25/09/2024
सुजाता घाटगे लिखित
व्यास पब्लिकेशन हाऊस प्रकाशित गॅजेट हे पुस्तक.
आपण रोज प्रत्येक मिनिटामध्ये असंख्य विचार करत असतो,rather असे म्हणूया असंख्य संबंधित/असंबंधित - स्वैर विचार शृंखला आपल्या मनात चालू असतात. पण कधी त्यातील एकाही विचाराचे आपण स्वतः विश्लेषण करून बघतो का?? ....बहुधा ती कधी priority वाटत नाही. Busy world!!
पण हे विचारच आपल्या पडणार्या प्रश्नांचे उत्तर ठरू शकतात, येणार्या प्रवाही विचारांना पूर्णविराम देऊ शकतात, आपले जगणे सोपे करू शकतात. असेच रोज येणारे विचार.... एक एक गाठून त्यांना पुन्हा बोलते करून, त्यातून उत्तर शोधून मनाचे conditioning होणे, मनाचे संवर्धन होणे म्हणजे सुजाता घाटगे लिखित, व्यास पब्लिकेशन हाऊसतर्फे प्रकाशित गॅजेट हे पुस्तक.
या पुस्तकात त्यांनी स्वतःमध्ये येणार्या विचारांना अलगद उलगडत, वाचकाला विचारांच्या अस्तित्वाला स्वीकारण्यास सांगितले आहे.
लेखिकेप्रमाणे आपण आपले विचार रोजनिशी लिहून त्यांना मोकळी वाट करू शकतो किंवा हे पुस्तक वाचून आपल्या विचारांची कोडी सोडवू शकतो.
चला तर मग आजच आपली प्रत मागवा....
पुस्तक खरेदी करण्यासाठी संपर्क ७९७७७२००१६