07/09/2026
🚀 #लेकरांच्या_डोळ्यांत #आकाश_पेरणारा_उपक्रम! . .काही उपक्रम केवळ उपक्रम राहत नाहीत; ते मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे क्षण बनतात. राज्यमंत्री श्रीमती मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती, सेलूच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन, अहमदाबाद येथे अभ्यास सहलीची मिळालेली संधी हा असाच स्वप्नांना पंख देणारा उपक्रम आहे. गावाकडच्या लेकरांनी पुस्तकात वाचलेले रॉकेट, उपग्रह आणि अंतराळविश्व आता प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळत आहे. या उपक्रमामागे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणारे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची दृष्टी निश्चितच कौतुकास्पद आहे.
सहल संपेल, बस पुन्हा गावाकडे परतेल; पण एखाद्या लेकराच्या मनात आज पेटलेली जिज्ञासेची ठिणगी कदाचित आयुष्यभर तेवत राहील. आज रॉकेट पाहणारे एखादे मूल उद्या विज्ञानाचा ध्यास घेईल, एखादा प्रश्न विचारेल
“मीसुद्धा अंतराळ संशोधन करू शकतो का?”
. आणि कदाचित याच प्रश्नातून उद्याचा एखादा वैज्ञानिक जन्माला येईल! योजना जेव्हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत स्वप्ने निर्माण करतात, तेव्हाच त्या खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या योजना ठरतात. या विद्यार्थीकेंद्रित, प्रेरणादायी आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रमासाठी पंचायत समिती, सेलूचे सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक आभार! 🚀