16/07/2026
मेळघाटातील अनेक आदिवासी बांधव आर्थिक अडचणीमुळे हेल्मेट खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे रस्ते अपघातांमध्ये अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळतो.
या पार्श्वभूमीवर सहाय्य फाऊंडेशन तर्फे “एक हेल्मेट – एक जीव सुरक्षित” या उपक्रमांतर्गत मेळघाटातील गरजू आदिवासी विद्यार्थी, शेतकरी, महिला, युवक आणि दुचाकी चालकांना ISI मानांकित हेल्मेटचे मोफत वाटप तसेच रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
🙏 या सामाजिक उपक्रमासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.
आपले छोटेसे योगदान एखाद्याचा जीव वाचवू शकते.
💰 आपण असे योगदान देऊ शकता :
🪖 ₹500 – 1 हेल्मेट
🪖 ₹2,500 – 5 हेल्मेट
🪖 ₹5,000 – 10 हेल्मेट
❤️ किंवा आपल्या इच्छेनुसार कोणतीही देणगी.
📲 पोस्टमध्ये दिलेला QR Code स्कॅन करून देणगी द्या.
चला, मेळघाटातील प्रत्येक दुचाकी चालकाच्या सुरक्षिततेसाठी हातभार लावूया.
“आपली छोटी मदत… कोणाचातरी जीव वाचवू शकते!” ❤️