आदिवाशी विद्यार्थी कृती समिती

  • Home
  • India
  • NAVI MUMBAI
  • आदिवाशी विद्यार्थी कृती समिती

आदिवाशी विद्यार्थी कृती समिती Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आदिवाशी विद्यार्थी कृती समिती, Nonprofit Organization, NAVI MUMBAI.

कोकण आदिवासी वसतिगृह मुला - मुलींना अत्यंत महत्त्वाची सूचनाअपर आयुक्त, ठाणे अंतर्गत सर्व शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्...
26/08/2026

कोकण आदिवासी वसतिगृह मुला - मुलींना अत्यंत महत्त्वाची सूचना

अपर आयुक्त, ठाणे अंतर्गत सर्व शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना कळविण्यात येते की,
शासनाने दिनांक 14/08/2026 चा GR मागे घेतला आहे. हा GR मागे घेणे ही आपल्या आंदोलनाची प्रमुख मागणी होती आणि ती मागणी पूर्ण झाली आहे. आपले आंदोलन हे प्रामुख्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या व विद्यार्थीहिताच्या प्रश्नांसाठी होते. तसेच अनेक विषय एकत्र न घेता आंदोलनाचा विषय मर्यादित ठेवण्याबाबत मागील बैठकीत चर्चा झाली होती.
मात्र, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग - ठाणे येथे दिनांक 31/08/2026 रोजी जाहीर केलेल्या आंदोलनाबाबत आता पुढील निर्णय घेणे आवश्यक आहे. GR मागे घेण्याची प्रमुख मागणी पूर्ण झाल्यामुळे आंदोलन मागे घ्यायचे की पुढे सुरू ठेवायचे, याबाबत सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा करून सामूहिक निर्णय घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे आज संध्याकाळी 8.00 PM वाजता Google Meet वर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सर्व वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मीटिंगची लिंक जॉईन करून आपले मत स्पष्टपणे मांडावे. आपला पुढील निर्णय विद्यार्थ्यांच्या चर्चेतून आणि सामूहिक मताने घेतला जाईल.
मिटिंग लिंक
https://meet.google.com/hef-qhkr-rmk

अध्यक्ष — आदिवासी विद्यार्थी कृती समिती
#वसतिगृह

14/02/2026

“मंच कोणताही असो… माझा आवाज नेहमी समाजातील तरुणांसाठीच आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि आयुष्यात समाधान असावे, हाच माझा खरा ध्यास आहे.” #आदिवासी

04/01/2026

“आई गावदेवी क्रिकेट संघ हेदुटने ‘बी’, कै. पांडुरंग बंडू भल्ला स्मृती चषक २०२६ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा हेदुटने, ता. पनवेल येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. आयोजकांचे मनःपूर्वक आभार.” ... त्याठिकाणी छोटे खानी आदिवासी भागात मार्गदर्शन करतांना.
#आदिवासी #तरुण #हॉस्टेल

आदिवासी वसतिगृह विद्यार्थ्यांचे यशस्वी आंदोलनअपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे कार्यालयावर दिनांक १५/०९/२०२५ रोजी आं...
16/09/2025

आदिवासी वसतिगृह विद्यार्थ्यांचे यशस्वी आंदोलन

अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे कार्यालयावर दिनांक १५/०९/२०२५ रोजी आंदोलन करण्यात आले.

आदिवासी मुला–मुलींच्या शासकीय वसतिगृह विद्यार्थ्यांना नवीन दराने भोजन डी.बी.टी. तात्काळ अदा करणे व वसतिगृहातील इतर समस्या सोडविणे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील विभागीय, महानगरपालिका तसेच जिल्हास्तरीय आदिवासी वसतिगृह विद्यार्थ्यांना २९/०९/२०२५ पर्यंत नवीन शासन निर्णयानुसार नवीन दराने सर्व भोजन डी.बी.टी. देण्यात येईल, असे लेखी उत्तर आयुक्त साहेब, नाशिक यांच्या सूचनेनुसार अपर आयुक्त साहेब यांनी दिले. तसेच उर्वरित सर्व समस्या तत्काळ सोडविण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले.

⛈ पाऊस सुरू असतानाही सर्व आदिवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांच्या एकजुटीमुळे आंदोलन यशस्वी ठरले.

🙏 सर्व आदिवासी मुला–मुलींचे मनःपूर्वक आभार...
#आदिवासी #वसतिगृह #विद्यार्थ्यांचे #यशस्वी #आंदोलन #आदिवासी #विकास #विभाग

चलो ठाणे.... चलो ठाणे... अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे कार्यालयावर धरणे आंदोलन... दिनांक 15/09/2025 रोजी. वेळ सक...
12/09/2025

चलो ठाणे.... चलो ठाणे...
अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे कार्यालयावर धरणे आंदोलन...

दिनांक 15/09/2025 रोजी.
वेळ सकाळी 11.00 वाजता...

झोपलेल्या आदिवासी विकास विभागला जागे करूया..
मी पण येतोय तुम्ही पण या...

Address

Navi Mumbai

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918976231109

Alerts

Be the first to know and let us send you an email when आदिवाशी विद्यार्थी कृती समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आदिवाशी विद्यार्थी कृती समिती:

Shortcuts

Share