मुजमुले, ज्ञानेश्वर वैद्य, सचीन चव्हाण, सरपंच राम शिंदे इ. उपस्थित होते.

शक्य होईल तिथे आम्ही नक्कीच मदत करु, परंतु सगळीकडे नेहमीच आम्ही उपलब्ध असु असे कदाचीत शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्या गावात गरीब-गरजवंत विद्यार्थ्यांसाठी गावातील सर्वांनी एकत्रीत येऊन दरवर्षी गावनिधी तयार करुन, त्यातून होईल तेवढ्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी.

गावकी-भावकी सोबत ‘माणुसकी’ जोडा.

आपलाच,
श्याम बाबुराव वाढेकर
अध्यक्ष आधारवड फाऊंडेशन, परतुर
https://aadharwadfoundation.org

ॲाक्सिजन बॅंक मदतबाबासाहेब मंडपे, परतूर (वय ७० वर्ष)  दिंनाक ०९ सप्टेंबर २०२५- आधारवड फाऊंडेशन, परतुर
13/09/2025

ॲाक्सिजन बॅंक मदत

बाबासाहेब मंडपे, परतूर (वय ७० वर्ष)
दिंनाक ०९ सप्टेंबर २०२५

- आधारवड फाऊंडेशन, परतुर

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर… आपला “आधारवड” !
09/08/2025

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर… आपला “आधारवड” !

उच्च शिक्षणासाठी मदत… आधारवड !!
09/08/2025

उच्च शिक्षणासाठी मदत… आधारवड !!

कर्तव्य … एक सामाजिक बांधिलकी !
09/08/2025

कर्तव्य … एक सामाजिक बांधिलकी !

मिशन सेव्ह फार्मर - मदत क्रमांक ७७बाबुलतारा ता. परतुर येथील तरुण शेतकरी राजेभाऊ देविदास काळे ह्यांनी २ जुलै रोजी गळफास ल...
04/08/2025

मिशन सेव्ह फार्मर - मदत क्रमांक ७७

बाबुलतारा ता. परतुर येथील तरुण शेतकरी राजेभाऊ देविदास काळे ह्यांनी २ जुलै रोजी गळफास लावुन आत्महत्या केली होती. त्यांच्या पश्चात एक लहान मुलगा, एक मुलगी, पत्नी आणि वयस्कर आई-वडील आहेत. कुटुंबाकडे स्वतःची फक्त १ एक्कर शेतजमीन आहे, वडील व्यसनाने ग्रासलेले, यामुळे डोक्यावर असलेले बॅंक कर्ज फेडणे शक्य होत नव्हते. हा सर्व तनाव-त्रास यांस कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले.

सदर दुर्घटनेबाबत शिवसेना तालुकप्रमुख भारतराव पंडीत, उपसरपंच दिपक रामचंद्र काळे ह्यांनी आधारवड फाउंडेशन चे अध्यक्ष श्याम वाढेकर ह्यांना फोन करुन मदतीची विनंती केली होती. त्यानुसार ‘आधारवड फाऊंडेशन’ कडुन कोषाध्यक्ष सचीन चव्हाण, शिवाजी हिवाळे ह्यांनी पीडीत कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांना रुपये दहा हजाराचा धनादेश तसेच त्यांच्या मुलांसाठी शैक्षणीक साहीत्य सुपुर्द केले. या दोनही मुलांना यापुढील शिक्षणाकरीता देखील नियमीत मदत मिळावी याकरीता ‘कर्तव्य फाऊंडेशन’ अतंर्गत दत्तक घेण्यात आले आहे.

“अनेकांच्या आयुष्यात अडचणी आहेत, पण त्यावर आत्महत्या हा उपाय होऊ शकत नाही. कारण काहीही असो, आपले कुटुंब उघड्यावर टाकु नका. दारु च्या व्यसनाधीन होऊ नका.“

- श्याम वाढेकर
अध्यक्ष आधारवड फाऊंडेशन, परतुर

‘कर्तव्य फाऊंडेशन’ च्या माध्यमातून १६५ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.‘आधारवड फाऊंडेशन’ पुरस्कृत ‘कर...
12/07/2025

‘कर्तव्य फाऊंडेशन’ च्या माध्यमातून १६५ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

‘आधारवड फाऊंडेशन’ पुरस्कृत ‘कर्तव्य फाऊंडेशन’ च्या वतीने समाजातील अनाथ, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य, विधवा-परित्यक्ता महिला पाल्य, भटके- स्थलांतरित कामगार पाल्य अशा एकूण १६५ विद्यार्थ्यांना नवीन दप्तर, पाठ्यपुस्तके, वह्या, कंपास बॅाक्स, पेन इ. आवश्यक सर्व शैक्षणिक साहित्य असलेल्या परिपूर्ण संचांचे वाटप गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांच्या हस्ते बुधवार ९ जुलै २०२५ रोजी परतुर येथे करण्यात आले आहे.

