जनकल्याण संकुल समिती,उत्तमनगर ,नासिक JSS,uttamnagar

  • Home
  • India
  • Nashik
  • जनकल्याण संकुल समिती,उत्तमनगर ,नासिक JSS,uttamnagar

जनकल्याण संकुल समिती,उत्तमनगर ,नासिक JSS,uttamnagar सेवा ,शिक्षण,संस्कार,आरोग्य,कृषी,स्वा?

रा.स्व.संघ जनकल्याण समिती,नासिक संचालित
जनकल्याण संकुल समिती,उत्तमनगर
- : उपक्रम :-
१)रुग्णोपयोगी साहित्य केंद्र,( स्थापना-२००६)
अनामत तत्वावर विनाशुल्क हे केंद्र चालवले जाते
२)आरोग्य चिकित्सा शिबिर
या शिबिराचे आयोजन वर्षातून किमान ३ वेळा केले जाते.
३)आयुर्वेदिक दवाखाना
सकाळी ९.३० ते १२.३० व साय. ५.३० ते ९.००
सहकार्य - डॉ .श्री.व सौ.टोपे
४)सावित्रीबाई फुले मुलींची अभ्या

सिका
स्थापना - २० जुल्लै २०१३
नासिक जिल्ह्यातील एकमेव मुलींची अभ्यासिका
५)प्रशिक्षण व प्रभोधन विभाग
विविध घटकासाठी प्रशिक्षण व प्रभोधन वर्गाचे आयोजन
*सप्टेम्बर २०१३ पासुन दर महिन्याच्या तिसर्या रविवारी सायंकाळी७.०० ते ८.३०
स्वामी विवेकानन्द प्रशिक्षणमालेचे तरुणाच्या व्यक्तिमत्व विकास सेमिनारचे ..आयोजन ते सप्टेम्बर २०१४ पर्यंत *
आत्तापर्यंत
अ)आरोग्य रक्षक प्रशिक्षण सलग ७ वर्ष (१९९९ ते २००५)
ब)वर्षातुन विविध स्पर्धा चे आयोजन संस्कार वर्ग चे माध्यामातुन
क) नातु आजी ,सिद्धये काकू ,जोशी ताई,शैलजा ताई या सेवाव्रती च्या सम्पर्कातून
महिलांच्या प्रबोधन पर नियमित वर्ग (१९९८ ते २००६ )
ड)लक्ष्मिपुजननिमित्त दर वर्षी व्याखानाचे आयोजन (व्याखाते-प्रा.श्री.विनायक ..गोविलकर सर,श्री.पाटील विवेकानन्द केंद्र,श्री.रविंद्र बडवे गुरुजी,
श्री.समीर देव) (२०१० ते २०१३)
इ)श्री.मोहन पवार सर संमोहन तज्ञ यांचे POWER of MIND ट्रेनिंगचे रोज ३ तास असे ७ दिवसाचे ट्रेनिंग चे आयोजन (२०१२)
६)अन्नपूर्णा योजना
प्रत्यक महिन्याच्या दि.२२ ला सकाळी ९.३० ला डब्याचे संकलन (७ पोळ्या व भाजी )त्याचे सिव्हील हॉस्पिटलमध्ये वितरण ( महिन्यातील सर्व दिवस अन्नपूर्णा योजना नासिक च्या वतीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये डबा वितरण चालू आहे)
७) जनकल्याण वाचनालय ( २००० च्या वर पुस्तके उपलब्ध)
सायंकाळी ५.०० ते 9.०० पुस्तक बदलता येतील
८) स्पर्धा परिक्षा वाचनालय
MPSC, UPSC इत्यादी स्पर्धा परिक्षा साठी पुस्तके उपलब्ध
सकाळी ७.३० ते सायंकाळी ७.३० सुरु
यात पुस्तके घरी नेता येणार नाही.
9) कौटोबिक समस्या निवारण व समुपदेशन केंद्र
३० वर्षांचा समुपदेशनाचा अनुभव असलेले तज्ञ श्री मोहन पवार सर यांचे मार्गदर्शन
शनिवार सकाळी 9.०० ते ११.००
१०) ई-लायब्ररी ( नियोजित )
११) महिला व्यायाम शाळा (JIM) ( नियोजित )

RSS jankalyan samiti
Bank of maharashtra
canada cornar branch
,nashik

A/c No- 20046679851

ISFC code - MAHB 0000672

आपण आपली मदत online ट्रान्स्फर करू शकता.

06/12/2025

🌹 *ज्योतिष शिकायचंय...*
*ऑनलाईन ज्योतिष वर्ग*
🌷 सोमवार दिनांक 15 डिसेंबर पासुन प्रवेश सुरु
🌹रात्री 9 ते 10
गुगलमीट वर...

👉 ज्योतिष वर्गात काय शिकविणार..
👉वर्गाचा कालावधी...
वर्गाची फी...
👉परीक्षा कधी होणार...
👉स्वाध्याय पण द्यावा लागतो का...
👉मला जमेल काय...
👉पात्रता काय...
👉इत्यादी अनेक प्रश्नांची❓ उत्तरे या तासाला मिळतील...

🚩 *ज्योतिष अभ्यास मंडळ, नविन नाशिक*
हि संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे नोंदणी कृत आहे.
गेल्या 2006 पासुन..किंबहुना त्या अगोदर 2001
पासुन ज्योतिष वर्ग सुरु....
1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ज्योतिष शास्त्राची ओळख करून देण्यात मंडळ यशस्वी झाले.
*"ज्योतिष शास्त्री"* या महाराष्ट्र राज्य स्थरीय परीक्षेत ज्योतिष गणितात विद्यार्थी प्रथम, तसेच विशेष श्रेणित अनेक विद्यार्थी उत्तीर्ण अश्या परंपरा लाभलेल्या संस्थेत प्रवेश घेऊ या...

🚩 *चला तर या नामांकित संस्थेत प्रवेश घेऊ या...*

*खालील लिंक ला कनेक्ट होऊ या.. ग्रुप मध्ये जॉईन होऊ या...*
*सुस्वागतम...*
🌹🌹🌹🌹🌹🌹

इतर सुचना ग्रुपवर देण्यात येतील
🙏
आपलेच ज्योतिष आचार्य
🕉️अनिल चांदवडकर(ज्योतिष धर्माचार्य)
98900 03827
संस्थापक कार्याध्यक्ष
🕉️ भरत होसिंग
98903 31155
🕉️भिकन अहिरराव
99223 77913
🕉️ रविंद्र बाग
94234 80945
🕉️गोविंद शास्त्री
86053 14062
🕉️प्रशांत चौधरी
98502 81917
🕉️श्रीरामचंद्र जोशी
91750 71963
🕉️ प्रशांत वाघ
92846 46140

01/09/2025

जरा विचार करा....

12/05/2025

श्रद्धेय डॉ. आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

07/01/2025

🚩प्राचीन भारताचे प्रभावी व्यवस्थापन🚩
अनेक ठिकाणी मला भारतीय ज्ञान परंपरेवर बोलायला जावं लागतं. त्या प्रत्येक ठिकाणी मी प्रोफेसर अंगस मेडिसन यांचा आवर्जून उल्लेख करतो. या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाने, जागतिक अर्थव्यवस्थेवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. या पुस्तकात त्यांनी अनेक संदर्भ देऊन, आकडेवारीने हे सिद्ध करून दाखवलंय की भारत हे एकेकाळी जगातलं सर्वात श्रीमंत राष्ट्र होतं. जगाच्या एकूण व्यापाराचा एक तृतीयांश व्यापार, भारतीय करायचे आणि जगाच्या संपत्तीच्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त संपत्ती ही एकट्या भारताजवळ होती.

