Samyak Vidyarthi Andolan Nashik

Samyak Vidyarthi Andolan Nashik संविधानिक तत्वांवर चालणारी विद्यार्थ्यांची संघटना...

📢 विद्यार्थिनींच्या न्यायासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदननाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंतीनिमित्त ...
17/02/2026

📢 विद्यार्थिनींच्या न्यायासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन

नाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृह, दुर्गानगर, पंचवटी येथील गंभीर प्रश्नांबाबत आज समाजकल्याण विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले.
गृहपाल श्रीमती विजयश्री बाबर यांच्यावरील चौकशी अहवाल जाहीर करून दोषींवर कठोर कारवाई करावी, प्रलंबित निर्वाह भत्ता तात्काळ वितरित करावा तसेच विद्यार्थिनींसाठी योग्य निवास व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा ठाम मागण्या करण्यात आल्या.
यावेळी मोठ्या संख्येने पीडित विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष दीपक (दादा) पगारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मिहिर गजबे ,आदित्य निर्भवणे, वैष्णवी पाटील, भूमिका केदारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
✊🔥!

06/02/2026

📢 सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक कडून निवेदन
नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात सहभागासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट पॉइंट्स देण्याच्या प्रस्तावाविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिव मा. संजय सानप सर यांना निवेदन देण्यात आले.
सहाय्यक कुलसचिवांनी स्पष्ट केले की, अद्याप विद्यापीठाकडून असा कोणताही अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आलेला नाही. मात्र, दिलेल्या निवेदनावर गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांच्या भूमिकेचा विचार करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
✊🏽 संविधानिक मूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष सुरू!

वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिककडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिवांना निव...
06/02/2026

वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिककडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिवांना निवेदन.

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात सहभागा होण्यासाठी विद्यार्थ्यांना श्रेयांक (क्रेडिट पॉइंट्स) देण्याचा प्रस्ताव हा अत्यंत चिंताजनक व शैक्षणिक दृष्टिकोनातून चुकीचा असल्याचे मत व्यक्त करत सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, विद्यापीठ ही धर्मनिरपेक्ष संस्था असून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी अधिकृत (परिपत्रक) सर्क्युलर काढून विद्यार्थ्यांना श्रेयांक देण्याचे आमिष दाखवणे हे विद्यापीठाच्या नियमावलीच्या तसेच संविधानिक मूल्यांच्या विरोधात आहे. अशा निर्णयांमुळे धार्मिक कार्यक्रमात सहभागी न होणाऱ्या किंवा पूर्णतः शिक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल व त्यांच्यावर अप्रत्यक्ष रित्या दबाव निर्माण होईल.
या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव मा. संजय सानप सर यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी स्पष्ट केले की, अद्याप असा कोणताही अधिकृत परिपत्रक (सर्क्युलर) विद्यापीठाकडून काढण्यात आलेलं नाही. मात्र, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिलेले निवेदनवर गांभीर्याने विचार करून या विषयावर काम करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांच्या भूमिकेचा विचार करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
स्वयंस्फूर्तने जे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छितात, त्यांच्या सहभागाचा स्वतंत्र विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाची भूमिका योग्य असल्याचे सांगत ती भूमिका विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
या प्रतिनिधीमंडळात - मिहिर गजबे (जिल्हाध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक), गौतमी धिवरे, वैष्णवी पाटील, सुरज पाटील, दीपेश वाव्हाळ, आदित्य निर्भावणे, प्रज्ञा जाधव, स्वामी होळकर, नागेश गोणेकर यांचा सहभाग होता.

