Social Networking For Social Cause

Social Networking For Social Cause Social Networking Forum (SNF) was founded in 2010 by Pramod Gaikwad (Nashik) in Maharashtra state. SN

About Social Networking Forum :
Social Networking Forum has been founded in 2010 to create responsible next generation through social networking sites. The movement provides helping hand to the underprivileged part of our society . It runs on the donations and active participation of the youngsters on social media like Facebook and whats up. Social Networking Forum.
1) Reg Number under Public T

rust Act 1950
F - 15528 Nashik

2) Reg Number under Societies Reg Act 1860
MAH / 3041 / N

• Moto :
Social Networking For Social Cause

Founder : Pramod Gaikwad (Mob-9422769364)
Address : 3rd Floor, Vitthal Charani Sankul, Opp Big Bazar, College
Road, Nashik, Maharashtra, India - 422005
Tel. : +91 0253 2582930
E-mail : [email protected]


Members : More than 500 social networkers members in India and abroad

"Kudos to   for highlighting SNF's initiatives in 2025! 🙏 We're grateful for the coverage of our efforts in Quality     ...
19/01/2026

"Kudos to for highlighting SNF's initiatives in 2025! 🙏
We're grateful for the coverage of our efforts in Quality


https://www.freepressjournal.in/pune/nashik-kohor-village-students-get-first-hand-army-experience-at-artillery-school To...
12/01/2026

https://www.freepressjournal.in/pune/nashik-kohor-village-students-get-first-hand-army-experience-at-artillery-school

To get epaper daily on your whatsapp click here:

https://whatsapp.freepressjournal.in

Intending to give students from remote regions a first-hand experience of the strength and capabilities of the Indian Army, the demonstration event “Ex Topachi 2026”, organised at the Artillery School in Deolali, turned out to be a truly unforgettable moment in the lives of the students.

नेहमीप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला, मागील वर्षात सोशल नेटवर्किंग फोरम (SNF) च्या माध्यमातून दुर्गम व आदिवासी भागात झ...
02/01/2026

नेहमीप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला, मागील वर्षात सोशल नेटवर्किंग फोरम (SNF) च्या माध्यमातून दुर्गम व आदिवासी भागात झालेल्या कामांचा संक्षिप्त आढावा सर्व सदस्यांसाठी देत आहे. जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एसएनएफच्या माध्यमातून खालील प्रमुख उपक्रम राबविण्यात आले—

🌱 SNF कामांचा आढावा - जानेवारी २०२५ : डिसेंबर २०२५

▪️ गेल्या १५-२० वर्षात दुर्गम भागात काम करत असताना आलेल्या सकारात्मक अनुभवांवर आधारित "आदिवासी लयगाथा" हे पुस्तक शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केले. आनंदाची बातमी म्हणजे पहिली आवृत्ती संपत आली.

▪️ पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प – रोकडपाडा ता. सुरगाणा, आडगाव ता. पेठ, बोरीचीवाडी आणि टाकळ्याची वाडी ता. इगतपुरी या चार दुर्गम व आदिवासी भागातील गगावांची गंभीर पाणी टंचाई संपवली. या गावांमध्ये शाश्वत जल योजना उपलब्ध करून दिली.

▪️ कुपोषण निर्मूलन उपक्रम – योगविद्या व ICDS च्या सहकार्याने पेठ तालुक्यातील ७० गावामंधील १२५ SAM व MAM (तीव्र व मध्यम कुपोषित) बालकांसाठी पोषक आहार उपलब्ध करून दिला आहे. केवळ दोन महिन्यात या बालकांच्या वजनात फरक दिसून आला आहे. हा उपक्रम एक वर्ष चालेल.

▪️ आरोग्य शिबिरे – गोदाकाठ मेडिकल फाउंडेशनच्या सहकार्याने आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार शिबिर घेण्यात आले. पुढील एक वर्षासाठी स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या सहकार्याने कुळवंडी परिसरातील १० गावांमध्ये गर्भवती माता, महिला व बालकांची आरोग्य तपासणी, पूरक पोषण आहार आणि औषधोपचार शिबीर घेण्यात येते. हा उपक्रम एक वर्ष चालेल.

