अखिल भारतीय मराठा महासंघ - महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Palghar
  • अखिल भारतीय मराठा महासंघ - महाराष्ट्र

अखिल भारतीय मराठा महासंघ - महाराष्ट्र अखिल भारतीय मराठा महासंघ - महाराष्ट्र राज्य

🔥 *संघर्ष यशस्वी... मराठा महासंघाच्या जिद्दीला मोठे यश* 🔥*जालना जिल्हा रुग्णालयातील एमआरआय (MRI) मशीन अखेर कार्यान्वित!*...
13/05/2026

🔥 *संघर्ष यशस्वी... मराठा महासंघाच्या जिद्दीला मोठे यश* 🔥*जालना जिल्हा रुग्णालयातील एमआरआय (MRI) मशीन अखेर कार्यान्वित!*
***************************
जालना जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन धूळ खात पडलेली असताना, सामान्यांच्या हक्कासाठी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख आणि कोषाध्यक्ष अशोक पडूळ यांनी सर्वात आधी आक्रमक भूमिका घेऊन आवाज उठवला होता.
केवळ पत्रव्यवहार करून न थांबता:
✅ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.
✅ संबंधित दोषी अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.
✅ सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाला निर्णय घ्यायला भाग पाडले.
काल या मशिनचे आ. अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले! हा विजय केवळ संघटनेचा नसून प्रत्येक गरजू रुग्णाचा आहे. 🚩

*मराठा महासंघ - शब्दाला जागणारी*
*आणि हक्कासाठी भांडणारी संघटना!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

भाटघर, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखेचे उद्घाटन
04/05/2026

भाटघर, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखेचे उद्घाटन

पैठणला बागेश्वर बाबाचा निषेध करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
29/04/2026

पैठणला बागेश्वर बाबाचा निषेध करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

भोंदू बागेश्वर बाबा वर गुन्हा दाखल करा - अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्हा
29/04/2026

भोंदू बागेश्वर बाबा वर गुन्हा दाखल करा - अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करून बदनामी करणाऱ्या प्रवृत्तींना कोल्हापुरी हिसका दाखवू
29/04/2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करून बदनामी करणाऱ्या प्रवृत्तींना कोल्हापुरी हिसका दाखवू

*भोंदू बागेश्वर बाबावर गुन्हा दाखल करा*  _*अखिल भारतीय मराठा महासंघाची तक्रार*_ अकोला दि. 27: भोंदू बकवासी बागेश्वरी यां...
27/04/2026

*भोंदू बागेश्वर बाबावर गुन्हा दाखल करा*
_*अखिल भारतीय मराठा महासंघाची तक्रार*_

अकोला दि. 27: भोंदू बकवासी बागेश्वरी यांनी कुठलाही शास्त्री आधार अथवा ऐतिहासिक पुरावा नसताना छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने आज करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत भ्रामक व विकृत माहिती प्रसारित करून भोंदू बागेश्वर बाबा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्रीमती मालतीताई कायटे यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनानुसार, ऐतिहासिक तथ्यांचे जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला असून त्यामुळे विविध समाजघटकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने त्यांच्या संदर्भात असत्य किंवा भडकाऊ विधान केल्यास सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

माननीय मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनीही ऐतिहासिक विषयांवर जबाबदारीने व तथ्याधारित मांडणी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत भ्रामक माहिती प्रसारित करणे ही गंभीर बाब असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १९५, २९९, ३५३, ३५६ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६ व ६७ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदार विनायकराव पवार, संजय सूर्यवंशी, राजेश पाटील, योगेश थोरात, गजानन खराडे, अरुण खोटरे,राजेश देशमुख, श्रीकांत सरोदे, पंकज जायले, कल्पनाताई बिडवे, सिंधुताई पवार यांनी पोलिसांकडे समाजात तेढ निर्माण होऊ नये व शांतता राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनावर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह राखीताई पटेकर, मिनाताई लांडे, रश्मीताई पटेकर, काशिनाथ पटेकर, प्रदीप लुगडे, प्रवीण शिंदे,प्रफुल देशमुख, संतोष वक्ते, प्रशांत माळी, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत असे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात सोशल मीडिया जिल्हा प्रमुख सचिन पाटील गोमासे यांनी कळविले आहे.