गिरीश महाजन यांनी २६ जानेवारीला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेऊन संविधान आणि बाबासाहेबांचा अवमान केला. त्या विरोधात नाशि...
04/02/2026

गिरीश महाजन यांनी २६ जानेवारीला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेऊन संविधान आणि बाबासाहेबांचा अवमान केला. त्या विरोधात नाशिकमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाने पूर्ण ताकदीने जनआक्रोश मोर्चात सहभाग घेत ठाम विरोध नोंदवला.
संविधान, सामाजिक न्याय आणि बाबासाहेबांच्या विचारांवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याविरोधात विद्यार्थी चळवळ ठामपणे उभी आहे.
हा संघर्ष केवळ एका व्यक्तीविरोधात नाही, तर समतेच्या मूल्यांवर आधारित लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे.
✊🏽 जय भीम
✊🏽 जय संविधान

24/11/2025

When Samyak is on the ground✌🏻🔥

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक - 2025प्रमुख मार्गदर्शक:सुजातदादा आंबेडकरयुवा नेते, वंचित बहुजन आघाडीएक संधी - वंचित समा...
22/11/2025

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक - 2025

प्रमुख मार्गदर्शक:
सुजातदादा आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी

एक संधी - वंचित समाजाला सत्तेत सहभागी करण्यासाठी

एक संधी - वंचित बहुजन आघाडीला ✊
❤️

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक - 2025प्रमुख मार्गदर्शक:सुजातदादा आंबेडकरयुवा नेते, वंचित बहुजन आघाडीएक संधी - वंचित समा...
22/11/2025

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक - 2025

प्रमुख मार्गदर्शक:
सुजातदादा आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी

एक संधी - वंचित समाजाला सत्तेत सहभागी करण्यासाठी

एक संधी - वंचित बहुजन आघाडीला ✊
❤️

ज्ञान, इतिहास आणि प्रेरणेचा सुंदर संगमसम्यक विद्यार्थी आंदोलन – नाशिक यांच्या वतीनेत्रिरश्मी बुद्ध लेणी, नाशिक येथे रविव...
21/09/2025

ज्ञान, इतिहास आणि प्रेरणेचा सुंदर संगम

सम्यक विद्यार्थी आंदोलन – नाशिक यांच्या वतीने
त्रिरश्मी बुद्ध लेणी, नाशिक येथे रविवार, 21 सप्टेंबर 2025 रोजी
“एक दिवसीय लेणी अभ्यास कार्यशाळा” यशस्वीपणे पार पडली.

या कार्यशाळेत त्रिरश्मी बुद्ध लेण्यांचा इतिहास, चैत्यगृह व विहार रचना, शिल्पकला आणि शिलालेखांचा सखोल अभ्यास करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता, प्रेरणादायी गीते आणि कलागुण सादर करत वातावरण अधिक समृद्ध केले.

मार्गदर्शनासाठी इतिहास व लेणी अभ्यासक आयु. संतोष आंभोरे (दान पारमिता फाऊंडेशन) उपस्थित होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना वारशाची जाण, इतिहासाची गोडी आणि आत्मविश्वास मिळाला.

हा उपक्रम विद्यार्थ्यांना ज्ञान, कला आणि संस्कृतीचा संगम अनुभवण्याची अनोखी संधी ठरला.

#त्रिरश्मीलेणी #सम्यकविद्यार्थीआंदोलन #ज्ञानआणिप्रेरणा #नाशिक

सम्यक विद्यार्थी आंदोलन संघर्षाचा हुंकार ✊✨🛑 सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिक संघटनेच्या हुंकारापुढे जातीयवादी मानसिकता असल...
10/09/2025

सम्यक विद्यार्थी आंदोलन संघर्षाचा हुंकार ✊✨

🛑 सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिक संघटनेच्या हुंकारापुढे जातीयवादी मानसिकता असलेली व भ्रष्टाचारी गृहपाल यांची तात्काळ नाशिकमधून बदली करण्यात आली आहे💯

हे यश फक्त सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिक संघटनेचे नसून संपूर्ण शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचे सुद्धा आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष चेतनजी गांगुर्डे, वंचित बहुजन युवा आघाडी महानगर महासचिव दीपकभाऊ पगारे तसेच वंचित बहुजन आघाडी, नाशिक जिल्हा यांचेदेखील हे यश आहे.

