Ekta Vichar Manch

Ekta Vichar Manch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ekta Vichar Manch, Nonprofit Organization, Panchasheel Nagar No. 01 Cbd Belapur sector 20, Navi Mumbai (New Mumbai).

हुतात्म्यांचे बलिदान व जनतेच्या संघर्षातून साकारलेला आपला सर्वांचा हा महाराष्ट्र. ही भूमी संतांची, विचारवंतांची, शूरवीरा...
01/05/2025

हुतात्म्यांचे बलिदान व जनतेच्या संघर्षातून साकारलेला आपला सर्वांचा हा महाराष्ट्र. ही भूमी संतांची, विचारवंतांची, शूरवीरांची आहे. या महाराष्ट्राचे यश आणि किर्ती अखंड राहो यासाठी सदैव तत्पर राहू‌. याशिवाय आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. यानिमित्ताने सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#महाराष्ट्रदिन

दिनांक 22-04-2024 रोजी ठीक 10 वाजता सी. बी. डी. बेलापूर सेक्टर 08 येथील दुर्गा माता नगर परिसरात सिलेंडर फुटल्याने भीषण आ...
24/04/2024

दिनांक 22-04-2024 रोजी ठीक 10 वाजता सी. बी. डी. बेलापूर सेक्टर 08 येथील दुर्गा माता नगर परिसरात सिलेंडर फुटल्याने भीषण आग लागली होती. या अपघातात 5 घरे जळून खाक झाली. 5 घरांचे नुकसान झाले आहे. आणि याचा कोणालाच अपघात झाला नाही.
या अपघातात अपघातस्थळी राहणाऱ्या लोकांना रेशन वातप...

मदतीसाठी संपर्क:
ऋषिकेश पवार - 9167428050

नमस्कार नवी मुंबईकर तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे! आज दिनांक 22-04-2024 रोजी ठीक 10 वाजता सी. बी. डी. बेलापूर सेक्टर...
22/04/2024

नमस्कार नवी मुंबईकर

तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे!

आज दिनांक 22-04-2024 रोजी ठीक 10 वाजता सी. बी. डी. बेलापूर सेक्टर 08 येथील दुर्गा माता नगर परिसरात सिलेंडर फुटल्याने भीषण आग लागली. या अपघातात 5 घरे जळून खाक झाली. 5 घरांचे नुकसान झाले आहे. आणि याचा कोणालाच अपघात झाला नाही.

या अपघातात अपघातस्थळी राहणाऱ्या लोकांची भांडी, कपडे, सामान, कागदपत्रे व इतर सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. त्यामुळे मदतीची मागणी करण्यात येत आहे.

सर्वांनी रेशन, कपडे, भांडी व आर्थिक मदत देण्याचे आवाहन आहे.

मदतीसाठी संपर्क:
ऋषिकेश पवार - 9167428050

आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, पत्रकार, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, जागति...
14/04/2024

आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, पत्रकार, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, जागतिक मानवमुक्तीच्या चळवळीतील एक शिलेदार, बहुजनांचे कैवारी, प्रखर कायदेपंडित, शेतकऱ्याचे वाली, स्त्रियांना घटनात्मक समान दर्जा देणारे, मुक्तीदाता, बहुजनांचा मूकनायक, बोधिसत्व, विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, विद्येचा महामेरू, जगाने ज्यांचा सन्मान 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' असा केलेले महामानव डॉ. बाबासाहेब यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.


#भीमजयंती

बहूजन महापुरूष क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती...तळागाळातल्या सर्वसामान्यांच्या जिवनात खर्‍या अर्थाने क्...
11/04/2024

बहूजन महापुरूष क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती...

तळागाळातल्या सर्वसामान्यांच्या जिवनात खर्‍या अर्थाने क्रांतीची ज्योत पेटवून जिवन फुलविणारे क्रांतीबा....
शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे सांगत शेतकरी-कष्टकरी समाजात शैक्षणिक क्रांती घडवून आणणारे अद्यगुरू.....

