श्री शिवशंभू विचार दर्शन

श्री शिवशंभू विचार दर्शन हर हर महादेव 🚩
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा जागर.
धर्म, इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमानासाठी समर्पित पेज.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीशिवराज शक ३५३ प्रारंभशिवराज्याभिषेक दिन जय शिवराय! 🚩जय भवानी! जय शिवाजी! 🚩
27/06/2026

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी
शिवराज शक ३५३ प्रारंभ
शिवराज्याभिषेक दिन
जय शिवराय! 🚩
जय भवानी! जय शिवाजी! 🚩

श्रीशिवशंभू विचार मंच छत्तीसगड
21/06/2026

श्रीशिवशंभू विचार मंच छत्तीसगड

शिवराज्याभिषेक दिन तिथीनेच हवा!छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तब्बल आठशे वर्षांच्या परकीय गुलामगिरीच्या छाताडा...
06/06/2026

शिवराज्याभिषेक दिन तिथीनेच हवा!

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तब्बल आठशे वर्षांच्या परकीय गुलामगिरीच्या छाताडावर घातलेला प्रखर घाव होता. म्हणूनच, शिवराज्याभिषेक दिन आपल्यासाठी प्राणापेक्षाही प्रिय आहे. मात्र, केवळ एका गैरसमजापोटी जर हा सुवर्णदिन चुकीच्या दिवशी साजरा होत असेल तर?

शिवछत्रपतींनी परकीय आक्रमकांना केवळ रणांगणावरच पराभूत केले नाही, तर त्यांची जुलमी राज्यपद्धती आणि भाषा यांनाही हद्दपार केले. यासाठीच त्यांनी 'राज्यव्यवहार कोश' आणि स्वतंत्र 'शिवशकाची' निर्मिती केली. परंतु, दुर्दैवाने आपण शिवरायांनी सुरू केलेला हाच शिवशक विसरून, इंग्रजी तारखेनुसार '६ जून' रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करत आहोत. शिवरायांची स्वतःची कालगणना नाकारून इंग्रजाळलेली तारीख स्वीकारणे, ही एक प्रकारे शिवविचारांशीच गद्दारी ठरेल.

शिवरायांच्या स्वराज्याचे खरे पाईक म्हणून आपण स्वभाषा, स्वराज्यपद्धती आणि 'स्व-कालगणनेचा' (शिवशकाचा) स्वीकार करायलाच हवा. निदान शिवराज्याभिषेक दिन तरी शिवशकाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच तिथीनुसारच साजरा व्हायला हवा.

यंदा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शिवराज शक ३५३ ही तिथी इंग्रजी कॅलेंडरनुसार २७ जून रोजी येत आहे. म्हणूनच, त्याच दिवशी आपण सर्वांनी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करूयात; हीच शिवछत्रपतींना वाहिलेली खरी आणि प्रामाणिक आदरांजली असेल!

इंग्रजी तारीख सोडा, 'शिवराज शक' स्वीकारा!

राज्यभिषेक दिन -गजानन मेहंदळे
06/06/2026

राज्यभिषेक दिन -गजानन मेहंदळे

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित - शिवशंभू विचारदर्शन आयोजित शि...

31/05/2026
*अल्लाउद्दीन हसन शाहला हसन गंगु बहमनी हे नाव का पडले ?*बहमनी सल्तनतीचा संस्थापक अल्लाउद्दीन हसन शाह म्हणजेच हसन गंगु बहम...
07/05/2026

*अल्लाउद्दीन हसन शाहला हसन गंगु बहमनी हे नाव का पडले ?*

बहमनी सल्तनतीचा संस्थापक अल्लाउद्दीन हसन शाह म्हणजेच हसन गंगु बहमनी याला आणि त्याच्या सल्तनतीला 'बहमनी' हे नाव का पडले याची हकीकत इतिहासकार मुहम्मद कासीम फिरिश्ता याने आपल्या तारीख-इ फिरिश्ता या फार्सी पुस्तकात दिली आहे. तारीख-इ फिरिश्ताच्या पहिल्या खंडाच्या पृ. २७३-७४ वर ही हकीकत पुढील प्रमाणे येते -

