06/03/2026
नमस्कार !
पुढील स्पर्धेचे निवेदन आपल्यापर्यंत पोहोचले असेलच !
सदर निवेदनातील कविता पाठवण्याच्या नंबर मध्ये तांत्रिक चूक होती !
बदललेल्या नंबर सह सुधारित निवेदन पाठवत आहोत !
कृपया सहकार्य करावे ही विनंती !
👇🏻
*नाशिक रेडक्रॉस च्या वतीने महिला*
*दिनानिमित्त खुली काव्य लेखन स्पर्धा*
नाशिक : इंडियन रेडक्रॉस सोसायटी , नाशिक जिल्हा शाखेने जागतिक महिला दिनानिमित्त फक्त महिलांसाठी खुली काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे . १८ वर्षावरील वयोगटातील महिलांनी आपली एक स्वलिखित आणि जास्तीतजास्त पाच ते सहा कडव्यांची कविता गुरुवार दि. १२ मार्च रोजी एक वाजेपर्यंत
*८२०८११२०८८*
या मोबाईल क्रमांकावर जेपीजी अथवा पीडीएफ फाईलमध्ये पाठवावी किंवा सदर कवितेच्या दोन प्रती रेडक्रॉस इमारत , टिळक पथ ( रविवार कारंजा जवळ ) , नाशिक येथे १२ मार्च रोजी दुपारी एक पर्यंत पोहोचवाव्यात. महिला सबलीकरण तसेच सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या कवितांना प्राधान्य देण्यात येईल . स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पाच कवितांना आकर्षक ट्रॉफीज प्रदान करण्यात येतील . याशिवाय निवडक वीस कवितांना मेडल्स द्वारा सन्मानित करण्यात येईल . काव्यलेखन स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. स्पर्धेचे नियम व अधिक माहितीसाठी
*९४२२२४८३८०*
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रेडक्रॉस चेअरमन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, सचिव डॉ . सुनील औंधकर , कोषाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा , व्हाईस चेअरमन डॉ. चंद्रशेखर नामपूरकर , उपक्रम समन्वयक डॉ . प्रतिभा औंधकर आदींनी केले आहे .