विदेशी आक्रांता भारतात येण्यापूर्वी आपण किती संपन्न आणि समृद्ध होतो, याचा हा खणखणीत पुरावा आहे.

हे सर्व वाचताना एक लहानसा प्रश्न पडतो. आपण जगात सर्वात जास्त व्यापार करायचो. आपली जहाजं ही अक्षरशः लॅटिन अमेरिकेपर्यंत जायची. आपल्या वस्तूंचा दर्जाही उच्च कोटीचा होता. आपण तयार करत असलेली वस्त्रं विकत घ्यायला देशोदेशींच्या राजे - महाराजांच्या उड्या पडायच्या. आपण मानवी कौशल्य थक्क होईल अशी मंदिरं, महाल आणि राजप्रासाद बांधले. अत्यंत सुरेख असे जगातले सर्वात मोठे प्रार्थना स्थळ (अंगकोर वाट हे मंदिर) उभारले. अनेक धातूंचा शोध लावला. तंत्रज्ञानात आघाडी घेतली.

मग आपण हे सर्व 'मॅनेज' कसं करत असू..?

आपल्या पूर्वजांनी व्यवस्थापनाचं (मॅनेजमेंटचं) अधिकृत शिक्षण घेतलं होतं का? की पूर्वी तक्षशिला, आणि नंतर नालंदा, उड्डयंतपुर सारख्या विद्यापीठांमधून व्यवस्थापन (प्रबंधन) हा विषय शिकवायला होता ? असे अनेक प्रश्न. अत्यंत काटेकोर, चोख, उत्कृष्ट असं काम आपण केलं, हे तर नक्की. मग हे कसं करता आलं? आज जसं 'बिझिनेस स्कूल' किंवा 'मॅनेजमेंट इंस्टीट्यूट्स' मधून शिकून आलेलेच तरुण-तरुणी काम सांभाळू शकतात, चांगल्या प्रकारे कंपनी चालवू शकतात, तसंच त्या काळात काही होतं का?

एक मात्र नक्की की प्राचीन शिक्षण पद्धती बद्दल जी काय माहिती मिळाली आहे, त्यात व्यवस्थापन (प्रबंधन) असे वेगळे विषय नव्हते. व्यवस्थापन शिकवणाऱ्या वेगळ्या संस्था नव्हत्या. आणि तरीही आपले पूर्वज, जगात भव्य-दिव्य असं साकारत होते. त्या काळातली सर्वात मोठी गलबतं, जहाजं तयार करून इतर देशांना विकत होते. नवनवीन शोध लावत होते. आणि चोख व्यापारही करत होते.

हे ते कसं करत होते, हे समजून घ्यायचं असेल, तर आजचा 'मॅनेजमेंटचा' चष्मा काढून त्या संपूर्ण प्रक्रियेला बघायला हवं.

त्या काळात 'व्यवस्थापन' हा विषय म्हणून सरळ - सरळ शिकवला जात नव्हता. व्यवस्थापनाच्या सर्व गोष्टी या अप्रत्यक्षपणे, परंतु अत्यंत प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या.

यात 'उपनिषद' हे एक महत्त्वाचं माध्यम होतं. किमान ४,००० ते ७,००० वर्षांपूर्वी, आपल्या पूर्वज ऋषी-मुनींनी साधारण १०८ उपनिषदं लिहिली. यातील १० प्रामुख्याने शिकली जायची / शिकवली जायची. आज आपण उपनिषद, गीता, भागवत वगैरे गोष्टी म्हणजे निवृत्ती नंतर अभ्यासाच्या धार्मिक गोष्टी, असं समजतो. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी धर्माचा अर्थही वेगळा होता. कर्मकांड कमी होती. एक चांगली, उच्च आदर्शांनी प्रेरित असलेली उदात्त जीवनशैली म्हणजेच धर्म होता. मुलं - मुली शिकायला गुरुकुलात जायची. तिथेच त्यांची ओळख उपनिषदांशी करून दिल्या जायची. उपनिषद म्हणजे क्लिष्ट संकल्पनांचं 'बोअरिंग' बाड नव्हतं, तर गोष्टी वगैरे असलेले, लहान - लहानसे ग्रंथ होते. मात्र त्यातून मिळालेला संदेश, ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा असायची.