*मराठी भाषांतर*

हसन नावाचा एक माणूस दिल्ली येथे ज्योतिषी असलेल्या एका गंगोई ब्राह्मणाकडे नोकरी करीत असे. हा गंगोई ब्राह्मण शाहजादा मुहम्मद तुघलक याचा निकटवर्ती व उच्चपदस्थ होता. दैव प्रतिकूल असल्यामुळे हसन या गंगोई ब्राह्मणाकडे नोकरी करून आपले पोट भरीत असे. हसनच्या बेरोजगारीबद्दल जाणून असलेल्या गंगोई ब्राह्मणाने हसनला एक जोडी बैल आणि दोन मजूर सोबतीला देऊन, एक वैराण जमीन कसायला दिली. हसन गरजवंत असल्याने त्याने हे
कष्टाचे काम स्वीकारले आणि ही जमीन तो कसू लागला. एके दिवशी जमीन नांगरत असताना अचानक त्याचा नांगर जमिनीत अडकला व तो काही केल्या वर येईना. हसनच्या मजुरांनी हसनला या बद्दल सांगितले तेव्हा हसनने त्या ठिकाणी खोदले तेव्हा त्याला दिसले की नांगर एका साखळीमध्ये अडकला आहे. त्याचे बारकाईने परीक्षण केल्यावर त्याला दिसले की नांगरात अडकलेल्या त्या साखळीचे एक टोक एका भांड्याला अडकवलेले होते व ते भांडे दुसऱ्याच कोणत्यातरी राजवटीच्या सोन्याच्या मोहरांनी काठोकाठ भरलेले होते. (जंजीर रा दर गर्दन ज़रफी ममलू अज़ अशरफी अलाए व तिलाए गैर मस्कुक दीद ) हे एवढे द्रव्य पाहून देखील हसनच्या मनात ते द्रव्य घ्यावे असा वाईट विचार आला नाही. त्याने ते द्रव्य एका चादरीमध्ये बांधले व ती चादर घेऊन तो संध्याकाळच्या वेळी त्या गंगोई ब्राह्मणाच्या घरी आला व त्याला घडलेली हकीकत सांगितली.

हसनच्या प्रामाणिक पणाची त्या गंगोई ब्राह्मणाने खूप तारीफ केली ( बर दियानत व अमानत ऊ आफरीन गोफ्ता ) आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ही विलक्षण हकीकत शाहजादा मुहम्मद तुघलक याला सांगितली. शाहजादा मुहम्मद तुघलक याला हसनच्या या असामान्य प्रामाणिकतेचे आश्चर्य वाटले व त्याने स्वतः ही हकीकत आपले वडील व बादशाह घियासुद्दीन तुघलक यांच्या कानावर घातली. बादशाहने प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून हसनवर शाही कृपा करून त्याला घोडदळच्या शंभर सैनिकांवर प्रमुख म्हणून नेमले.

सारांश असा की त्या गंगोई ब्राह्मणाने हसनला सांगितले की , "मी तुझ्या जन्मकुंडलीचा अभ्यास केला आहे आणि मला त्यातून समजले आहे की तुझ्या नशिबाने तुला लवकरच राजासारखे उच्चपद प्राप्त होणार आहे. परंतु तू मला एक वचन दिले पाहिजेस, ते असे की देवाच्या कृपेने जर तुला अपरंपार द्रव्य आणि अधिकार प्राप्त झाले तर तू तुझ्या नावामध्ये माझे नाव घालून त्या नावानेच लोकांना आपली ओळख सांगितली पाहिजेस ! आणि तुझ्या कचेरीत माझी आणि माझ्या वंशजांची पंडीत म्हणून नियुक्ती केली पाहिजेस. हसनने गंगोई ब्राह्मणाचे हे म्हणणे कोणत्याही अटी शिवाय मान्य केले आणि पुढे जेव्हा त्याला राज्य प्राप्त झाले तेव्हा त्याने आपले नाव आपल्या राज्यव्यवहारात व आपल्या मुद्रेमध्ये 'हसन गंगु बहमनी' असे प्रसिद्ध केले !

