18/05/2025
कार्यकर्ता नोंदणी अभियान
झुंझार माहिती अधिकार कार्यकर्ते मित्रहो,
पारदर्शक आणि उत्तरदायी शासन प्रशासन असावे यासाठी माहिती अधिकार कायदा वापरणे तसेच इतरांनी वापरावा म्हणून सहकार्य करणे, एकमेकांना विधायक मदत करणे,महाराष्ट्र भर जागरूक आणि माहितीगार कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करणे या साठी आपण
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही संघटना चालवीत आहोत. ही आपली संघटना मोठी करणे, सतत नवीन कार्यकर्ते जोडणे हे कार्य सुद्धा करणे हे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. गेल्या वर्षी अभियानात सर्वांनी मिळून ६०० नवीन कार्यकर्ते जोडले होते. या वर्षी मागील विक्रम मोडून नवीन विक्रम निर्माण करू
आता १५ मे ते १५ जून २०२५ या ३० दिवसाच्या कालावधी मध्ये आपण कार्यकर्ता नोंदणी अभियान राबवत आहोत. आजपासून पुढे तीस दिवस अगदी एका कार्यकर्त्याने एक कार्यकर्ता जोडला तरी हजारो कार्यकर्ते जोडले जातील.
या पुढील ३० दिवसात जे कार्यकर्ते सर्वाधिक कार्यकर्ते जोडतील त्यांचा लवकरच आयोजित होणाऱ्या अधिवेशनात सर्वोत्तम कार्यकर्ता पुरस्कार देवून सत्कार केला जाईल.
संघटना वाढविणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून तुम्ही ती पार पाडाल हा विश्वास आहे.
सुभाष बसवेकर
संस्थापक अध्यक्ष
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ,