ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ केंद्रीय तथा राज्य शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी यांचे गैर-राजनैतिक संघटन.

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे, बिगर राजकीय संघटनेची स्थापना वर्ष 2018 मध्ये करण्यात आली.

समाजातील प्रत्येकाला ओबीसी साक्षर करणे हे ध्येय आहे. सामाजिक न्यायाबद्दल समाजामध्ये जाणीव व जागृती निर्माण करणे, भारतीय राज्यघटनेवर निष्ठा असणाऱ्या सर्व समाजघटकांमध्ये व ओबीसीसह इ

तरही वर्गांमध्ये सुसंवाद ठेवून बंधूभाव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे संघटन करीत आहे. ओबीसी समाजाला आपल्या हक्कांबाबत जागरूक करणे ही महत्वाची उद्दिष्टे ठेवून, प्रशिक्षण, प्रबोधन व संघटन या तीन माध्यामातून ओबीसी मधील जातीय चेतना नाहीशी करून, वर्गीय चेतना निर्माण

करणे, सामाजिक समता निर्माण होण्यासाठी, सर्व समाजघटकांना समान प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. यासाठी संघटनेच्या माध्यामातून अल्पकालीन व दिर्घकालीन कार्यक्रम आखण्यात आले आहे. यामध्ये ओबीसी समाजाच्या तात्कालीक प्रश्नांपासून तर भविष्यात ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करणे, हे सुद्धा महत्वाचे आहे. यासाठी ओबीसींची नेमकी स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासीठी जातीनिहाय जनगणना होणे अत्यंत महत्वाचे आहे.

ब्रिटीश काळात 1931 साली जातीनिहाय जनगणना झाली होती, तद् नंतर आजतागायत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालेली नाही. म्हणून ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी तसेच मंडल आयोगाची 100 टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या ओबीसी कर्मचाऱ्यांमधील समन्वय वाढवून सेवाविषयक सर्व अडचणी नियमितपणे सोडविण्याचे, पदोन्नतीमधे आरक्षण मिळवून देण्याचे, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि विविध शिष्यवृत्त्यांचे लाभ मिळवण्यासाठी व नॉन क्रिमिलेयरची उत्पन्न मर्यादा वाढवण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ करीत आहे.

अथांग विद्वत्ता, अढळ स्वाभिमान, अपराजित शौर्य आणि स्वराज्यनिष्ठेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज हे क...
14/05/2026

अथांग विद्वत्ता, अढळ स्वाभिमान, अपराजित शौर्य आणि स्वराज्यनिष्ठेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि संघर्षाचे जाज्वल्य प्रतीक होते. छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! *सभासद नोंदणी लिंक:* https://obcadhikarikarmacharisangh.in
*व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा:* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G

महात्मा ज्योतिराव फुले “महात्मा” पदवी प्रदान दिन!सत्य, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारेस्...
11/05/2026

महात्मा ज्योतिराव फुले “महात्मा” पदवी प्रदान दिन!

सत्य, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे
स्त्री-शूद्र-अतिशूद्रांच्या मुक्तीचे महानायक, सत्यशोधक विचारांचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना सन ११ मे १८८८ मध्ये मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे जनतेतर्फे “महात्मा” ही पदवी प्रदान करण्यात आली.

ही केवळ पदवी नव्हती तर अन्याय, अंधश्रद्धा, जातिव्यवस्था आणि सामाजिक गुलामगिरीविरुद्ध त्यांनी पेटवलेल्या क्रांतीचा जनतेने केलेला गौरव होता. मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा, सत्यशोधक समाजाची स्थापना, शेतकरी, कामगार आणि वंचितांच्या हक्कांसाठी संघर्ष या कार्यातून त्यांनी भारताला समतेचा नवा विचार दिला. महात्मा पदवी प्रदान दिनानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन!
#महात्मा #सत्यशोधक
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! *सभासद नोंदणी लिंक:* https://obcadhikarikarmacharisangh.in
*व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा:* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G

