18/12/2025
हस्तकला विभाग व स्वप्नशिल्प संस्थे मार्फत कोल्हापुरी साज ट्रेनिंग प्रोग्रॅम.
दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत हस्तकला विभागामार्फत नाशिकच्या स्वप्नशिल्प महिला बहुउद्देशीय सेवा संस्थेला नॅशनल हॅंडीक्राफ्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत *'गुरुशिष्य हस्तशिल्प प्रशिक्षण प्रोग्रॅम'* आयोजित केला गेला होता, त्याचा समारोप समारंभ व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम हॉटेल रेडिअंट कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला.
सदर ट्रेनिंग दिनांक 8 ऑक्टोबर 2025 पासून ते 9 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण 50 दिवसांची घेण्यात आली होती या कार्यशाळेत कोल्हापूरचा प्रसिद्ध असणारा दागिना 'कोल्हापुरी साज' बनविण्याचे ट्रेनिंग देण्यात आले, यामध्ये ज्वेलरी चे काम करणाऱ्या 30 हस्तकारागिरांची निवड करण्यात आली होती व त्या कारागिरांना अधिक कुशल पणे बारकाईने व आधुनिक पद्धतीने मार्केटच्या मागणीनुसार कोल्हापुरी साज मध्ये वेगवेगळे प्रकार शिकविण्यात आले, यात हस्तकारागिरांना व्यवसाय वाढ, उद्योजकता विकास, नवनवीन संकल्पना, आर्थिक मदत, मुद्रा लोण, हस्तकला विभागाचे गांधीशिल्प बाजार प्रदर्शनात सहभाग, मार्केट ची ओळख, वस्तूचे मूल्य ठरवणे, मार्केटिंग साठी संभाषण कौशल्य, अशी विविध प्रकारची माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेसाठी हस्तकला विभागाकडून अधिकृत प्रशिक्षक प्रियंका खवरे यांचे मार्गदर्शन लाभले. याच बरोबर हस्तकला विभागामार्फत संपूर्ण भारतभर राबवण्यात येणाऱ्या "हॅंडीक्राफ्ट वीक" देखील साजरी करण्यात आला कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे म्हणून हस्तकला विभागाचे कोल्हापूर सर्व्हिस सेंटर येथील हँडीक्राफ्ट प्रमोशन ऑफिसर श्री. आकाश मुळीक उपस्थित होते, त्यांनी हस्तकारागिरांना हस्तकला विभागाच्या योजना बद्दल माहिती दिली त्यांना भारतभर चालणारे हस्तकला गांधी शिल्प बाजार प्रदर्शनांमध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याविषयीचे मार्गदर्शन केले, विभागाकडून कुशल हस्तकारागिरांना दिले जाणारे पुरस्कारांबदद्दल माहिती दिली तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्वप्नशिल्प महिला बहुद्देशीय सेवा संस्थेच्या सेक्रेटरी सौ विद्या रोहन घायतड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले सर्व हस्तकारागिरांना प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त केले, पुढील व्यवसाय मार्गदर्शन, व्यवसाय वाढीसाठी संस्थेकडून नेहमीच मदत राहील तसे