Parisar Foundation

Parisar Foundation Working In Educational, Healthcare And Environmental Sector In Maharashtra. (Estd.2018)

18/08/2026

परिसर फाऊंडेशन द्वारे प्रोजेक्ट परिशिक्षा मध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील चित्रपट, डॉक्युमेंटरी, लघु चित्रपट इ. दाखवण्यासाठी आम्ही प्रोजेक्टर साठी देणगीचे आवाहन केले होते.
श्री.उदय बटवल यांनी त्यांच्या आईंच्या स्मरणार्थ हा प्रोजेक्टर आम्हाला भेट दिला.
आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. या देणगीचा उपयोग निश्चितच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होईल.
धन्यवाद!
्रशिक्षक

13/08/2026

परिसर फाऊंडेशन आणि विश्वा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू आहेत.
आठवड्यातून दोन वेळा सराव चाचण्या घेतल्या जातात.
या सराव चाचण्यांचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे.
आम्हाला काही शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसाठी हवे आहे.
आपण सर्वांनी आपल्याला शक्य असलेले साहित्य पाठवावे,ही विनंती.

संपर्क
9405048595


11/08/2026

परिसर फाऊंडेशन

दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी लिंगनूर-कापशी ,तालुका कागल,जिल्हा कोल्हापूर येथे "Next Gen कोचिंग क्लासेस"च्या संचालिका प्रा.नीलिमा जाधव यांनी शिबिर आयोजित केले.
विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर बोलता आले, परिसर ची संकल्पना समजावून सांगितली.


10/08/2026

परिसर फाऊंडेशन आणि विश्वा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात सुरू असलेल्या दहावीच्या वर्गामध्ये सराव चाचण्या घेतल्या जातात.
या बॅचसाठीची सोळावी सराव चाचणी घेण्यात आली.


04/08/2026

परिसर फाऊंडेशन

दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी लोकसेवा विद्यालय,श्रीपत पिंपरी येथे परिशिक्षा शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिरात 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांची निरीक्षण, आकलन आणि अभिव्यक्ती क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असलेले ॲक्टिव्हिटी बेस हे शिबिर आहे.

विद्यार्थ्यांनी निरीक्षण कसे करावे, विषय समजून कसा घ्यावा,प्रश्न कसे तयार करावे, स्वतःची मते व्यक्तिगत आणि ग्रुपमध्ये कशी मांडावीत इ अनेक बाबी या शिबिरात प्रत्यक्ष अँक्टिव्हिटी द्वारे विद्यार्थ्यांना शिकविल्या जातात.
महाराष्ट्रातील अनेक शिक्षण तज्ञ आणि मानसशास्त्रद्यांनी या शिबिराचे कौतुक केले आहे.

परिसर फाऊंडेशन द्वारे हे शिबिर वर्षभर सुरू राहणार आहे. उस्मानाबाद-धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शक्य तितक्या शाळांनी या अभिनव शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही करत आहोत.


31/07/2026

परिसर फाऊंडेशन आणि विश्वा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद - धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू आहेत. या वर्गांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

27/07/2026
26/07/2026

https://youtube.com/shorts/5KSQ7_guPcg?si=cme4L6sXGUtzuZ-P

परिसर फाऊंडेशन
प्रोजेक्ट परिशिक्षा

दिनांक 25 जुलै 2026 रोजी 'पी एम श्री जिल्हा परिषद ऊर्दू शाळा, तेर,जिल्हा धाराशिव' येथे परिशिक्षा शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांची निरीक्षण, आकलन आणि अभिव्यक्ती क्षमता वाढवण्यासाठी आखलेले हे अँक्टिव्हिटी बेस शिबिर आहे.

आम्ही शाळेचे मुख्याध्यापक श्री.शहा तय्यबअली महेबूब सर, सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांचे आभारी आहोत. परिसर फाऊंडेशनचे हितचिंतक डॉ.मौला शेख सर यांचे आम्ही आभारी आहोत.

शिक्षण क्षेत्रात अत्यंत अभिनव प्रकल्प उत्स्फूर्तपणे राबवणारी ही शाळा आहे. या शाळेकडून आम्हाला अनेक गोष्टी शिकता आल्या.
मुख्याध्यापक शहा सरांची दूरदृष्टी, कर्तबगार शिक्षक व कर्मचारी तसेच प्रगल्भ,सद्गुणी विद्यार्थी यांनी ही प्रयोगशील शाळा साकारली आहे.

या शाळेत यापुढे ही आमचे उपक्रम राबवण्यास आम्हाला आनंद होईल.

24/07/2026

परिसर फाऊंडेशन

परिशिक्षा आणि परिसंधान या शैक्षणिक प्रकल्पांसाठी पुस्तके आणि वैज्ञानिक उपकरणे दान करण्याचे आवाहन करण्यात आले.
या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला आहे.

परिसर फाऊंडेशनच्या हितचिंतक शिक्षणतज्ज्ञ पुष्पा क्षीरसागर यांनी काळ लिंबाळा या गावात उभारण्यात आलेल्या ग्रंथालयातील मौल्यवान पुस्तके आम्हास भेट दिली. त्यांचे शतशः धन्यवाद !

गावचे सरपंच दिगंबर पाटील आणि ग्रंथालयाचे कर्मचारी नागू यांचे आम्ही आभारी आहोत.

या पुस्तकांचा चांगला उपयोग आजुबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल, असे प्रा.शरद पवार यांनी सांगितले.





Address

Plot No 1/1917, Jadhaowadi Road, Hanuman Chowk
Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parisar Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Parisar Foundation:

Shortcuts

Share