01/12/2025
....लायन्स क्लब परभणी मेन व देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
मराठवाडा स्तरीय महा आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून २५५ हून अधिक नागरिकांनी घेतला मोफत वैद्यकीय सेवा व विविध तपासण्यांचा लाभ....
शकुंतला रामराव गबाळे सोशल फाऊंडेशन, परभणी, समर्पण चॅरिटेबल फाऊंडेशन, परभणी व इंडीयन मेडीकल असोशिएशन.परभणी यांच्या सहकार्याने व
लायन्स क्लब परभणी मेन व देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
मराठवाडा स्तरीय महा आरोग्य शिबिर रविवार दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाले.... मराठवाडाच्या दुष्काळग्रस्त भागातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने संभाजी नगर, पुणे,मुंबई, नांदेड सह परभणीतील धन्वंतरीचा वरदहस्त, चरक ऋषींचे ज्ञान अन सुश्रुताचे शल्यकौशल्य प्राप्त झालेले तसेच सामाजिक भान व दायित्वाची जाणीव असलेले
डॉ.सदानंद पटवारी (ह्दय व रक्तवाहिन्या शल्यचिकित्सक), डॉ.एकनाथ गबाळे ( मेंदू व मज्जातंतू शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ.राहुल टेंगसे (मुत्रपिंड प्रत्यारोपण तज्ञ), डॉ. अहमद झबीह (सांधेरोपण तज्ञ), डॉ.अमोल जाधव (यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक), डॉ.निकेत मंत्री (रक्ततज्ञ आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण तज्ञ), डॉ.संदिप वानखेडे (कॉर्निया (बुबुळ) प्रत्यारोपण तज्ञ), डॉ. सुशांत चौधरी
(हात प्रत्यारोपण आणि प्लास्टिक शल्यचिकित्सक),
डॉ.राहुल केंद्रे (फुफ्फुस प्रत्यारापण तज्ञ), डॉ.निखील राणे (छाती शल्यचिकित्सक )
डॉ.राहुल राठोड (कर्करोग शल्यचिकित्सक), डॉ. स्नेहा राऊत (किरणोपचार कर्करोग तज्ञ) या वैद्यकीय तज्ञांनी मेंदूची शस्त्रक्रिया, कॉर्निया (बबुळ) ट्रान्सप्लांट, कार्डियाक सर्जरी, थोरँसिक सर्जरी, हिप व गुडघा प्रत्यारोपण, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लाट ट्रान्सप्लांट, हिमॅटोलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हात प्रत्यारोपण आणि प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर संबंधी शस्त्रक्रिया, कॅन्सर रेडियेशन, फुफ्फुस (लंग्स) ट्रान्सप्लांट या आजाराविषयी आपली उत्कृष्ट सेवा दिली....
या ठिकाणी डॉ. बालाजी इप्पर, वैद्यकीय अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी परभणी कक्ष प्रमुख व डॉ. संदीप गाडेकर, जिल्हा समन्वयक, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून विविध शासकीय वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी संदर्भात स्टॉल लावून मार्गदर्शन करण्यात आले....
देवगिरी हॉस्पिटलचे डॉ.एकनाथ गबाळे यांनी अश्या मोफत महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध तपासण्या, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व औषधोपचार मिळतात. अशा शिबिरांमुळे आरोग्य तपासणीबाबतची सवय निर्माण होते आणि रोग वेळेत निदान होऊन उपचार होण्यास मदत मिळते त्यामुळे असे शिबिर प्रत्येक तीन महिन्यात आयोजित करण्यात येईल व जास्तीत जास्त गरजू रुग्णांना याचा लाभ मिळेल अशी आशा व्यक्त केली.
लायन्स क्लब परभणी मेनचे झोन चेअर पर्सन ला. अरुण (अवि) टाक यांनी प्रस्तावना करताना समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बालक अथवा युवकांच्या आरोग्या सोबतच ज्येष्ठांचे आरोग्य सुद्धा खूप महत्वाचे असून अशा विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लायन्स क्लब परभणी मेन यांना विविध स्तरांमधील रुग्णांसाठी काम करण्याची संधी प्राप्त झाली, अशा मोफत आरोग्य तपासणी शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होतात. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हे शासनासोबतच लायन्स क्लब यांचा सुद्धा उद्देश असून यासाठी सातत्याने विविध हॉस्पिटल सोबत मोफत आरोग्य तपासणी शिबिरासोबतच इतर वेगवेगळे विविध उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली.
शिबिराच्या यशस्वितेसाठी देवगिरी हॉस्पिटलचे डॉ. अमिताभ कडतन सोबतच संपूर्ण चमुचे विशेष सहकार्य लाभले या सोबतच ला. नितीन पारवेकर अध्यक्ष, लायन्स क्लब परभणी मेन, ला. प्यारअली लालानी, ला. असलम जिवानी, ला . अनिल कानसुरकर, ला. डॉ. रामेश्वर रोडगे, ला. विजय श्रीमाळी, ला. शैलेश मल्होत्रा यांच्या सहयोगाने ला. सुहास बिडकर, ला. हैदर अली जिवानी, ला. गणेश रुद्रवार, ला. सुधाकर अंदोले, ला. सुशील गवते, ला. दीपक पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले.