सह्याद्री प्रतिष्ठान पालघर जिल्हा

  • Home
  • India
  • Palghar
  • सह्याद्री प्रतिष्ठान पालघर जिल्हा

सह्याद्री प्रतिष्ठान पालघर जिल्हा घेतला वसा दुर्गसंवर्धनाचा...

!! सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र कडून वर्षभर राबविण्यात येणारे उपक्रम आणि मोहिमा !!
!! सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत १६९ दुर्गसंवर्धन मोहिमा महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरील राबविल्या आहेत. !!
!! सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून ६९० दुर्गदर्शन मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. !!
!! छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रसार होण्यासाठी द

रवर्षी ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी शिवजन्मभूमी जन्मतीर्थ किल्ले शिवनेरी ते दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ किल्ले रायगड अशा ५ दिवसांच्या भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करून त्यावर आधारित शिवरथ या माहितीपटाची निर्मिती करून संपूर्ण महाराष्ट्रभर या सोहळ्याचा प्रसार होण्यासाठी मोफत सी डी चे वितरण केले जाते. !!
!! हे हि नसे थोडके म्हणून प्रतिष्ठान तर्फे सततचा पाठपुरावा पत्र, निवेदने यामार्फत महाराष्ट्र सरकारकडे केला जातो. !!
!! गड-किल्ल्यांच्या बाबतीत उदासीन पुरातत्व खाते तसेच झोपेचे सोंग घेणारे महाराष्ट्र सरकार यांना जागे करण्यासाठी शिवदुर्ग अस्मिता आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शने, उपोषणे, जेलभरो, रास्तारोको अशा आंदोलनातून जनजागृती करण्याचे प्रयत्न केले जातात. !!
!! महाराष्ट्रातील ४०० किल्ल्यांचे संवर्धन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सह्याद्री प्रतिष्ठान कायदेशीर लढा देत आहे. या जनहित याचिकेवर सरकारने मुंबई उच्च न्यायालयात १२ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करत महराष्ट्रातील ४६ गड-किल्ले यांच्यासाठी ४७ कोटी मंजूर केले आहेत. !!
!! सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या साथीने दुर्गसंवर्धन कार्यात तसेच आंदोलन साठी सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, प्रतिष्ठान, ग्रुप यांना सह्याद्री विशेष सन्मान, सह्याद्री पुरस्कार, शिवदुर्ग अस्मिता पुरस्कार, शिवरथ पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यात येते.
!! छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेकडून भक्ती शक्ती उद्यान निगडी पुणे ते रौद्रशंभो जन्मभूमी किल्ले पुरंदर असे स्वाभिमान यात्रेचे आयोजन करण्यात येते. !!
!! महाराष्ट्रातील ४०० किल्ल्यांचे ४५००० फोटोंचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेलं प्रदर्शन अगदी मोफत भरविले जाते. यापुढेही अजून एक पाऊल टाकत सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र हि संस्था येत्या वर्षभरात भारत देशातील ८०० किल्ल्यांच्या २ लाख छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून त्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नोंद करण्याचा संस्थेचा मानस आहे. !!
!! शिवप्रेमी व दुर्गप्रेमी यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र, गड-किल्ल्यांचे महत्व, दुर्गसंवर्धन कार्याची ओळख आणि गरज यांसारखे विषय समजून देण्यासाठी प्रसिद्ध इतिहासकारांची व्याख्याने व मार्गदर्शन असे अनेक उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र कडून राबविण्यात येत आहेत. !!
!! गड-किल्ल्यांची माहिती असलेली www.sahyadri pratishthan.com हि वेबसाईट तसेच, विविध पुस्तके प्रतिष्ठानकडून प्रकाशित करून ती दुर्गप्रेमींना मोफत वितरीत केली जातात. !!
!! सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन प्रतिष्ठानकडून आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरणविषयक कार्यक्रम असे अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात. !!
!! महाराष्ट्राच्या इतिहासात एक पाऊल पुढे टाकत एक नवीन इतिहास घडविण्याचा पराक्रम सह्याद्री प्रतिष्ठानने केला आहे, तो म्हणजे दुर्गसंवर्धन चळवळ या विषयवार १२ पोवाड्यांची निर्मिती आणि प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान याचे रेकॉर्डिंग करण्यात आले असून त्याच्या सी डी अगदी माफक दारात दुर्गप्रेमींना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. !!
!! छत्रपती संभाजी महाराजांची जन्मनोंद शालेय पाठ्यपुस्तकात व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आले होते. सन २०१४ च्या पाठ्यपुस्तकात जन्मतारखेची नोंद याचे लेखी पत्र प्रतिष्ठानला मिळाले. !!
!! सिंहगड किल्ल्यावरील कल्याण दरवाजा यासाठी यशस्वी आंदोलन मुख्यमंत्री विशेष निधीतून १ कोटी ७५ लाख मंजूर करण्यात आला. !!
!! दुर्गसंवर्धन चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावी या हेतूने प्रतिष्ठानकडून दुर्गसंवर्धन या विषयावर व्याख्यानांचे आयोजन अगदी मोफत करण्यात येत आहे. !!

!! ना नावासाठी ना स्वार्थासाठी !! जीव तळमळतो फक्त राजांच्या गड- किल्ल्यांसाठी !!

Address

Palghar

Telephone

8805143637

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सह्याद्री प्रतिष्ठान पालघर जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share