‘आधारवड’ व ‘कर्तव्य’ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्याम वाढेकर ह्यांचे आई-वडील गयाबाई वाढेकर आणि बाबुराव वाढेकर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच लालबहादूर शास्त्री परतुर विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. के. बिराजदार, जि. सदस्य. भागवत उफाड, गटसमन्वयक कल्याण बागल, पत्रकार संघ परतुर अध्यक्ष श्यामसुंदर चितोडा, पत्रकार अजय देसाई, हनुमंत दवंडे, जैस्वाल इ. देखील विशेष अतिथी म्हणुन उपस्थिती होते. ह्या सर्वांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना आपापल्या अनुभवातून अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

वर्ष २००७ ला श्याम वाढेकर ह्यांनी स्थापन केलेल्या ‘कर्तव्य फाऊंडेशन’ च्या माध्यमातून प्राथमिक आणि नंतर पुढे वर्ष २०१६ पासुन ‘आधारवड फाऊंडेशन’ च्या मदतीने उच्च शिक्षण पुर्ण करुन आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात यश संपादन केले आहे. त्यामुळे फक्त त्यांचे स्वतःचे नाही तर त्यांच्या संपुर्ण कुटुंबाच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी समाजातील मुलगी डॅा. आशाताई भुरके हिने MBBS वैद्यकीय पदवी शिक्षण चालु वर्ष २०२५ मध्ये पूर्ण केले आहे. त्यापुर्वी परतुर येथील भाजीपाला विक्रेता कुटुंबातील राहुल भोकरे ह्याने नागपूर येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिक्षण पुर्ण केले आणि तो सध्या पुणे शहरात एका नामांकित IT कंपनीत कार्यरत आहे. जालना शहरातील एका घरसुरक्षा कामगाराच्या कुटुंबातील डॉ. शिवानी भुतेकर हिने देखील आपले BHMS शिक्षण पुर्ण केले आणि सध्या जालन्यातील नामांकित हॅास्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा देत आहे. परतुर तालुक्यातील दैठणा गावातील प्रिती सवने, पिंपळी धामनगाव येथील प्रिती कौठाळे, दहीफळ भोंगाणे येथीस राहुल सातपुते ह्यांनी देखील आपले डिप्लोमा शिक्षण पुर्ण केले आहे.

आज रोजी देखील ‘आधारवड फाऊंडेशन’ च्या सहाय्याने अर्थीक दुर्बल कुटुंबातील अमोल शिंदे (गोळेगाव), सुरेखा सोळंके (सोयंजना), वैष्णवी पवार (लिंगसा), लहुराज खंडागळे (तोरणा), सुग्रीव गाडेकर (वाहेगाव सोपारा), धनश्री जाधव (संभाजीनगर), रुतुजा घोडके (डोल्हारा) अशा एकुण ०७ विद्यार्थ्यांचे उच्च पदवी अथवा डिप्लोमा चे शिक्षण सुरळीतपणे सुरु आहे.

राष्ट्र उभारणीत ‘शिक्षण’ हे महत्वाचे साधन असून या राष्ट्र कार्यासाठी ‘कर्तव्य’ आणि ‘आधारवड’ फाऊंडेशन मागील १९ वर्षापासून निःस्वार्थपणे योगदान करीत आहे.

संस्थेचा हा १९ वा वार्षीक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘आधारवड’ व ‘कर्तव्य’ फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष सचिन चव्हाण आणि संस्थेचे विभागप्रमुख-सदस्य संतोष खंडागळे, भानुदास टिप्परकर, सचिव देवीदास कर्हाळे, माऊली गुंजकर, शिवाजी हिवाळे, अविनाश जगताप, नितीन मुजमुले, दत्ता कोरडे, अनंत देशमुख, योगेश कपाळे यांनी परिश्रम घेतले.

