07/08/2026
मंडल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मंडल योद्ध्यांना विनम्र अभिवादन!
आजचा दिवस केवळ मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा दिवस नाही, तर भारतीय संविधानाने दिलेल्या सामाजिक न्याय, समता, प्रतिनिधित्व आणि समान संधीच्या अधिकारांचा विजयदिन आहे.
मंडल आयोगामुळे इतर मागासवर्गीय (OBC) समाजाला शिक्षण, रोजगार आणि शासन-प्रशासनात घटनात्मक प्रतिनिधित्वाचा मार्ग खुला झाला. हा अधिकार सहज मिळाला नाही; त्यासाठी अनेक विचारवंत, समाजसुधारक, लोकनेते आणि लाखो कार्यकर्त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला.
मंडल आयोग हा केवळ २७% आरक्षणाचा विषय नव्हता, तर सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेल्या समाजाला संविधानाने दिलेल्या प्रतिनिधित्वाच्या हक्काची ऐतिहासिक मान्यता होती. त्यामुळे मंडल हा एका आयोगाचा इतिहास नसून सामाजिक न्यायाच्या नव्या युगाचा प्रारंभ आहे.
OBCAdhikariKarmchariSangh
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in
व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G