आधुनिक 'मॅनेजमेंट'चं वारं हे प्रामुख्याने अमेरिकेतून सुरू झालं. अमेरिका हा तसा पूर्णपणे व्यापारी देश. त्या देशाची मूळ संस्कृती, तिथल्या 'नेटिव्हांची' संस्कृति, ही युरोपातून आलेल्या लोकांनी पार गाडून टाकली. त्यामुळे युरोपातून, व्यापारात बंपर फायदा मिळवायला निघालेल्या लोकांचा मंत्र हा 'पैसा' असणार, हे स्वाभाविकच होतं. म्हणून, अमेरिकेत, 'मॅनेजमेंट' मध्ये ज्या कोणाला थोडंफार यश मिळतं, त्या लोकांच्या मागे अमेरिकन समाज मेंढरांसारखा धावतो.

साठ - सत्तर च्या दशकात अमेरिकेत 'डेल कार्नेगी' च्या व्यवस्थापन पद्धतीची लाट होती. त्याची How to Win Friends and Influence People सारखी पुस्तकं लाखोंनी खपत होती. ट्रांजेक्शन अनॅलिसिस (TA), I am Ok, You are Ok, अगदी आताचे शिव खेडा... ही सर्व मंडळी आणि त्यांच्या व्यवस्थापनाच्या पद्धती, त्या - त्या काळात खूप गाजल्या. त्या सर्व मंडळींनी मानवी स्वभावाच्या कंगोऱ्यांना खूप महत्त्व दिलंय.

गंमत म्हणजे या सर्व गोष्टी, अगदी वेगळ्या पद्धतीने, आपल्याकडे चार-सहा हजार वर्षांपूर्वीच ऋषि-मुनींनी लिहून ठेवल्या आहेत.

या सर्व उपनिषदांचा किंवा गीतेतील शिकवणीचा आधार हा 'नैतिकता' किंवा 'सचोटी' आहे. सचोटी हे फक्त आदर्श तत्व नव्हतं, की जे आदर्श तर आहे, पण व्यवहारात शक्य नाही. नैतिकता, सचोटी ही जीवनमूल्यं होती. त्यामुळे व्यापारात आणि व्यवहारात लबाडीला स्थान नव्हतं.

मांडुक्य उपनिषदातला शांतीमंत्र आहे -
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः।
भद्रं पश्येमाक्षभि: यजत्राः।।

अर्थात, जे मंगलकारी आहे, कल्याणकारी आहे, तेच आमच्या कानांवर पडू देत. आमचे कान, आमचे मन नेहमी निर्मळ राहो. यात 'यजत्रा' हा शब्द वापरला आहे. यजत्रा म्हणजेच यज्ञ करणारे लोक. मात्र उपनिषदकार सांगतात, अग्नीकुंडात अग्नी प्रज्वलित करून जे करतात, तोच फक्त यज्ञ नाही. यज्ञ हा बुद्धीचा हवा. ज्ञानाचा हवा. कर्माचा हवा. आम्हाला समज आल्यानंतर, समाज कल्याणसाठी जे काय करतो तो यज्ञ..!

किती स्पष्ट सांगितलंय...

मुंडकोपनिषदात एक श्लोक आहे -
सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः I
क्रमंत्यृषयो ह्याप्तकामो यत्र तत्सत्यस्य परमं निधानम् II

अर्थात, नेहमी सत्याचाच विजय होतो. मिथ्या किंवा असत्य हे कधीच जिंकू शकत नाही. आपण २६ जानेवारी १९५० ला, या श्लोकातील 'सत्यमेव जयते' ला आपल्या देशाचं घोषवाक्य किंवा आदर्श वाक्य म्हणून जाहीर केलं आहे.