रामदास स्वामी यांची आदिलशहास केलेली अर्जि,
27/04/2026

रामदास स्वामी यांची आदिलशहास केलेली अर्जि,

25/04/2026

नागपूर येथे बागेश्वर बाबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद आणि धांदात खोटे वक्तव्य केलें. बागेश्वर बाबांनी आपला दरबार सांभाळावं, इतिहास संशोधक होऊ नये..
जाहीर निषेध

इतिहासाच्या पुस्तकामधून मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा दाखवण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडू
12/04/2026

इतिहासाच्या पुस्तकामधून मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा दाखवण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडू

इतिहासाशी छेडछाड खपवून घेणार नाही; मराठा नकाशा पुन्हा द्या — मराठा महासंघाचा इशारानाशिकमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे...
09/04/2026

इतिहासाशी छेडछाड खपवून घेणार नाही; मराठा नकाशा पुन्हा द्या — मराठा महासंघाचा इशारा

नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे निवेदन; आंदोलनाचा दिला इशारा

नाशिक (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात अलीकडे करण्यात आलेल्या बदलांमध्ये इतिहास विषयातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज नाशिक येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांना निवेदन देण्यात आले.
महासंघाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठा साम्राज्य हा केवळ ऐतिहासिक विषय नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राष्ट्रीय अस्मितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार विद्यार्थ्यांना नकाशाच्या माध्यमातून स्पष्टपणे समजणे आवश्यक आहे. मात्र, काही इयत्तांमधून हा नकाशा वगळण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या आकलनावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता महासंघाने व्यक्त केली आहे. या निवेदनाद्वारे महासंघाने पुढील प्रमुख मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत:
शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत व स्पष्ट स्वरूपात पुन्हा समाविष्ट करावा.
डिजिटल माध्यमांद्वारे (QR कोड / ई-सामग्री) नकाशाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी.

या विषयावर तज्ज्ञ समिती स्थापन करून अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करावे.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांनी निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच, या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला.

या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, राजेंद्र शेळके, संजय फडोल, वैशाली वजे, प्रमिला पाटील, ॲड. एस. टी. राऊत, रोहिणी उखडे, सुनीता वाघचौरे, रमेश खापरे, योगेश पिंगळे, अनिल आहेर, विशाल वाकळे, मनोज चव्हाण यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

*सारथी - उच्च शिक्षण शिष्यवृत्ती*`अर्ज सादर करण्यास मुदतवाढ`सारथीकडून देशांतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा व कुणबी विद्...
22/03/2026

*सारथी - उच्च शिक्षण शिष्यवृत्ती*
`अर्ज सादर करण्यास मुदतवाढ`

सारथीकडून देशांतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. डॉ. पंजाबराव देशमुख - सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन २०२५-२६ करिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी ३० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

*योजनेबद्दल माहिती*
सारथीची डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती ही मराठा, कुणबी-मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी देशातील अव्वल २०० शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी (Post Graduation) व पीएच.डी. (Ph.D.) शिक्षणासाठी आर्थिक मदत करणारी प्रमुख योजना आहे.

यात शैक्षणिक शुल्क, वसतिगृह आणि भोजनाचा खर्च सारथी संस्थेद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केला जातो.

*योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:*
*पात्रता:* उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि मराठा, कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रवर्गातील असावा.

*शिक्षण:* नामांकित २०० संस्थांमध्ये शिक्षण (Master's Degree/Ph.D.)

*कौटुंबिक उत्पन्न:* कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ ८ लाखांपेक्षा जास्त नसावे.
*शिष्यवृत्ती रक्कम:* ट्यूशन फी, परीक्षा फी, नोंदणी फी, लायब्ररी, संगणक फी आणि वसतिगृह व भोजनाचा खर्च सारथीकडून दिला जातो.

*अर्ज प्रक्रिया:* ऑनलाइन अर्ज sarthi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून सादर करता येतात.

Address

Navalkar Lane
Palghar
400007

Alerts

Be the first to know and let us send you an email when अखिल भारतीय मराठा महासंघ - महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to अखिल भारतीय मराठा महासंघ - महाराष्ट्र:

Share