Swapnpurti Foundation NGO

Swapnpurti Foundation NGO We believe that every person has the right to access opportunities in order to live and develop

महानगरपालिकेचे मोफत टेलरिंग क्लासेस घेण्यात आले.
16/05/2024

महानगरपालिकेचे मोफत टेलरिंग क्लासेस घेण्यात आले.

खारघर ओवे कॅम्प विभागातील महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग व रोजगार निर्मिती उपक्रम सुरू केला आहे. येथील महिला व मु...
16/05/2024

खारघर ओवे कॅम्प विभागातील महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग व रोजगार निर्मिती उपक्रम सुरू केला आहे. येथील महिला व मुलींसाठी अल्प दरात केक बेकिंग व ब्युटी पार्लर कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत. त्यासोबत अनेक सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. महिलांचा मोठा उत्साह व त्यांनी अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.

मानखुर्द विभागातील महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग व रोजगार निर्मिती उपक्रम सुरू केला आहे. त्यासोबत अनेक सरकारी यो...
16/05/2024

मानखुर्द विभागातील महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग व रोजगार निर्मिती उपक्रम सुरू केला आहे. त्यासोबत अनेक सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. लवकरच स्वप्नपूर्ती फाउंडेशन या विभागात विविध उपक्रम राबवणार आहोत. महिलांचा मोठा उत्साह व त्यांनी अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान रामाच्या दैवी आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो. "जय श्री राम!"
18/04/2024

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान रामाच्या दैवी आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो. "जय श्री राम!"

*🎯प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :📢**काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ?*     १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यव...
29/03/2024

*🎯प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :📢*

*काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ?*

१८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे ही योजना सुरु करण्यात आली आहे.

*❇️ योजनेचा उद्धेश ?*

योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना ५ टक्के व्याजदरासह पहिल्या टप्यात १ लाख रु. तर दुसऱ्या टप्यात २ लाख रु. चे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे.

*❇️ या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :*

*१.* पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना पाच आणि पंधरा दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे
*२.* पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण व पंधरा दिवसीय पूर्ण प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे
*३.* प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच आयडी कार्ड प्रदान केले जाणार आहे
*४.* प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५ हजार रुपये चे ई व्हाउचर.
*५.* प्रशिक्षण घेणाऱ्या करगिरास व्यवसाय सुरु करण्यासाठी ५% व्याजदरासह पहिल्या टप्यात एक लाख तर दुसऱ्या टप्यात २ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे.

*कोणाला लाभ घेता येणार आहे*

✔️ सुतार
✔️ लोहार
✔️ सोनार (दागिने कारागीर)
✔️ कुंभार
✔️ न्हावी
✔️ माळी (फुल कारागीर)
✔️ धोबी
✔️ शिंपी
✔️ गवंडी
✔️ चर्मकार
✔️ अस्त्रकार
✔️ बोट बांधणारे
✔️ अवजारे बनवणारे
✔️ खेळणी बनवणारे
✔️ कुलूप बनवणारे
✔️ विणकर कामगार

*📄 आवश्यक कागदपत्रे :*

*१.* आधार कार्ड
*२.* पॅन कार्ड
*३.* उत्पन्न प्रमाणपत्र
*४.* जात प्रमाणपत्र
*५.* पासपोर्ट सा. फोटो
*६.* बँक पासबुक
*७.* मोबाईल नंबर
अधिक माहिती साठी संपर्क करा
स्वप्नपूर्ती फाऊंडेशन

Women Days निमित्त स्वप्नपूर्ती फाउंडेशन तर्फे मानखुर्द येथील सुख शांती Shelter Home मध्य केक बेकिंग क्लासेस घेतले गेले....
15/03/2024

Women Days निमित्त स्वप्नपूर्ती फाउंडेशन तर्फे मानखुर्द येथील सुख शांती Shelter Home मध्य केक बेकिंग क्लासेस घेतले गेले. उद्देश महिलांना स्वावलंबी करून त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक छोटासा प्रयत्न होता. या संधीचा लाभ घेऊन महिलांनी केक शिकले. त्यांचे या शिक्षणातून होणारे फायदे व बिजनेस कसा करावा याबद्दल देखील माहिती दिली.