*फार्सी पाठ*

हसन नाम शख्सी ब-दारुल ख़िलाफ़त देहली दर मुलाज़िमत गांगोई बहमन मंजम की नज्द शहज़ादा मुहम्मद तुग़लक़ शाह क़ुर्ब ओ मंज़लती दाश्त मी बूद व दर कमान फलाकत-इ रोज़गार मी-गुज़रानीद। रोजी अज़ तंगी मआश बे तंग आमदा अज़ गंगोई दर खबर अस्त शुग़ूल व ख़िदमति नमूद की ब-आन कियाम निहायद गंगोई यक जफ्त गाव व दो मज़दूर ऊ रा दादा दर हदाली व हली (?) ज़मीन ख़राबाबाद हवाला नमूद ताआन रा जराअत नुमायद व ज़मीमा आंची बाद मी-रसद साख़्ता औकात ब-फ़राग़त गुजरानीद। हसन अज़ ग़ायत इजतरार ओ एहतियाज़ अताअत नमूदा. ब-अम्र जिराअत व कुल्बा रा फय मश्गुल गश्त नागाह रोज़ी कुल्बा दर ज़मीन न-बरशद. मजदूर हसन रा खबर कर्द. हसन बाद अज़ हफर आन मौजा कुल्बा रा दर जंज़ीर मी बंद शूदे याफ्त व चूं खूब मुलाहिज कर्द जंजीर रा दर गर्दन ज़रफी ममलू अज़ अशरफी अलाए व तिलाए गैर मस्कुक दीद अम्मा बी आन की दस्त-इ खियानती बर इन दराज़ कुनद. आन रा दर चादर मी पेचीदा वक्त-इ शब ब-खाना-इ गंगोई बहमन बरदा. हकीकत हाल मअरुज़द अस्त.

गंगोई बहमन बर दियानत व अमानत ऊ आफरीन गोफ्ता आली असबाह इन वाकिया अजुबा रा ब-अर्ज शाहजादा रसानीद. शाहजादा अज़ कमाल दियानत व अलू हिम्मत हसन तआज्जुब नमूदा ऊ रा ब-हुजूर खूद तलबीद व वजह व तरज़ ओ खुशी कर्दा ब-मिसामाह बादशाह घियासुद्दिन तुग़लक शाह रसानीद. बादशाह ऊ रा ब-मर हिम्मत खुसरवाने इख्तीसास दादा दर रिसाला(?) अमीरान सदा मुन्तज़ीम साख्त.

अलकिस्सा रोजी गंगोई बहमन ब-हसन गुफ्त की अज़ जांच ताली-इ तू चुनान मी याबम की साहब इक़बाल बाशी व अज़ ज़ानिब हक़ तआला मौक़ूफ़ व मोयद गरदीदा अनक़रीब बर रजा आला व असली गरदी पस बा मन अहद व शर्त कुन की अगर बख़शन्दा बी-मनत दौलत अज़ीम ब-तू अज़ रा मी गोयंद इस्म मरा खबर व इस्म खुद गरदानी ता बया मन नाम तू नाम तीर सिफ़त बकवाद व अम पंदीद व दफ़तर खुद रा मन व औलाद-इ मन रुजू नुमाई। हसन कबुल इनमोअय्यानी करदा। हनुज़ ब-दौलतज़ादा बूद की इस्म ऊ रा खबर व नकश नगीन खुद गरदानिदा 'हसन गंगु बहमनी' मशहूर गरदीद।

पुढे पृ. क्रमांक २८१-८२ वर फिरिश्ता लिहितो की, "हसन गंगु बहमनी हा इराण मधील प्राचीन बहमन वंशाचा होता असे म्हटले जाते, मी अहमदनगर येथील ग्रंथालयात त्याची एक वंशावळ पाहिली व त्यावरून ती वंशावळ त्याला राज्यपद प्राप्त झाल्यानंतर खुशमस्कऱ्यांनी व कवींनी मुद्दाम तयार करून घेतली असावी असे वाटते. हसनचे एकंदर पूर्वायुष्य पाहता त्याच्या पुर्वजांचा पत्ता लागणे दुरापास्त आहे असेच वाटते. 'बहमनी' हे त्याचे नाव त्याला त्याचा मालक असलेल्या ब्राह्मणाकडूनच मिळाले आहे यात शंका नाही. हा राजा म्हणजे हसन गंगु जन्माने अफगाण होता. (इंग्रजी भाषांतर - History of the rise of the Mohammedan power in India, Vol 2, pg 297 )

सत्येन सुभाष वेलणकर
पुणे

06/05/2026

फ्रान्सिस झेवियर कोण होता? इतिहासातील वादग्रस्त व्यक्ती. Part 5
#झेवियर






#इतिहास
#मराठीइतिहास





04/05/2026

फ्रान्सिस झेवियर कोण होता? इतिहासातील वादग्रस्त व्यक्ती. Part 4
#झेवियर






#इतिहास
#मराठीइतिहास





Address

Kharghar
Navi Mumbai
410210

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री शिवशंभू विचार दर्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share