▪️ SNF ग्रंथालय चळवळ – दुर्गम भागात नवीन ग्रामीण/आदिवासी ग्रंथालयांची उभारणीचे काम अविरत सुरु असून यावर्षात सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथे आणि पेठ तालुक्यातील निरगुडे गावात वाचनालय सुरु करण्यात आले.

▪️ शैक्षणिक सहाय्य – शैशक्षणिक वर्षाच्या सुरुवातील दरवर्षीप्रमाणे शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या, स्कुलबॅग्स वितरित करण्यात आले. दुर्गम भागातील मुलींना शाळेत येण्यासाठी ४-५ किलोमीटर पायी यावे लागते. त्यांचा हा त्रास कमी करून मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण व्हावे यासाठी १९ मुलींना स्त्रीरोग तज्ञ संगठनेच्या वतीने सायकलचे वितरण करण्यात आले.

▪️ आपत्ती व गरज आधारित मदत – मागील वर्षी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा फटका बसून मराठवाड्यातील शेकडो गावांचे मोठे नुकसान झाले. अनेक शाळांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने शैक्षणिक नुकसान झाले. कर्तव्याची भावना म्हणून सोशल नेटवर्किंग फोप्रमाणे या आपत्तीत आपला खाता वाटा उचलण्याचे ठरवले आणि आणि तिन गावांमधील २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित केले.

▪️ दिवाळी निमित्त गरीब कुटुंबातील २५० स्त्रियांना नवीन साड्या तसेच गृहोपयोगी वस्तूंचे वितरण केले.

▪️ मागील वर्षात शेखर गायकवाड, स्वानंद गोरवाडकर, प्रशांत गायकवाड, डॉ. नीलेश व डॉ. प्रज्ञा नेमाडे. अशोक युनिव्हर्सल स्कुल, ग्लोबल स्कुल, प्रसाद देशपांडे, बाळासाहेब जोशी, पुष्पक निकम, श्रीयश निकम, विनय बिरारी आणि इतर अनेक मान्यवरांकडून किमान ४ ते ५ हजार पुस्तकं वाचनालयांची भेट म्हणून आले आहेत. हे सर्व पुस्तकं वाचनालयांपर्यंत पोहोचवले आहेत.

▪️ जम्मू काश्मीर मधील दुर्गम भागातील आर्मी गुडविल शाळांमधील शेकडो मुलांना शैक्षणिक साहित्य वितरी करण्यात आले. काश्मीर मधील काही गावांमध्ये भारतीय तिरंग्यासाठी फ्लॅग पोस्ट उभारण्यात आले.

या प्रमुख उपक्रमांशिवाय इतरही अनेक उपक्रम मागील वर्षात पूर्ण झाले आहेत. अर्थातच हे सर्व काम एसएनएफ सदस्य, स्वयंसेवक, दाते आणि शुभेच्छुकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शक्य झाले हे आवर्जून नमूद करतो. २०२६ मध्येही हाच विश्वास, सातत्य आणि संवेदनशीलता जपून अधिक प्रभावी काम करूया.
आपणा सर्वांना नविन वर्ष आनंद आणि उत्साहाचे जावो या मनःपूर्वक सदिच्छा ..! 💐💐

आपला,
प्रमोद गायकवाड
सोशल नेटवर्किंग फोरम (SNF)

2025
#2026


गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईची योगविद्या संस्था, एसएनएफ आणि पेठ ICDS कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्य...
24/12/2025

गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईची योगविद्या संस्था, एसएनएफ आणि पेठ ICDS कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यातील १२२ SAM, MAM बालकांसाठी कुपोषण निर्मूलन उपक्रम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत मुलांना आहार तज्ञांच्या सल्ल्याने नियमित पोषक आहार पुरवला जात आहे. या दरम्यान आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्या अखेरीस मुलांच्या वजनात किती वाढ झाली याचा आढावा घेतला. आमच्या या कुपोषण निर्मूलन उपक्रमातील बालकांच्या वजनवाढीचे विश्लेषण हे आमचा उत्साह वाढवणारे आहे.
एकूण १२२ बालकांचे नियमित निरीक्षण करण्यात आले. त्यापैकी ७३ बालकांचे वजन अर्धा किलोपेक्षा अधिक वाढले आहे, ही बाब अत्यंत आशादायक आहे.
वजनवाढीचे निष्कर्ष असे –
▪️ २ किलोपेक्षा अधिक वाढ : ४ बालके
▪️ १.५ ते २ किलो वाढ : ५ बालके
▪️ १ ते १.५ किलो वाढ : २१ बालके
▪️ ०.५ ते १ किलो वाढ : ४३ बालके
▪️ ०.५ किलोपर्यंत वाढ : ४३ बालके
▪️ वजन न वाढलेली : ३ बालके
▪️ वजन घट : २ बालके
▪️ स्थलांतर : १ बालक
फक्त दोन महिन्यांत इतका सकारात्मक बदल दिसून येणे हे पूरक पोषण आहार, वैद्यकीय मार्गदर्शन, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवकांचे सातत्यपूर्ण निरीक्षण आणि आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.
या प्राथमिक माहितीवरून आपण योग्य दिशेने चाललो आहोत हे लक्षात आले. पुढील काळातही हेच सातत्य आणि सहकार्य टिकवून अधिक मजबूत परिणाम साधण्यासाठी योगविद्या, एसएनएफ, ICDS कार्यरत राहील.
सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. 💐🙏
प्रमोद गायकवाड
सोशल नेटवर्किंग फोरम (SNF)





काल माझ्या आणि एसएनएफच्या सहकार्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला.‘आदिवासी लयगाथा’ या माझ्या पहिल्याच पुस्तकाचा प्...
18/12/2025

काल माझ्या आणि एसएनएफच्या सहकार्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला.
‘आदिवासी लयगाथा’ या माझ्या पहिल्याच पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि आयुष्यातील एक स्वप्न साकार झाले. आदिवासी जीवन, त्यांची समृद्ध संस्कृती आणि संघर्षातही आनंदाने जगण्याचा जीवनमंत्र यांचा वेध घेणाऱ्या या पुस्तकाला मान्यवर साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि रसिक वाचकांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा सन्मान मिळाला, हे माझ्यासाठी अत्यंत गौरवास्पद आहे.
या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी सह्याद्रीच्या दर्याखोर्‍यातून आलेल्या आदिवासी बांधवांची उपस्थिती हा अतिशय भावनिक प्रसंग होता. त्यांच्या लयबद्ध नृत्य-वादनाने, पारंपरिक वेषभूषेने आणि उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.
ज्या जीवनशैलीतून, संस्कृतीतून आणि संघर्षातून जी लयगाथा पुस्तकाच्या रूपात साकार झाली,
तीच लय प्रकाशन सोहळ्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे हेच या पुस्तकाच्या प्रकाशनाचं खऱ्या अर्थानं यश आहे.
‘आदिवासी लयगाथा’ या पुस्तकाचा एक खरा हिरो म्हणजे वाघनखी पाड्याचे धुमबाबा... म्हैसमाळ येथील एसएनएफ पाणी प्रकल्पासाठीएक रुपयाही न घेता त्यांनी आपल्या शेतातील जागा दिली. आम्ही लोक पाणी विकत नाही म्हणाले होते ते. जेव्हा त्यांना सन्मानाने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला, तो क्षण कालच्या संपूर्ण सोहळ्याचा सर्वोच्च क्षण ठरला. संपूर्ण सभागृहाने उभे राहून टाळ्यांच्या गजरात आमच्या या हिरोला दिलेली मानवंदना आयुष्यभर लक्षात राहील.
या सोहळ्याला शुभहस्ते उपस्थित राहिलेल्या
मा. श्री. रंगनाथ पठारे,
पद्मश्री सौ. राहिबाई पोपेरे,
खासदार भास्करराव भगरे,
डॉ. कांतीलाल टाटीया,
कुलगुरू प्रा. संजिव सोनवणे
या सर्व मान्यवर मार्गदर्शकांची उपस्थिती माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारी ठरली.
माझ्यावर विश्वास ठेवून ‘आदिवासी लयगाथा’ हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल शब्दालय प्रकाशन आणि विशेषतः सुमती ताई, सुमित व मृण्मयी लांडे यांचे मनःपूर्वक आभार.
या प्रवासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ दिलेल्या प्रत्येकाचे ऋण शब्दांत मांडणे अशक्य आहे. माझ्या लेखनाला अर्थ देणाऱ्या त्या प्रत्येक आदिवासी बांधवांना, त्यांच्या संस्कृतीला आणि त्यांच्या लयीला मनापासून नमन 🙏
ही लयगाथा आपल्यापर्यंत पोहोचली ही मला खुप समाधान देणारी घटना आहे.
आपल्या शुभेच्छा आणि प्रेम असेच कायम राहू द्या… 🙏📖
— प्रमोद गायकवाड
ज्या मित्रमंडळीला प्रकाशन सोहळ्यास उपस्थित रहाता आले नाही त्यांच्यासाठी पुस्तक घेण्याची लिंक खाली देत आहे..
https://shabdalaya.com/product/adivasi-layagatha/

