महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी - अधिकृत

  • Home
  • India
  • Nipani
  • महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी - अधिकृत

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी - अधिकृत बेळगाव , कारवार, निपाणी,खानापूर,बिदर , भालकिसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
🚩जय महाराष्ट्र 🚩

26/07/2025
जिजाऊंचे संस्कार अन् शिवबाची तलवार मराठीलढण्याचे बळ व मातृभूमीसाठी तळमळ मराठीतू मराठी, मी मराठी अभिजात मराठीआपण सारे मरा...
27/02/2025

जिजाऊंचे संस्कार अन् शिवबाची तलवार मराठी
लढण्याचे बळ व मातृभूमीसाठी तळमळ मराठी
तू मराठी, मी मराठी अभिजात मराठी
आपण सारे मराठी, सर्वांची ही माय मराठी..!
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव*

संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना निपाणी येते अभिवादन करण्यात आले.व्यर्थ न हो बलिदान..!१७ जानेवारी
17/01/2025

संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना निपाणी येते अभिवादन करण्यात आले.
व्यर्थ न हो बलिदान..!
१७ जानेवारी

एक नोव्हेंबर काळा दीन सीमाभाग केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 1956 पासून आजतागायत सीमा प्रश्न.रेंगाळत वेळकाढूपणा चाल...
02/11/2024

एक नोव्हेंबर काळा दीन सीमाभाग केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 1956 पासून आजतागायत सीमा प्रश्न.रेंगाळत वेळकाढूपणा चालढकल मुळे सीमा भागातील 40 लाख लोकांचे प्रश्न संस्कृती नोकरी यावर गदा येत आहे .हा हक्क मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने घटनेने दिलेला अधिकार सीमा भागाला केंद्र मिळवून देवून सोडवणूक करावी .कलम तीन नुसार भारतीय संसदेला केंद्र सरकारने पालकाची भूमिका निभावत न्याय द्यावा .बेळगाव कारवार निपाणी बीदर भालकि सह संयुक्त महाराष्ट्र याचे स्वप्न पूर्ण करावे .आमच्या हककाच्या राज्यात सामील करावे

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ! #1 नोव्हेंबर काळादिन
28/10/2024

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे !

#1 नोव्हेंबर काळादिन

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सर्वांना श्री गणेशोत्सवाच्या  मनःपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया🚩🚩🚩🚩🚩🚩
07/09/2024

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या
वतीने सर्वांना श्री गणेशोत्सवाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया
🚩🚩🚩🚩🚩🚩

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक हिंदुराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव व कारवार लोकसभा उमेदवारांना...
27/04/2024

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक हिंदुराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव व कारवार लोकसभा उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी पार पडली, यावेळी बोलताना अजितदादा पाटील म्हणाले सीमाप्रश्नाशी आम्ही बांधील आहोत याची जानीव ठेऊन, कारवार व बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडून आणण्यासाठी सर्व मराठी भाषिक लोकांनि प्रचार करून आपली ताकत दाखवायची आहे ही संधी मराठी लोकांना चालून आली आहे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत, याची जाणीव आम्हाला आहे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काम करताना, निपाणीमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला ज्यावेळी मार्गदर्शनाची आवश्यकता असते त्यावेळी महत्वाचा सल्ला आम्हाला मिळतो, मध्यवर्ती समितीने दिलेले अधिकृत उमेदवार आहेत त्यांना आमचा जाहीर पाठिंबा देण्यात आला, यावेळी आनंदा रणदिवे म्हणाले मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उभे केलेले उमेदवार निवडून आले पाहिजेत व मराठी भाषिक लोकांची ताकत कर्नाटक सरकारला समजून येणार आहे, एकझूटीने प्रचार केला तर आमचे दोन्ही निवडून येतील यामध्ये काहीच शंका नाही, ही निवडनुक मराठी भाषिकांच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे, यावेळी नेताजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यांनी सांगितले रात्र वैऱ्याची असून आताच खरी कसोटी आहे, मराठी उमेदवार निवडून यावेत अशी प्रामाणिक इच्छा आमच्या सर्वांची आहे, यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष अजितदादा पाटील, उपाध्यक्ष संतोष निढोरे, सरचिटणीस अमोल शेळके, अमर ढगे, शिवाजी पाटील, मतिवडे, कुर्ली, निपाणी, सौन्दलगा, कोगनोळी इत्यादी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते

07/04/2024

Address

Nipani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी - अधिकृत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share