पलूस वैशाख वैद्य त्रयोदशी या दिवशी पलूस गावची 3 दिवसाची यात्रा भरते. सदरची यात्रा पलूस तालूक्यातील सर्वात मोठी यात्रा असल्याने सदरच्या यात्रेला खुप मोठया प्रमाणात नागरिक व भाविकांची गर्दी असते, यात्रेमध्ये मोठमोठे पाळणे व लहान मुलांच्या मनोरंजनासाठी डीजनिलॅंन्ड सारखी खेळणी व कुस्त्या, बैलांच्या शर्यत, लोकनृत्य अशा व अन्य मनोरंजनापर कार्यक्रमांनी यात्रेचा कार्यक्रम भरगच्च असा असतो सदरच्या यात्रेमध्
ये कोटयावधी रुपयांची उलाढाल होत असते.
पिकांची फळबागांची माहिती–
गावाला प्रमुख व्यवसाय शेती आहे. यामध्ये ज्वारी, ऊस, गहू, हरभरा, सोयाबीन, शाळू या सारखी पारंपारिक पिके व ग्रिनहाऊस पॉलिहाऊस याद्वारे कार्नेशन जर्बेरा गुलाब निशीगंध व इतर फूलशेती मोठया प्रमाणावर केली जात आहे.
तसेच गावामध्ये द्राक्षे, आंबा, पेरु, चिकू, नारळ या फळपिकांची मोठया प्रमाणावर शेती केली जाते. गावाला उत्पादीत फळांसाठी पुणे मुंबई तसेच दिल्ली सारख्या राज्यांमधून मोठया प्रमाणात मागणी आहे.
तसेच गावाला पाण्याची पाण्याची पुरेशी सोय उपलब्ध असल्यामुळे टोमॅटो, कोथंबीर, कोबी, ढोबळी, मिरची, मेथी, मिर्ची यासारख्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते.
शेतकयांमध्ये मार्केटींगविषयी निर्माण झालेल्या जागरुकतेमुळे परदेशालाही फळे, भाजीपाला व फुले मोठया प्रमाणात पाठविण्यास सुरुवात झाली आहे.