- आधारवड फाऊंडेशन, परतुर

भारत साहेबराव खरात रा. कोरेगाव ता. परतुर हे मागच्या काही वर्षांपासून (पॅरालिसीस) दिर्घ आजाराने त्रस्त आहेत. परतुर ला त्य...
08/06/2025

भारत साहेबराव खरात रा. कोरेगाव ता. परतुर हे मागच्या काही वर्षांपासून (पॅरालिसीस) दिर्घ आजाराने त्रस्त आहेत. परतुर ला त्यांचा फोटोग्राफी चा छोटा व्यवसाय होता, आजारामुळे तो बंद पडला. स्वतः ची शेतजमीन देखील नाही. नियमीत वैद्यकीय उपचार आवश्यक असल्याने सध्या ते पत्नीसोबत जालना येथे रुम भाड्याने घेऊन राहात आहेत.

मीनाक्षी खरात (पत्नी) ह्यांनी आधारवड फाऊंडेशन कडे मदतीची विनंती केली होती. त्यानुसार संस्थेचे स्थानिक सदस्य सखाराम मुजमुले, कल्याण बागल ह्यांनी भारत व मीनाक्षी खरात यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपुलकीने तब्बेतीची विचारपुस केली आणि वैद्यकीय औषध-उपचार चालु राहावे करीता रु. १०,००० तातडीची मदत सुपुर्द केली आहे.

‘आधारवड’ ला शक्य असेल तिथे आणि शक्य आहे तेवढी मदत नेहमीच करीत आहोत, पुढेही करत राहु. परंतु गावखेड्यातील माणसाच्या संकटसमयी त्याचे मित्र-परीवार, व्यवसायिक सहकारी, गावकरी ह्यांनी देखील स्वतःहुन मदत करायला हवी. आज त्याच्यावर संकट ओढावले आहे, उद्या तुमच्यावर पण तशीच वेळ येऊ शकते, हे ध्यानात ठेवुन वागणुक करावी.

“माणुसकी जपायला शिका”.

आपलाच,
श्याम वाढेकर
अध्यक्ष आधारवड फाऊंडेशन, परतुर

आमची ‘आशाताई’ डॅाक्टर झाली !डॅा. आशाताई बाबुराव भुरकेरा. भुरक्याची वाडी, ता. कळमनुरी जि. हिंगोली
04/05/2025

आमची ‘आशाताई’ डॅाक्टर झाली !

डॅा. आशाताई बाबुराव भुरके
रा. भुरक्याची वाडी, ता. कळमनुरी जि. हिंगोली

वर्ष २००७ पासुन आम्ही ‘कर्तव्य फाऊंडेशन’ व ‘आधारवड फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थांच्या माध्यमातुन शेकडो मुला-मुलींना प्राथम...
26/04/2025

वर्ष २००७ पासुन आम्ही ‘कर्तव्य फाऊंडेशन’ व ‘आधारवड फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थांच्या माध्यमातुन शेकडो मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मदत, उच्च शिक्षणासाठी ठोस अर्थसहाय्य, गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी तातडीची अर्थीक मदत, मोफत ॲाक्सिजन मशीन पुरविणे, घर जळाले-पावसामुळे कोसळले अशा दुर्दैवी परिस्थितीत गरीब कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी अर्थसहाय्य, विधवा महिलांचे पुनर्वसन, खेड्यातील जि.प. शाळांचे नुतनीकरण इ. अनेक विषयांवर नियमीत-अविरतपणे काम करीत आहोत.

वर्ष २०२०-२०२१ दरम्यान कोविड काळात स्थानिक प्रशासनासोबत ‘कोविड केअर सेंटर’ उभारले, लॅाकडाऊन काळात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला, खेड-चिपळूणच्या महापुरातील आपत्तीग्रस्तांना घरपोच मदत असे अनेक मोठे सार्वजनिक उपक्रम देखील राबवले होते.

आमच्या संस्थेने वर्ष २०२४-२०२५ दरम्यान केलेल्या मदतकार्य पैकी काही ठळक गोष्टींचा सारांश आपल्या माहितीस्तव सादर करीत आहोत.