धुळ्याचा उद्योजक मित्र प्रमोद पाटील याने माझ्या “आदिवासी लयगाथा” पुस्तकाच्या १०० प्रती विकत घेऊन ग्रामीण भागातील शाळांना...
18/12/2025

धुळ्याचा उद्योजक मित्र प्रमोद पाटील याने माझ्या “आदिवासी लयगाथा” पुस्तकाच्या १०० प्रती विकत घेऊन ग्रामीण भागातील शाळांना देणार असल्याचे कळवले आहे. मनापासून आभार मित्रा प्रमोद 🙏 तुझ्या या कृतीमुळे दुर्गम भागातील पुढील पिढीला आपल्या प्राचीन सांस्कृतिक मूल्यांचे महत्व कळेल अशी आशा आहे .. तुझा हा पाठिंबा आदिवासी लयगाथाला नक्कीच बळ देणारा आहे. 🌿📚 आदिम लयीचा आरस्पानी अनुबंध आदिवासी लयगाथा लेखक - प्रमोद गायकवाड शब्दालय प्रकाशन नोंदणीसाठी संपर्क करा. 9011201414 https://shabdalaya.com/product/adivasi-layagatha #आदिवासीलयगाथा

आज माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण… ‘आदिवासी लयगाथा’ हे माझं पहिलंच पुस्तक अखेर माझ्या हातात आलं.... आयुष्यभर शेकडो...
10/12/2025

आज माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण… ‘आदिवासी लयगाथा’ हे माझं पहिलंच पुस्तक अखेर माझ्या हातात आलं.... आयुष्यभर शेकडो पुस्तकांची पानं उलटताना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की एक दिवस आपल्या नावाचंही पुस्तक छापील अक्षरात पाहायला मिळेल.
शब्दालय प्रकाशनच्या सुमतीताई लांडे यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासातून हे स्वप्न आकाराला आलं. रंगनाथ पठारे सरांचे प्रोत्साहन, लेखक मित्र दत्ता पाटलांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा—या सर्वांच्या साथीनं माझ्यासारख्या ‘अलेखक’ व्यक्तीकडून हे लेखन घडलं. शब्दालयचे संचालक सुमीत लांडे, मृण्मयी लांडे आणि संजोत बानूबाकडे यांनी आज हे पुस्तक माझ्या हातात दिलं हा क्षण आयुष्यभर लक्षात राहिल..
आदिवासी बांधवांमध्ये जन्मजात रुजलेली नैसर्गिक आणि सांस्कृतिक लय मी कितपत शब्दात पकडू शकलो, वाचकांना हे पुस्तक आवडेल कि नाही.. मला माहीत नाही. पण आज स्वतःचं पुस्तक हातात धरण्याचा आनंद… ही भावना शब्दांच्या पलीकडची आहे.
बस, एवढंच पुरे आहे सध्या…
- Pramod Gaikwad