हमीद दलवाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!अंधश्रद्धा, धर्मांधता आणि सामाजिक विषमतेविरुद्ध निर्भीड आवाज उठवणारे, मुस्लिम...
03/05/2026

हमीद दलवाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

अंधश्रद्धा, धर्मांधता आणि सामाजिक विषमतेविरुद्ध निर्भीड आवाज उठवणारे, मुस्लिम समाजात सुधारणा, स्त्री-स्वातंत्र्य आणि प्रबोधनाची मशाल पेटवणारे प्रखर विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक — हमीद दलवाई

त्यांनी केवळ प्रश्न उपस्थित केले नाहीत, तर विचार करण्याची नवी दिशा दिली. धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी.मूल्यांचा पुरस्कार करत समाजाला आत्मपरीक्षणाची गरज त्यांनी दाखवून दिली. त्यांचा संघर्ष हा कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित नव्हता, तो होता समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायासाठीचा व्यापक लढा.
ReformMovement OBCAdhikariKarmachariSangh
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! *सभासद नोंदणी लिंक:* https://obcadhikarikarmacharisangh.in
*व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा:* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G

महाराष्ट्र दिन | मराठी राजभाषा दिन | आंतरराष्ट्रीय कामगार दिन | बौद्ध पौर्णिमा१ मे हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्...
01/05/2026

महाराष्ट्र दिन | मराठी राजभाषा दिन | आंतरराष्ट्रीय कामगार दिन | बौद्ध पौर्णिमा

१ मे हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना (1960) झाली. मराठी अस्मिता, संस्कृती आणि स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस.

मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपली ओळख, संस्कृती आणि विचारांची परंपरा आहे. तिचे जतन व संवर्धन हीच आपली जबाबदारी आहे.

आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ही साजरा केला जातो. हा दिवस जगभरात कामगार वर्गाच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी (जसे की सुरक्षित कामाची जागा, योग्य वेतन) साजरा केला जातो.

तसेच आजच बौद्ध पौर्णिमा— तथागत गौतम बुद्ध यांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाचा स्मरणदिन. जगाला करुणा, प्रज्ञा आणि समतेचा मार्ग दाखवणारे, अहिंसा, मध्यम मार्ग आणि मानवी मूल्यांचे अधिष्ठान निर्माण करणारे तथागत गौतम बुद्ध यांना बौद्ध पौर्णिमेनिमित्त कोटी कोटी वंदन!
“अप्प दीपो भव” — स्वतःचा दीप स्वतः बना, हा संदेश आजही अंधःकारात मार्ग दाखवतो.

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे…हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे…राष्ट्रसंत तुकडोजी महाराजा...
30/04/2026

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे…
हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजनाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातिभेद विरोधात प्रबोधन केले. 'ग्रामगीता' आणि भजनांतून त्यांनी मानवी मूल्ये, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक समतेचा संदेश दिला. चुकीच्या रूढी, अंधश्रद्धा व दांभिक भक्ती न करता, मानवामध्येच देव शोधावा, असा विचार त्यांनी आपल्या भजनांतून मांडला. समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! *सभासद नोंदणी लिंक:* https://obcadhikarikarmacharisangh.in
*व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा:* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G

जागतिक कामगार सुरक्षा व आरोग्य दिनकामगार हा केवळ श्रमिक नसतो, तो राष्ट्राच्या प्रगतीचा खरा शिल्पकार असतो. कारखाने, बांधक...
28/04/2026

जागतिक कामगार सुरक्षा व आरोग्य दिन

कामगार हा केवळ श्रमिक नसतो, तो राष्ट्राच्या प्रगतीचा खरा शिल्पकार असतो. कारखाने, बांधकाम, शेती, उद्योग, सेवा क्षेत्र… प्रत्येक ठिकाणी आपल्या श्रमाने देश उभा करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची हमी देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.