१५७ विद्यार्थ्यांना प्राथमिक शैक्षणिक मदत
०८ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य
०३ रुग्णांना उपचारांसाठी तातडीचे अर्थसहाय्य
०२ कुटुंबाचे पुनःर्वसन करण्यासाठी मदत
०७ रुग्णांना ॲाक्सिजन बॅंक सेवा
०२ शाळांना रोख पारितोषिके, ०१ नुतनीकरण अर्थसहाय्य

आपलाच,
श्याम बाबुराव वाढेकर
संस्थापक अध्यक्ष
कर्तव्य-आधारवड फाऊंडेशन, परतुर

Address

Partur
431501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadharwad Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aadharwad Foundation:

Share

About Aadharwad Foundation

'आधारवड फाउंडेशन' म्हणजे समाजाप्रती आपल्या 'कर्तव्य' ची जाण असलेल्या स्वयंसेवी युवकांची शासकीय नोंदणीकृत समाजसेवी संस्था (NGO). 'आधारवड' अनाथांचा, गोरगरिबांचा...आधारवड संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांचा ! 'आधारवड फाउंडेशन' ची स्थापना 'कर्तव्य फाउंडेशन' चे अध्यक्ष श्री श्याम वाढेकर (ता. परतूर जिल्हा जालना) यांनी केलेली आहे. वर्ष २००७ पासून दरवर्षी 'कर्तव्य फाउंडेशन' मराठवाड्यातील २०० पेक्षा अधिक अनाथ, अपंग, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करत आहे. परंतु ग्रामीण भागातील लोकांच्या, विशेषतः शेतकरी बांधवांच्या शिक्षणाशिवाय इतरही बर्‍याच अडचणी आहेत. शिक्षणाव्यतरीक्त त्या सर्व अडचणींवर मदत कार्य करण्यासाठी 'आधारवड फाउंडेशन'ची स्थापना करण्यात आली आहे.

# संस्थेचे ध्येय आणि उद्देश : 'आधारवड फाउंडेशन' मराठवाड्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोर-गरीब लोकांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असते. परंतु विशेष करून आत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी, त्यांच्या विधवा पत्नी व मुलांना मानसिक तथा आर्थिक आधार देण्यासाठी ही संस्था प्रामाणिक पणे काम करत आहे. दरवर्षी काही निवडक आत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेतीसाठी मोफत नांगराणी, बी-बियाणे, खत, किटनाशक औषधी ई. मोफत पुरवले जातात. शेतकरी बांधवांच्या पत्नीला पती च्या मृत्यू नंतर येणार्‍या पहिल्या शेती हंगामासाठी पैसे व्याजाने अथवा उधार न आणता पीक लागवड करता यावी आणि त्यातून आलेल्या उत्पन्नातुन घर गाडा पुन्हा सुरळीत करता यावा यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न केल्या जातो. सर्व सामान्य शेतकरी बांधवांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून 'कृषि मार्गदर्शन शिबीर' व 'शेती विषयक चर्चा सत्र' चे नियमीत आयोजन करण्यात येते.

ग्रामीण भागातील गोर-गरीब कुटुंबांना (विशेषतः वृध व अनाथ, निराधार व्यक्ती) त्यांच्या दीर्घ-आजार, शस्त्रक्रिया, अपघात / दुर्घटना तसेच नैसर्गिक / अनैसर्गिक आपत्ती (उदा. घर जळने, कोसळने) ई. वेळी शक्य होईल तेवढी तातडीची आर्थिक मदत देण्यात येते. संस्थेची ओळख आणि संपर्क वापरुन गोरगरिबांना हॉस्पिटल कडून जमेल तेवढी कमी खर्चात उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न केले जातात. ग्रामीण भागात 'मोफत आरोग्य शिबीर' आयोजन करून विविध शासकीय योजनांमधून उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

रस्त्यावर जीवन व्यतित करणारे अनाथ-बेघर मुले, भिकारी, मती-मंद अश्या लोकांना देखील निदान एक वेळचे अन्न मिळावे म्हणून प्रयत्न केला जातो. तसेच त्यांच्यातील जमेल तेवढ्या लोकांना काही सोपे/लहान काम (उदा. बूट-पोलिश, रेल्वे मधे खाद्य पदार्थ किंवा इतर साहित्य विकणे) उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. दिवाळी सारख्या प्रमुख सणासुदी दरम्यान त्यांना मिठाई, नवीन कपडे वाटप करून त्यांच्या समवेत हसून खेळून त्यांच्या जीवनात जमेल तेवढा आनंद भरून देण्याचा प्रयत्न संस्थेकडून केल्या जातो.