✊🏽 सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकवसतिगृह ही आमच्या क्रांतीची आणि सामाजिक परिवर्तनाची पायरी आहे. मागासवर्गीय विद्यार्थी स...
09/09/2025

✊🏽 सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक

वसतिगृह ही आमच्या क्रांतीची
आणि सामाजिक परिवर्तनाची पायरी आहे. मागासवर्गीय विद्यार्थी स्वतःच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदू म्हणून वसतिगृहांना मानतात. मात्र, संघटनेकडे प्राप्त झालेली तक्रार ही सामाजिक स्वास्थ्यावर काळिमा फासणारी आहे.

आम्ही सातत्याने विषमतावादी मानसिकतेविरुद्ध लढत आलो आहोत. डॉ. रोहित वेमुला आणि डॉ. अनिथा यांच्या प्रकरणांनी संस्थानिक जातीवाद समाजापुढे सिद्ध केला आहे. आणि आता वसतिगृहेही त्याला अपवाद नाहीत, असे आम्हाला या प्रकरणानंतर मान्य करावे लागत आहे.

जोपर्यंत मुलींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत सम्यक विद्यार्थी आंदोलन त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहील!

📰 या प्रकरणाची दखल घेऊन समाजासमोर मुद्दा मांडल्याबद्दल प्रसारमाध्यमांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.

#सम्यकविद्यार्थीआंदोलन







सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकविषय : शासकीय मुलींच्या वसतिगृहातील गैरप्रकारांविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ठाम आवाज...
08/09/2025

सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक
विषय : शासकीय मुलींच्या वसतिगृहातील गैरप्रकारांविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ठाम आवाज
नाशिक (दि. ०८ सप्टेंबर २०२५) –
१२५ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी वसतिगृहातील गंभीर गैरप्रकार व अमानवी वर्तनाविरोधात आज एकत्र येऊन सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे जोरदार आवाज उठवला.
सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक तर्फे दिलेल्या निवेदनानुसार –
विद्यार्थिनींना वारंवार शिवीगाळ, जातीवाचक वक्तव्ये व अपमानास्पद शब्दांचा सामना करावा लागतो.
वसतिगृहात दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असून त्यात झुरळे, किडे, माती यांचा समावेश आढळतो.
विद्यार्थिनींसाठी आलेले अन्नपदार्थ अपहार करून वैयक्तिक वापरासाठी वळवले जातात.
स्वयंपाकघर व वसतिगृहात अस्वच्छता असून त्यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
विद्यार्थिनींच्या तक्रारींना प्रतिसाद देण्याऐवजी त्यांना दाबून टाकले जाते व दडपशाही केली जाते.
निधी व निर्वाह भत्त्यामध्ये अफरातफर होत असून मुलींना हक्काचे पैसे मिळत नाहीत.
या सर्व प्रकारांमुळे वसतिगृहातील वातावरण असुरक्षित, तणावपूर्ण व शैक्षणिकदृष्ट्या अडथळा आणणारे झाले आहे.
विद्यार्थिनींच्या ठाम मागण्या :
१. संबंधित गृहपाल अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून चौकशी सुरू करावी.
२. वसतिगृहातील जेवण, सुरक्षा व सुविधा सुधाराव्यात.
३. निधी व निर्वाह भत्ता गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.
आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिक जिल्हाध्यक्ष मा. मिहिर प्रमोद गजबे यांनी केले.
या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष चेतनदादा गांगुर्डे, वंचित बहुजन युवा आघाडी महानगर महासचिव दीपकभाऊ पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच धम्मगौतमी धिवरे, सुरज दीक्षा सुदाम, आदित्य बाळासाहेब निरभवने, सुरज भालेराव, आशिष तेलगोटे व वसतिगृहातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक संघटनेचा इशारा –
जर यावर त्वरित कारवाई झाली नाही, तर मोठ्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल.
निवेदन स्वीकारणारे अधिकारी :
मा. देविदास नांदगावकर, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samyak Vidyarthi Andolan Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samyak Vidyarthi Andolan Nashik:

Share