नारायण उपनिषदाच्या चौदाव्या मयूरवात एक श्लोक आहे -
धर्म इति धर्मेण सर्वमिदं परिगृहीतम् I
धर्मांन्नातिदुशाश्चरं तस्माध्दर्मे रमन्ते II ६II

यात सांगितलंय की स्वधर्माचं आचरण हे अतिशय उत्तम असं साधन आहे. सदाचार, संन्नीती, सचोटी ही सर्व धर्माची अंग आहेत. शास्त्रावर श्रद्धा असणं हा धर्माचा प्राण आहे.

या सर्व गोष्टी गुरुकुलाच्या माध्यमातून, विद्यापीठातून, घरातील संस्कारातून खालपर्यंत झिरपत गेल्याने, प्रामाणिकपणा,सचोटी ही आवश्यक अशी जीवनमूल्यं होती. या सर्वांचा प्रभाव व्यापारातही दिसायचा. आणि म्हणूनच जगभरातले ग्राहक, राजे-राजवाडे, व्यापारी हे भारतीयांवर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. भारताचा व्यापार, वस्तूंच्या गुणवत्ततेमुळे तर भरभराटीला आलाच, पण त्याला अजून एक महत्त्वाची जोड होती, आणि ती म्हणजे प्रामाणिकपणाची, विश्वासाची..! आजच्या व्यवस्थापनाच्या भाषेत 'इथिकल कोड ऑफ कंडक्ट'.

ईशवास्योपनिषदातला दुसरा श्लोक आहे-
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥

या श्लोकाचा अर्थ असा आहे, की कोणाही व्यक्तीला जर या धरातलावर शंभर वर्ष जगायचं असेल, तर त्याने कर्म करत राहिलं पाहिजे. ती व्यक्ती, कार्यमग्न असायला हवी. आणि कर्म ही कसं ? तर 'कुर्वन्नेवेह'. अर्थात निश्चित ठरलेलं कार्य आणि तेही चांगल्या प्रकारे करायचं.

याच उपनिषदातला पुढला श्लोक आहे-
असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाSSवृता:।
तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जना:।।

म्हणजे जे चांगल्या प्रकारे काम करत नाहीत, जे कुशलतेने काम करत नाहीत, ते 'असूर्य' लोकात जातात. अंधकारात जातात. अर्थात नरकात जातात !

कामाचं आणि कष्टाचं महत्त्व सांगण्यासाठी श्वेताश्‍वतर उपनिषदात (ब्राह्मोपनिषदात) पहिल्या अध्यायात एक श्लोक आहे -
तिलेषु तैलं दधनीव सर्पिरापः स्त्रोतः स्वरणीषु चाग्निः ।
एवमात्मात्मनि गृह्यतेऽसौ सत्येनैनं तपसा योऽनुपश्यति ॥

तिळामध्ये तेल असते, पण ते काढण्यासाठी तिळाला घाण्यात घालून ते पिळून काढावे लागते. दह्यातून तूप मिळवण्यासाठी दही घुसळून, लोणी काढून ते कढवावे लागते. अरणीचे मंथन करून अग्नी चेतवावा लागतो. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या पोटात पाणी निश्चित असते. मात्र त्यासाठी खोल खणावे लागते. कधी लवकर पाणी लागते, तर कधी खडक, दगड लागले तर त्यांना फोडावे लागते.

एकुणात काय, कष्ट करत राहिले पाहिजे. यश नक्कीच मिळेल.