आज त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे, मित्रानो...क्रांतीबांचे विचार आत्मसात करण्यासाठी त्यांची पुस्तके वाचा.समजून घ्या.आणि समाजाच्या जडण-घडणीत योगदान द्या....

क्रांतीबांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि बहूजन समाजात क्रांतीकारक विचारांची पेरणी करणार्‍या सर्वांनाच पुढील क्रांतीकारी कार्यासाठी लाख-लाख सदिच्छा..!

स्फूर्ती चा अखंड झरा …३ एप्रिल १६८० महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा आणि तितकाच दुर्दैवी दिवस. कारण याच दिवशी महारा...
03/04/2024

स्फूर्ती चा अखंड झरा …
३ एप्रिल १६८० महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा आणि तितकाच दुर्दैवी दिवस. कारण याच दिवशी महाराष्ट्राचे तारणहार छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाचा निरोप घेतला…

• रंग असावा जिजाऊंच्या स्वराज्य प्रेरणेचा...• रंग असावा शिवरायांच्या विचारांचा...• रंग असावा स्वराज्यरक्षिका ताराराणींच्...
25/03/2024

• रंग असावा जिजाऊंच्या स्वराज्य प्रेरणेचा...
• रंग असावा शिवरायांच्या विचारांचा...
• रंग असावा स्वराज्यरक्षिका ताराराणींच्या पराक्रमा सारखा...
• रंग असावा अहिल्याबाई होळकरांच्या पराक्रमाचा...
• रंग असावा महात्मा फुले यांच्या शिक्षणाचा...
• रंग असावा सावित्री आईच्या विद्यापीठ शिक्षणाचा...
• रंग असावा बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा, शील, करूनेचा...
• रंग असावा माता रमाईंच्या त्याला सारखा...
• रंग असावा अण्णाभाऊंच्या शाहिरीचा...
• रंग असावा गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा...
• रंग असावा तुकारामांच्या अभंगाचा...
• रंग असावा माणसाला माणूस जोडण्याचा...
• रंग असावा माणसात देव शोधण्याचा...

#रंगपंचमी #रंग #होळी #धुलीवंदन

सर्वांना होळीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
24/03/2024

सर्वांना होळीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

शहीद दिवस निमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्...
23/03/2024

शहीद दिवस निमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !

#हुतात्मादिवस #शहीददिन

माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठीचा सत्याग्रह आजच्याच दिवशी समतेसाठी, स्वाभिमानासाठी, समान अधिकारांसाठी विश्वरत्न डॉ...
20/03/2024

माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठीचा सत्याग्रह
आजच्याच दिवशी समतेसाठी, स्वाभिमानासाठी, समान अधिकारांसाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला होता.
२० मार्च १९२७ महाड चवदार तळे क्रांतिदिनाच्या सर्व प्रबुध्द भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा! आणि विश्ववंदनीय
बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महान कार्यास वंदन.
महाड चवदार तळे सत्याग्रह दिन.

#चवदारतळे #चवदारतळे_सत्याग्रह

समानतेच्या सामाजिक चळवळीतील अग्रणी महाराजा सयाजीराव गायकवाड यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #महाराजसयाजीरावगायकवाड
11/03/2024

समानतेच्या सामाजिक चळवळीतील अग्रणी महाराजा सयाजीराव गायकवाड यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#महाराजसयाजीरावगायकवाड

रणझुंजार, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. संपूर्ण देशाला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुष...
11/03/2024

रणझुंजार, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. संपूर्ण देशाला स्वाभिमान आणि धैर्य शिकवणाऱ्या महापुरुषांपैकी एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी व बाणेदार छत्रपतींना मानाचा मुजरा व पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
#छत्रपतीसंभाजीमहाराज

Address

Panchasheel Nagar No. 01 Cbd Belapur Sector 20
Navi Mumbai (New Mumbai)
400614

Telephone

09167428050

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekta Vichar Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ekta Vichar Manch:

Share