30/01/2025
कृपया हे वाचा
खूप उपयुक्त !!
"वैद्यकीय महाविद्यालयात, प्राध्यापक मेडीकलच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषधशास्त्र शिकवत होते, त्यांनी खालील प्रश्न विचारला:
"वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती?"
काहीचे उत्तर: "डोक्यात ट्यूमर".
त्यांनी उत्तर दिले: नाही!
इतरांनी सुचवले: "अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे".
त्यांनी पुन्हा उत्तर दिले: नाही!
त्यांच्या प्रत्येक उत्तराच्या नकारानंतर त्यांचे प्रतिसाद येणं बंद होतं
त्यांनी सर्वात सामान्य कारण सूचीबद्ध केले ते म्हणजे
- निर्जलीकरण
हे विनोदी वाटेल; पण ते खरे आहे.
60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना तहान लागणे बंद होते आणि परिणामी, द्रव पदार्थ पिणे थांबवतात .
आणि त्यांना द्रव पदार्थ सेवनाची आठवण करून देण्यासाठी आजूबाजूला कोणीही नसते तेव्हा ते लवकर निर्जलीकृत होतात.
निर्जलीकरण गंभीर आहे आणि संपूर्ण शरीरावर परिणाम करते. यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि मृत्यू देखील ओढवू शकतो.
द्रव पिणे विसरण्याची ही सवय वयाच्या ६० व्या वर्षी सुरू होते, जेव्हा आपल्या शरीरात ५०% पेक्षा जास्त पाणी असते.
६० वर्षांवरील लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो. हा नैसर्गिक वृद्धत्व प्रक्रियेचा भाग आहे.
त्यात आणखी गुंतागुंत अशी कि जरी ते निर्जलित असले तरी, त्यांना पाणी प्यावेसे वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत संतुलन यंत्रणा फारशी काम करत नाही.
निष्कर्ष:
60 वर्षांहून अधिक वयाचे लोक सहजपणे निर्जली कृत होतात, इतकेच नव्हे तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता आहे हे जाणवत नाही.
जरी ६० वर्षांपेक्षा जास्त लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्ये त्यांच्या संपूर्ण शरीराला हानी पोहोचवू शकतात.
म्हणून येथे दोन सूचना कराव्या शा वाटतात:
१) द्रव पदार्थ सेवनाची सवय लावा. द्रवपदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळाचे पाणी, सूप आणि टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांसारखी पाणी समृद्ध फळे यांचा समावेश होतो; ऑरेंज आणि टेंजेरिन पण हे काम करतात.
महत्त्वाची गोष्ट अशी की, दर दोन तासांनी तुम्ही काही द्रव पदार्थ सेवन करावे.
हे लक्षात ठेवा !
2) कुटुंबातील सदस्यांसाठी इशारा: 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सतत द्रव पदार्थ द्या.
ते जेव्हा द्रवपदार्थ नाकारतात आणि तशा दिवसात चिडचिड करतात, अस्वस्थ दिसतात, ती निश्चितच त्यांच्या निर्जलीकरणाची लक्षणे आहेत.
तेव्हा ज्येष्ठांनी जास्तीतजास्त पाणी प्यावे
ही माहिती इतरांना पाठवावी.
*60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी आपल्या ग्रुप मध्ये जरुर शेअर करावे*
👍👍👍👍