ही सर्व तत्वं, प्राचीन काळी गुरुकुलांमधून मुला-मुलींवर बिंबवली जायची. कार्यमग्न रहा आणि जे काय विहित काम आपल्या वाटेला आलेलं आहे, ते अत्यंत कौशल्याने करा. आणि म्हणूनच आपण 'परफेक्शनिस्ट' होतो. परिपूर्णतावादी होतो. त्यामुळेच आपले पूर्वज, कैलास लेण्यात कोरलेलं शिल्प साकारू शकले. लोहस्तंभातलं अद्भुत असं धातूकाम करू शकले. गणितीय संकल्पना मांडू शकले... असं बरंच काही.

(दुर्दैवानं इस्लामी आक्रांता आल्यानंतर, त्या कर्म सिद्धांतातली परिपूर्णता हळूहळू नाहींशी झाली. अन् आपल्यावर भोंगळ, निकृष्ट दर्जाचे सामान बनवणारे यासारखे शिक्के मारल्या गेले).

व्यवस्थापन शास्त्रात मानवी मनाचा फार सूक्ष्मतेने विचार केला जातो, कारण व्यवस्थापन हे शेवटी मानवी व्यक्तींद्वारेच राबवायचे असते. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर, जगभरात व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धतींवर प्रभाव जाणवतो तो पीटर ड्रकर (Peter Drucker) यांचा. त्यांचा मुख्य सिद्धांत आहे - 'मॅनेजमेंट इज अबाउट ह्यूमन बिईंग'. आपल्या उपनिषदकारांनी या सर्व गोष्टींचा विचार, अक्षरशः सहा-सात हजार वर्षांपूर्वी करून ठेवलेला आहे.

केनोपनिषद आणि श्वेताश्‍वतर उपनिषदातला शांतीमंत्र आहे -
ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ।।

साधारणत: अनेक घरांमध्ये हा 'भोजन मंत्र' या अर्थाने जेवणापूर्वी म्हटल्या जातो. याचा अर्थ आहे, 'आम्हा दोघांचे रक्षण करा. आम्हा दोघांचे पोषण करा.' हे 'दोघं' कोण आहेत? तर आपली दोन मनं. गुरु आणि शिष्य. कधी आपलं एक मन गुरु होतं, तर दुसरं त्याचा शिष्यत्व पत्करतं. तर कधी उलट होतं. अनेकदा आपल्या मनात अंतर्द्वंद्व चाललेलं असतं. हे करू, की नको करू? शेक्सपियरच्या भाषेत, To be or Not to be.

उपनिषदकारांच्या मते या दोनही मनांचं व्यवस्थित पोषण होणं आवश्यक आहे. आणि त्यातूनच I am Ok, You are Ok ही भावना निर्माण होईल. जर I am Ok, You are Not Ok ही भावना बळवली, तर आपल्यात श्रेष्ठत्वाची भावना, अहंगंड (Superiority Complex) येईल. जर I am Not Ok, You are Ok ही भावना बळवली, तर आपल्यात न्यूनगंड (Inferiority Complex) निर्माण होईल. जर I am Not Ok, You are Not Ok ही भावना निर्माण झाली, तर ती पूर्णतः नकारात्मक होईल. यातून काहीच कर्म होणार नाही. आणि म्हणूनच, I am Ok, You are Ok ही भावना निर्माण होणं आवश्यक आहे, ज्याद्वारे आपण समान पातळीवरून लोकांशी संवाद साधू शकू.

व्यवस्थापनाचं हे महत्त्वाचं तत्व, डॉक्टर थॉमस ए हॅरिस एमडी यांनी सन १९६७ मध्ये मांडलं. ते अक्षरशः जगभरात गाजलं. त्यांचं I am Ok, You are Ok हे पुस्तक आजही तुफान विकलं जातंय. मात्र आपल्या उपनिषदांमध्ये, आजपासून सहा - सात हजार वर्षांपूर्वी, हे सूत्र व्यापक स्वरूपात मांडलेलं आहे.

