Koli Mahasangh

Directions

Koli Mahasangh ध्यास कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा !

शिक्षणमहर्षी श्री.डॉ.व्ही.टी.पाटील यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा.आमदार श्री.रमेश...
26/08/2026

शिक्षणमहर्षी श्री.डॉ.व्ही.टी.पाटील यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा.आमदार श्री.रमेशदादा पाटील यांनी त्यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या! या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देताना रमेशदादा पाटील यांनी डॉ.व्ही.टी.पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील अद्वितीय योगदान नक्कीच उल्लेखनीय आहे व त्यांच्या दूरदृष्टिकोनामुळेच हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे , अश्या शुभेच्छारूप त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या !

यावेळी 'बुलंद पोलीस टाइम्स'चे मुख्य संपादक श्री. सुनील एस. पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते .

कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक व मा.आमदार श्री.रमेशदादा पाटील यांनी माननीय नामदार श्री.भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्र...
25/08/2026

कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक व मा.आमदार श्री.रमेशदादा पाटील यांनी माननीय नामदार श्री.भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Bharatsheth Gogawale - भरतशेठ गोगावले

ॲड. चेतन रमेशदादा पाटील यांची भाजपा मच्छिमार प्रकोष्ठ, महाराष्ट्र राज्यच्या "प्रभारी पदी" नियुक्ती झाल्याबद्दल कोळी महास...
25/08/2026

ॲड. चेतन रमेशदादा पाटील यांची भाजपा मच्छिमार प्रकोष्ठ, महाराष्ट्र राज्यच्या "प्रभारी पदी" नियुक्ती झाल्याबद्दल कोळी महासंघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन...



Devendra Fadnavis Ravindra Chavan Rameshdada Patil Chetan Ramesh Patil

24/08/2026

कल्याणमध्ये कोळी महासंघाच्या वतीने 'विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५-२०२६' उत्साहात संपन्न....काही खास क्षणचित्रे...

🟧 कल्याणमध्ये कोळी महासंघाच्या वतीने 'विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५-२०२६' उत्साहात संपन्नकोळी महासंघ (ठाणे जिल्हा शाखा: ...
24/08/2026

🟧 कल्याणमध्ये कोळी महासंघाच्या वतीने 'विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५-२०२६' उत्साहात संपन्न

कोळी महासंघ (ठाणे जिल्हा शाखा: कल्याण) च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५-२०२६' अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला.या सोहळ्याला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल आणि कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार श्री. रमेशदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

समाजातील विविध क्षेत्रांतील इतर मान्यवर, पदाधिकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि तरुण पिढीला आयएएस, आयपीएस व इतर उच्च पदांवर जाण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता.

यावेळी श्री. रमेशदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मोलाचे मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. तसेच, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य, मार्गदर्शक वर्ग आणि शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. प्रकाश बोबडी, सरचिटणीस श्री. राजहंस टपके, राज्यनेते श्री. देवानंद भाईर, भाजप मच्छिमार सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा महासंघाचे युवा प्रदेश अध्यक्ष ॲड. चेतन पाटील, नगरसेवक राहुल कोट, नगरसेवक रोहन कोट, नगरसेविका रेखाताई चौधरी, उल्हासनगर प्रभाग समिती-१ च्या सभापती भावनाताई ओवलेकर, जिल्हाध्यक्ष राम तरे, महिला अध्यक्ष सुषमाताई ढोणे, युवा नेते दशरथ पाटील, युवा नेते भावेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.



Rameshdada Patil Chetan Ramesh Patil

माजी राज्यपाल स्व. डी. वाय. पाटील यांना मा.आमदार रमेशदादा पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली ! कोळी महासंघाचे राष्ट्...
09/08/2026

माजी राज्यपाल स्व. डी. वाय. पाटील यांना मा.आमदार रमेशदादा पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली !

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार रमेशदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे उपस्थित राहून माजी राज्यपाल, पद्मश्री स्व. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी त्यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले . या प्रसंगी बोलताना त्यांनी स्व. डी. वाय. पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील मोलाच्या योगदानाचे आणि कार्याचे कृतज्ञतेने स्मरण केले. याप्रसंगी कोळी महासंघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते .

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा.आमदार श्री रमेशदादा पाटील यांची मुख्य कार्यालय येथे भेट घेऊन शासकीय औद्योगिक प्र...
08/08/2026

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा.आमदार श्री रमेशदादा पाटील यांची मुख्य कार्यालय येथे भेट घेऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील ( ITI ) तासिका तत्त्वावरील ( CHB ) निदेशकांना नियमित शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाकडे शिफारस करावी या विषयी आय.टी.आय शिल्पनिदेशक वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्री रमेश मोठे यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

Rameshdada Patil Chetan Ramesh Patil

कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष व मा.आमदार श्री.रमेशदादा पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पोलीस उपायुक्त श्री. व...
30/07/2026

कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष व मा.आमदार श्री.रमेशदादा पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पोलीस उपायुक्त श्री. विशालजी ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली .यावेळी कोळी महासंघ धुळे जिल्हाध्यक्ष मनोज निकम हे उपस्थित होते.

कोळी महासंघ मुख्य कार्यालय येथे कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष व मा.आमदार श्री.रमेशदादा पाटील यांची गुरुपौर्णिमेनिमित्त भ...
30/07/2026

कोळी महासंघ मुख्य कार्यालय येथे कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष व मा.आमदार श्री.रमेशदादा पाटील यांची गुरुपौर्णिमेनिमित्त भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी कोळी महासंघ उपनेते देवानंद भोईर , सुभाष कोळी, रवींद्र भंडारी,शाहीर मनोज गायके, अभय पाटील ,सहकुटुंब व इतर कोळी महासंघ पदाधिकारी उपस्थित होते.



Rameshdada Patil Chetan Ramesh Patil

मंत्रालय , मुंबई महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीतील बांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्रे मिळण्याची प्रक्रि...
28/07/2026

मंत्रालय , मुंबई

महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीतील बांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्रे मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, तसेच रक्त नात्यातील समाजबांधवांना प्रमाणपत्रे सुलभतेने मिळण्यासाठी २२ जुलै २०२६ रोजी उच्चस्तरीय अभ्यास समिती गठित केली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा.आमदार श्री.रमेशदादा पाटील आणि श्री. चेतन पाटील यांनी मंत्रालयात मा.मंत्री श्री.अतुलजी सावे यांची भेट घेऊन त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

या उच्चस्तरीय अभ्यास समितीच्या स्थापनेमुळे जात प्रमाणपत्र व वैधता पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागून गती मिळणार आहे .

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Koli Mahasangh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share