Nashik Citizens Forum

Nashik Citizens Forum Nashik Citizens' Forum or NCF is a N.G.O.

formed by the enthusiastic professionals from different professions with the basic objective related to the overall development of Nashik region.

हे आकडे बदलू शकतात...✅तुम्ही मतदान केलंत तर! लोकशाहीचे पाईक व्हा,✊🏻जरूर मतदान करा!🗓️ मतदान दिनांक : १५ जानेवारी २०२६📍स्थ...
14/01/2026

हे आकडे बदलू शकतात...
✅तुम्ही मतदान केलंत तर!
लोकशाहीचे पाईक व्हा,✊🏻
जरूर मतदान करा!

🗓️ मतदान दिनांक : १५ जानेवारी २०२६
📍स्थळ : आपल्या नजीकचे मतदान केंद्र

भारतातील संपूर्ण वायू प्रदूषणाची आकडेवारी पाहिल्यास, सुमारे 15% प्रदूषण हे लाकूड वापरून करण्यात येणाऱ्या अंत्यविधीमुळे घ...
09/12/2025

भारतातील संपूर्ण वायू प्रदूषणाची आकडेवारी पाहिल्यास, सुमारे 15% प्रदूषण हे लाकूड वापरून करण्यात येणाऱ्या अंत्यविधीमुळे घडते. एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी 1-2 संपूर्ण वाढ झालेल्या झाडांची कत्तल करावी लागते व 400-500 किलो एवढे कार्बन डायऑकसाईड उत्सर्जन होते.

एकीकडे वृक्षतोडीला विरोध करत असताना व वृक्षसंवर्धनाचा संदेश जोपासत असताना, नाशिककरांनी पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार पद्धतींच्या अवलंबाचा देखील विचार करायला हवा आहे.

'नाशिक सिटीझन्स फोरम' आणि 'शरण फॉर ऍनिमल्स' लवकरच आपल्या कॅम्पेन 'मोक्ष' अंतर्गत ह्या बाबतीतली जनजागृती मोहीम हाती घेणार आहे.

नमस्कार 🙏🏻🏆 नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या कामाला...
05/12/2025

नमस्कार 🙏🏻
🏆 नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी ‘नाशिक सिटीझन फोरम’तर्फे ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ हा पुरस्कार गेल्या ३ वर्षांपासून दिला जातो आहे. पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती, प्राणी कल्याण, वंचित समुदाय सशक्तीकरण आणि सामाजिक सेवा अशा विविध आघाड्यांवर कार्यरत असलेल्या नाशिकच्या 'Unsung Heroes' ला प्रोत्साहन देणे, त्यांच्या योगदानाबद्दल नाशिककरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरीत करणे, हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
🔊यावेळचा आउटस्टँडिंग सिटीझन पुरस्कार लवकरच येऊ घातला आहे. त्याच धर्तीवर आपणास नम्र आवाहन आहे की, आपल्याला ज्ञात असलेल्या अशा 'आउटस्टँडींग' व्यक्तीमत्वांची नावे सुचवावीत.
नामांकीत केलेल्या व्यक्तीमत्वाची माहिती व संपर्कही द्यावा ही विनंती. सदर प्रोफाइल सह, संदर्भातील फोटो व व्हिडिओदेखील पाठवता येतील.
नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख - सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025, सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहील व विद्यमान निवड समितीचा निर्णय अंतिम राहील ह्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

✍️नामांकने सुपूर्द करण्यासाठी ईमेल आय डी पुढील प्रमाणे 👇🏻
[email protected]
अथवा, 9422245333 ह्या व्हॉट्सअँप क्रमांकावर नामांकने शेअर करा.

Address

Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Citizens Forum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nashik Citizens Forum:

Share