व्यवस्थापनासाठी जी मूलभूत तत्वं आवश्यक असतात, ती उपनिषदांमध्ये सविस्तर सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ - एकाग्रता. एकाग्रता असली की अनेक असाध्य गोष्टीही सहज साध्य होतात. लहानश्या भिंगातून आलेली सूर्यकिरणं, एकाग्र होऊन कागद जाळून टाकतात. त्याचप्रमाणे मनाची एकाग्रता करून, कठीण कामं करून घेण्याबद्दल वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये वर्णन आहे. काही उपनिषदांनी, (जसं श्वेताश्वतर उपनिषद आणि मैत्रोपनिषद) 'योग' हा एकाग्रतेचा पर्यायवाची शब्द वापरला आहे.

ऐतरेय उपनिषदाच्या तिसऱ्या अध्यायात, आत्म्याच्या शक्तीचं वर्णन केलेलं आहे. चेतना, ग्रहणशक्ती, मेधा (बुद्धी), दृष्टी - अंत:दृष्टी इत्यादी गोष्टींची, मनुष्य, वृद्धी करू शकतो. त्यांना वाढवू शकतो. आणि हे झालं की कृती शक्य होते. अर्थात, अत्यंत कठीण परिस्थितीतही हिमतीने उभे राहून परिस्थिती पालटता येऊ शकते.

मुंडक उपनिषदात (किंवा मंत्रोपनिषदात), व्यवस्थापनाचे काम करताना पाळायची 'साधन चतुष्टी' दिलेली आहे -

1. त्या कामाची, त्या व्यवसायाची सखोल माहिती. 'मी हे काम का करतोय, यातून मला नेमकं काय साधायचंय', या सर्वांची स्पष्टता. सम्यक ज्ञान.
2. सत्याच्या रस्त्यावर चालणं. सत्य म्हणजेच परमेश्वर. सचोटीने व्यापार करायचा. प्रामाणिकपणानं कामं करायची.
3. आपल्या कर्मावर दृढ श्रद्धा. जे काम हाती घेतलंय, जो व्यवसाय आपण चालवतोय, त्याबद्दल मनात अनुराग असायलाच पाहिजे. त्या कामावर प्रचंड श्रद्धा हवी. प्रेम हवं. आवड हवी.
4. दिलेलं काम करताना किंवा हाती घेतलेला व्यवसाय करताना, सर्व यम- नियमांचे काटेकोरपणे पालन.

ही साधन चतुष्टी जर प्रामाणिकपणे राबवली, तर हातात घेतलेलं कोणतंही काम नक्कीच यशस्वी होतं, असं मुंडक उपनिषदात वर्णन आहे. 'सत्यमेव जयते' चा उद्घोष याच उपनिषदात झालेला आहे.

कठोपनिषदाच्या पहिल्या अध्यायातील तिसऱ्या वल्लीतील १४ वा श्लोक प्रसिद्ध आहे -
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।
क्षुरासन्नधारा निशिता दुरत्यद्दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति॥

स्वामी विवेकानंदांनी या श्लोकाचा अनेकदा उच्चार केलेला आहे. या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे, 'उठा, जागे व्हा आणि जाणकार, विद्वान, श्रेष्ठ पुरुषांच्या संगतीत ज्ञान प्राप्त करा.' परंतु याच्या पहिल्या भागाचा उपयोग स्वामी विवेकानंदांनी अत्यंत कुशलतेने केलाय, की "उठा, जागे व्हा आणि आपल्या लक्ष्यासाठी, उद्दिष्टासाठी 'वेडे' व्हा". येथे 'वेडे' हा शब्द 'पॅशनेट' या अर्थाने वापरला आहे. आणि आजच्या भौतिक जगातही हेच दिसतं. स्टीव्ह जॉब्स, एलन मस्क, बिल गेट्स सारखे जे - जे आपले लक्ष्य, उद्दिष्ट मिळवण्यासाठी झपाटले गेले, ते जगात अत्यंत यशस्वी ठरले.
आणि म्हणूनच, चांगल्या व्यवस्थापनासाठी, कामावर श्रद्धा ठेवून, दिलेल्या लक्ष्याप्रति 'वेडं' होणं अपेक्षित आहे, जे आपल्या उपनिषदांनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितलं आहे. प्रशांत पोळ.🙏🚩🕉️