आई म्हणून बालकाला जन्म देणाऱ्या आणि आयुष्यभरासाठी आपल्या लेकारासाठी वाहून घेणाऱ्या,लहान बहीण म्हणून खोड्या करणाऱ्या आणि ...
08/03/2024

आई म्हणून बालकाला जन्म देणाऱ्या आणि आयुष्यभरासाठी आपल्या लेकारासाठी वाहून घेणाऱ्या,

लहान बहीण म्हणून खोड्या करणाऱ्या आणि दादाची सगळ्यात लाडकी बनून हक्क गाजवणाऱ्या,

मोठी बहीण म्हणून रुबाब दाखवणाऱ्या आणि आईसारखीच माया लावणाऱ्या,

मैत्रीण म्हणून समजून घेणाऱ्या आणि मित्रांहुन अधिक आधार वाटणाऱ्या,

वहिनी म्हणून लळा लावणाऱ्या आणि हक्काने लाड पुरवणाऱ्या,

बायको म्हणून अर्धांगिनी बनणाऱ्या आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणात सावलीसारखी सोबत देणाऱ्या,

शिक्षिका बनून जिवन जगायला शिकविणाऱ्या आणि भविष्याची जडणघडण करणाऱ्या,

मामी, मावशी किंवा काकी बनून आईची जागा चालविणाऱ्या आणि तितकीच माया करणाऱ्या,

पोटची मुलगी म्हणून आयुष्यात सुखांची उधळण करणाऱ्या आणि लग्नानंतरही बापाकडे जीव घुटमळणाऱ्या,

आजी म्हणून गोष्टीत रमविणाऱ्या आणि घराचं घरपण राखणाऱ्या,

या पैकी कोणत्याही रुपात येऊन जगणं किती सुंदर आहे हे शिकविणाऱ्या आणि त्याहूनही स्वतः सुंदर असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला

"जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

स्वप्नपूर्ती फाउंडेशन तर्फे आयुष्मान कार्ड चा कॅम्प घेण्यात आला. प्रधानमंत्री आयुष्मान भारत या योजनेद्वारे दारिद्र्यरेषे...
05/03/2024

स्वप्नपूर्ती फाउंडेशन तर्फे आयुष्मान कार्ड चा कॅम्प घेण्यात आला. प्रधानमंत्री आयुष्मान भारत या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. या कॅम्पमध्ये अनेक लोकांनी आयुष्मान भारत कार्ड काढून या संधीचा लाभ घेतला आहे

29/02/2024
स्वप्नपूर्ती फाउंडेशन तर्फे GDA नर्सिंग कोर्स लवकरच नवी मुंबई या विभागात सुरू होत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साध...
27/02/2024

स्वप्नपूर्ती फाउंडेशन तर्फे GDA नर्सिंग कोर्स लवकरच नवी मुंबई या विभागात सुरू होत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा हा कोर्स पूर्ण मोफत असून जॉब प्लेसमेंट साठी सहकार्य केले जाईल.

स्वप्नपूर्ती फाउंडेशन तर्फे MSME Sustainable ZED (Zero Defect Zero Effect) चे काम संपूर्ण महाराष्ट्रात व यु.पी राज्यात स...
27/02/2024

स्वप्नपूर्ती फाउंडेशन तर्फे MSME Sustainable ZED (Zero Defect Zero Effect) चे काम संपूर्ण महाराष्ट्रात व यु.पी राज्यात सुरुवात करण्यात आले आहे. या अंतर्गत अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला झेड सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्यात येईल.

मानखुर्द येथील सुख शांती शेल्टर हाऊस ला भेट देण्यात आली. मानखुर्द विभागातील महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग व रोजग...
27/02/2024

मानखुर्द येथील सुख शांती शेल्टर हाऊस ला भेट देण्यात आली. मानखुर्द विभागातील महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग व रोजगार निर्मिती उपक्रम सुरू केला जाणार आहे. त्यासोबत अनेक सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. लवकरच स्वप्नपूर्ती फाउंडेशन या विभागात विविध उपक्रम राबवणार आहोत. सुख शांती संस्थेच्या संस्थापक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यासाठी धन्यवाद. महिलांचा मोठा उत्साह व त्यांनी अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.

Address

Rajani Gandha Apartment, Shop No/2, Plot Number 23/A, Sector 12/D, Nr. Krishna Temple
Navi Mumbai
400709

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swapnpurti Foundation NGO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share