#आदिवासीलयगाथा

एसएनएफ, ICDS आणि मुंबईची योगविद्या संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या कुपोषण निर्मूल...
04/12/2025

एसएनएफ, ICDS आणि मुंबईची योगविद्या संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेचा तिसरा महिना यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील SAM आणि MAM श्रेणीतील कुपोषित मुलांना पौष्टिक आहार पुरवण्याचे काम ऑक्टोबर २०२५ पासून सुरू आहे. आज तिसऱ्या महिन्याचा आहार संबंधित बालकांपर्यंत पोहोचवण्यात आला असून, अनेक बालकांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ICDS टीम आणि योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन, मुंबई यांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम प्रभावीपणे राबवता येत आहे. ग्रामीण आणि आदिवासी बालकांच्या आरोग्यासाठी घेतलेला हा छोटासा प्रयत्न भविष्यात मोठा बदल घडवेल, अशी आम्हाला खात्री आहे.

टीम सोशल नेटवर्किंग फोरम (SNF)
- कुपोषणमुक्त पेठ तालुक्याकडे वाटचाल

The joint malnutrition eradication drive by SNF, ICDS & Yoga Vidya (Mumbai) has successfully completed 3 months in Peth Taluka. Since Oct 2025, nutritious food is being provided to SAM & MAM children, and many are now showing remarkable improvement.

Heartfelt thanks to ICDS & Yoga Vidya for their strong support. Together, we move towards a malnutrition-free Peth.

🚲 कुळवंडी माध्यमिक विद्यालयात १९ मुलींना नव्या सायकलींचे वाटप! 💚नाशिक प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ संघटना यांच्या म...
12/11/2025

🚲 कुळवंडी माध्यमिक विद्यालयात १९ मुलींना नव्या सायकलींचे वाटप! 💚

नाशिक प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ संघटना यांच्या माध्यमातून SNF च्या सहकार्याने पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील कुळवंडी माध्यमिक विद्यालयातील १९ गरजू विद्यार्थिनींना नव्या सायकलींचे वितरण करण्यात आले.

कुळवंडी आणि परिसरातील ससूने, घनशेत, खराडीपाडा, हट्टीपाडा व कडवईपाडा या गावांमधील विद्यार्थिनींना दररोज ३ ते ६ किलोमीटर पायी शाळेत यावे लागत होते. वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने अनेकदा त्यांना शाळेला अनुपस्थित राहावे लागते. ही समस्या लक्षात घेत मुलींना सायकल देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नाशिक प्रसूतीशास्त्र संघटनेचे सदस्य डॉ. पंकज भदाणे आणि डॉ. समीर पवार यांच्या विशेष प्रयत्नातून दानशूर लोकांच्या सहकार्याने सायकल्स खरेदी करून १९ विद्यार्थिनींना सुपूर्द करण्यात आल्या.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींचा प्रवास सुलभ होईल, शिक्षणासाठी अधिक वेळ मिळेल आणि त्या अधिक सक्षम होतील — हीच आमची खरी प्रेरणा! 🌻

उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टरांप्रती आणि दानशूर व्यक्तींच्या सामाजिक संवेदनशीलतेबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
डॉ. हार्दिक पटेल, डॉ. अभिजित कपोते, डॉ. अक्षय सारडा, डॉ. सुनील शेजवळ, डॉ. सागर दुकले, डॉ. अभिजित इंगळे, डॉ. अतुल अग्रवाल, डॉ. संदीप बढे, डॉ. सुदर्शन पाटील, डॉ. अभिषेक बागुल, डॉ. राहुल सोनावणी, श्री किशोर काळे, श्री. राजेश बोहरा, शिवशक्ती सायकल्स, गायत्री ट्रान्सपोर्ट

प्रमुख पाहुणे : स्त्रीरोग संघटना ट्रस्टचे चेअरमन डॉ. वसंत कवडे, SNF चे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, सरपंच सौ. नंदाताई सहारे, डॉ. समीर पवार, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. पंकज भदाणे, डॉ. मिलिंद भदाणे, डॉ. अपर्णा गुंजाळ, डॉ. प्रविणा पवार आणि डॉ. ऋषिकेश कुटे, डॉ. मोहन गायकवाड.

— प्रमोद गायकवाड
Social Networking Forum (SNF)

Last month, SNF, in collaboration with Yogvidya Sanstha, Mumbai, launched a Malnutrition Eradication Program in Peth Tal...
07/11/2025

Last month, SNF, in collaboration with Yogvidya Sanstha, Mumbai, launched a Malnutrition Eradication Program in Peth Taluka.

All nutritious food packets and protein powder boxes for the month of November have been successfully handed over to the respective Anganwadi Tai in the presence of ICDS Officer Pandit Wakde and SNF representatives.

The feeding process has already begun, and we are glad to share that both the children and their parents are very happy with the arrangements. Through regular reports, we are closely monitoring the implementation to ensure that every child receives proper nutrition.

Ramdas Shinde (Peth Taluka Coordinator, SNF) and Sandeep (Manager) are efficiently coordinating this initiative.

💚 Notably, reports indicate a satisfactory increase in the weight of several children.

Heartfelt thanks to everyone for your continued cooperation and support! 🙏

— Pramod Gaikwad
Social Networking Forum (SNF)

🌿 ज्ञानाच्या दीपाची नवी ज्योत — आडगाव भुवन वाचनालय उद्घाटन...मागील वर्षी एसएनएफने ॲस्ट्रल फाऊंडेशनच्या सहकार्याने पेठ ता...
26/10/2025

🌿 ज्ञानाच्या दीपाची नवी ज्योत — आडगाव भुवन वाचनालय उद्घाटन...

मागील वर्षी एसएनएफने ॲस्ट्रल फाऊंडेशनच्या सहकार्याने पेठ तालुक्यातील आडगाव भुवन येथील पाणीप्रश्न सोडवला होता. त्या योजनेच्या लोकार्पणावेळी गावातील तरुणांनी सांगितले “आमच्या गावात एक वाचनालय हवंय, स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करायला आणि लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून...”

सोबत उपस्थित असलेले ॲस्ट्रल फाऊंडेशनचे श्री. अनिकेत धुरी यांनी लगेच पुढाकार घेतला. अहमदाबादला परतल्यावर त्यांनी आपल्या सिएसआर टीमशी चर्चा करून वाचनालयासाठी निधी मंजूर केला. अलिकडेच त्या संकल्पनेचं रूपांतर एक सुंदर वास्तवात झालं. काल आडगाव भुवन वाचनालयाचे दिमाखदार उद्घाटन एसएनएफचे मार्गदर्शक जिवनदादा सोनवणे, सरपंच सौ. गावित यांच्या हस्ते संपन्न झाले!

हे सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून सुरू झालेले 29 वे वाचनालय असून आज या वाचनालयांमुळे आदिवासी आणि ग्रामीण भागात शिक्षणाची नवी दारे उघडली आहेत — ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
अर्थातच या कार्यामागे ठामपणे उभे असलेल्या सर्व देणगीदारांच्या विश्वासाच्या बळावर ही वाटचाल चालू आहे.
ॲस्ट्रल फाऊंडेशनचेही आभार! त्यांनी आजपर्यंत ३ वाचनालयांच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे.

कालचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेठ तालुका समन्वयक रामदास शिंदे सर, ग्रामसमन्वयक नेताजी गावीत आणि संदिप डगळे यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

✨ ज्योतसे ज्योत जोडत एसएनएफ ज्ञानाचे दीप लावत आहे हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे..! ✨

— प्रमोद गायकवाड, नाशिक
टिम सोशल नेटवर्किंग फोरम (SNF)

काल पेठ तालुक्यातील करंजाळी येथे १२५ बालकांच्या कुपोषणमुक्तीचा जागर सुरु करून समाधानाने नाशिकला परतलोय...  जेंव्हा जेंव्...
04/10/2025

काल पेठ तालुक्यातील करंजाळी येथे १२५ बालकांच्या कुपोषणमुक्तीचा जागर सुरु करून समाधानाने नाशिकला परतलोय...
जेंव्हा जेंव्हा आदिवासी भागात जातो तेंव्हा तिकडे दिसणारी कुपोषित मुलं बघून वाईट वाटतं. एकविसाव्या शतकातही आपल्या आयांच्या कुशीत विसावलेली ही कमी वजनाची बाळं बघावी लागणं तसं भूषणावह नाहीच पण व्यवस्थेला दोष देत आपण स्वस्थ बसून राहणंही योग्य नाही. याच भूमिकेतून गेली अनेक वर्षे एसएनएफ कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे. आमच्या या प्रयत्नांना अनेक मदतीचे हातही पुढे येत आहेत. त्यातूनच सोशल नेटवर्किंग फोरम, योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन, साऊथ मुंबई आणि ICDS यांच्या सहकार्याने पेठ तालुक्यात कुपोषण निर्मूलनासाठी एक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू झालाय. या उपक्रमातून १२५ बालकांना वर्षभर सकस आहार देऊन कुपोषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. अर्थातच यात अनेक अडचणीही येतील पण कोणते काम विना अडचण पूर्ण होते ? येतील त्या अडचणींवर मात करत पुढे जाण्याचा आम्ही निर्धार केला आहे.

या उपक्रमासाठी वर्षभराकरिता २४ लाखांचा निधी उपलब्ध करून योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन, साऊथ मुंबई यांनी बळ दिले. ICDS चे अधिकारी पंडित वाकडे आणि त्यांच्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी ताईंचे या उपक्रमात विशेष सहकार्य लाभणार आहे. पेठ तालुका वैद्यकीय डॉ. मोरेही या कामात आपले योगदान देत आहेत. एसएनएफचे पेठ तालुका समन्वयक रामदास शिंदे यांनी वाटप आणि कागदपत्रांची पूर्तता यांची जबादारी घेतली आहे. एसएनएफचे मेडिकल प्रोजेक्ट प्रमुख डॉ. पंकज भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. डॉ. समीर पवार यांनी अतिशय अल्पदरात प्रोटीन पावडर उपलब्ध करून देण्यात मदत केली. मित्रवर्य राजीव भामरे यांनी अतिशय कमी दरात पोषण आहार उपलब्ध करून दिला. या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद.

योग विद्याचे श्री. शिवा मुथुस्वामी व श्री. शैलेश भेडा हे मुंबईहून येऊन करंजाळी येथे झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहिले व आम्हाला प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने पेठ तालुक्यातील बालकांना उज्वल आणि निरोगी भविष्य नक्कीच मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. 🌿

👉 चला, एकत्र येऊया आणि कुपोषणमुक्त पेठ तालुका घडवूया!



- प्रमोद गायकवाड
टिम सोशल नेटवर्कींग फोरम
Mob : 9422769364
Email : [email protected]

Address

President, Social Networking Forum, Vithhal Charani Sankul, Opp Big Bazar, College Road
Nashik
422005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Social Networking For Social Cause posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Social Networking For Social Cause:

Share