अपघातमुक्त कार्यस्थळ, सुरक्षित साधने, योग्य प्रशिक्षण आणि आरोग्यदायी वातावरण हे केवळ नियम नाहीत, तर मानवी हक्क आहेत. त्यामुळे प्रत्येक कामगारासाठी सुरक्षित कार्यस्थळ, आरोग्याची हमी आणि सन्मानाची वागणूक व श्रमाचा आदर आणि हक्कांचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी सजग, संवेदनशील आणि कटिबद्ध राहूया.
OBCAdhikariKarmachariSangh
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! *सभासद नोंदणी लिंक:* https://obcadhikarikarmacharisangh.in
*व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा:* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G

इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीकरिता अर्ज प्रक्रिया सुरूसामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (OBC) घटक...
27/04/2026

इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीकरिता अर्ज प्रक्रिया सुरू

सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (OBC) घटकातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध करून देते. आर्थिक अडचणीमुळे परदेशात शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक उज्ज्वल भविष्याचा मार्ग ठरू शकते. महाराष्ट्र शासनाची ही विदेशी शिष्यवृत्ती योजना ही केवळ आर्थिक मदत नसून, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या दारात प्रवेश मिळवून देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघच्यावतीने करण्यात येत आहे.
शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी👇🏻लिंकवर क्लिक करावे. https://obcadhikarikarmacharisangh.com/?p=4342

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in
व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G

समाजातील अस्पृश्यतेच्या अंधाराविरुद्धप्रबोधनाची मशाल पेटवणारे… मानवतेच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून समता आणि बंधुतेचा...
23/04/2026

समाजातील अस्पृश्यतेच्या अंधाराविरुद्ध
प्रबोधनाची मशाल पेटवणारे… मानवतेच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून समता आणि बंधुतेचा मार्ग दाखवणारे… व अस्पृश्यता निवारणासाठी आयुष्य समर्पित करणारे थोर समाजसुधारक, अभ्यासू संशोधक आणि प्रभावी लेखक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांनी सुरू केलेली अस्पृश्यता निवारण चळवळ ही केवळ सामाजिक सुधारणा नव्हती तर ती होती मानवतेच्या सन्मानासाठीची एक क्रांती.


ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! *सभासद नोंदणी लिंक:* https://obcadhikarikarmacharisangh.in
*व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा:* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G

मंडलनायक कर्मवीर ॲड. जनार्दन पाटील स्मृतिदिन विनम्र अभिवादन!ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटणारे, राज्यात ओबीसी चळ...
17/04/2026

मंडलनायक कर्मवीर ॲड. जनार्दन पाटील स्मृतिदिन विनम्र अभिवादन!

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटणारे, राज्यात ओबीसी चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि मुस्लिम ओबीसी चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाणारे कर्मवीर ॲड. जनार्दन पाटील हे खरेच सामाजिक न्यायाच्या लढ्यातील अढळ दीपस्तंभ होते. स्वतःचे वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून, अविवाहित राहून त्यांनी संपूर्ण जीवन ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी आणि हक्कांसाठी समर्पित केले.

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! *सभासद नोंदणी लिंक:* https://obcadhikarikarmacharisangh.in
*व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा:* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G

“क्रांती म्हणजे गुलामगिरीची साखळी तोडणे नव्हे तर ती साखळी पुन्हा निर्माण होऊ नये याची व्यवस्था करणे!” — डॉ. बाबासाहेब आं...
14/04/2026

“क्रांती म्हणजे गुलामगिरीची साखळी तोडणे नव्हे तर ती साखळी पुन्हा निर्माण होऊ नये याची व्यवस्था करणे!” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्यांनी केवळ अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही, तर त्या अन्यायाची मुळेच उपटून टाकण्यासाठी संविधान, समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची भक्कम पायाभरणी केली… वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजाला मान, हक्क आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देणारे विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
जय भीम!
जय संविधान!

OBCAdhikariKarmachariSangh
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! *सभासद नोंदणी लिंक:* https://obcadhikarikarmacharisangh.in
*व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा:* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G

Address

Office No. 1204, 12th Floor, Kamdhenu, International Trade Centre, Sector 14, Kharghar, Navi Mumbai
Navi Mumbai
410210

Alerts

Be the first to know and let us send you an email when ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ:

Share