सावित्री बाई फुले जयंती कार्यक्रम -20243 जानेवारी 2024, सायं 5.30-8.00 या वेळेत, सेवाभारती,नाशिक शहर, सावित्री बाई फुले ...
04/01/2024

सावित्री बाई फुले जयंती कार्यक्रम -2024

3 जानेवारी 2024, सायं 5.30-8.00 या वेळेत, सेवाभारती,नाशिक शहर, सावित्री बाई फुले मुलींची अभ्यासिका,उत्तम नगर येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भारत माते ची प्रतिमा यांच्या पूजनाने झाली त्यानंतर
सौ.सुवर्णाताई परांजपे यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.
पाहुण्यांचा परिचय सौ.विद्याताई बागुल यांनी करून दिला.
डॉ. सुनिता संकलेचा यांचा सत्कार सेवाभारती उपाध्यक्षा डॉ.पूनमताई शिवदे यांनी केला.
स्वामी श्री कंठानंद यांचा सत्कार सेवाभारती जिल्हा अध्यक्ष श्री. राजन चांदवडकर यांनी केला.
नाशिक सेवाभारती शहरजिल्हा सह सचिव श्री. राजेंद्र अत्रे यांनी
श्री.राजन चांदवडकर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवाभारती नाशिक शहर सचिव रत्नाताई पेठे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुनिताताई संकलेचा या उपस्थित होत्या.त्यांनी त्यांच्या मनोगतात मुलींना छान प्रोत्साहन पूर्ण गोष्टी सांगितल्या. स्वामी श्रीकंठानंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुलींना आजची तरुणी आणि कुटुंब व्यवस्था या विषयावर सुंदर मार्गदर्शन केले.तसेच त्यांनी मुलींना स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपण आहोत तसेच स्वीकारा असेही सांगितले. त्यानंतर सेवाभरती नाशिक शहर अध्यक्ष श्री राजन चांदवडकर यांनी मनोगत व्यक्त केले.यानंतर 70% च्या वर गुण मिळविणाऱ्या 35 गुणवंत विद्यार्थिनी तसेच सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध व वकृत्व स्पर्धेत विजेत्या विद्यार्थिनी यांना गौरविण्यात आले.
एका विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. यानंतर आभार प्रदर्शन नासिक शहरजिल्हा शिक्षण आयाम प्रमुख ,स्पर्धा परिक्षा मार्गदर्शिका सौ विद्याताई मुंडावरे यांनी केले.
कु.हर्षदा शार्दुल हिने पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू.प्रेरणा ठाकूर व कू. पूनम रोकडे या दोघींनी केले व्यासपीठा ची जबाबदारी कु.प्रतिभा बिरकुल, कु.गायत्री कोटकर, कु.हर्षदा शार्दुल या विद्यार्थिनींनी केली. सर्व उपस्थितांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती
कार्यक्रमास रा स्व संघाचे सिडको विभाग संघचालक मा श्री सुनिल वाणी, जनकल्याण रक्त केंद्राचे श्री मदन भंदुरे, राष्ट्र सेविका समितीच्या सौ ज्योतीताई देशमुख, विश्व हिंदु परिषदेचे नासिक विभाग मंत्री ज्यो.अनिल चांदवडकर गुरुजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अंकुश बरशिले, सुवर्णा खैरनार, सुशीला अंदोरे, छाया पंगे,शोभा संदानशिव,
प्रशांत चौधरी ,महाजन काका, बडवे गुरुजी इत्यादी नी प्रयत्न केले कार्यक्रमास 200 ते 250 विद्यार्थिनी, पालक माता पिता उपस्थित होते.

15/11/2023

♦️ रावणाचा खरा परिचय ♦️

▪️रावणासारखा भाऊ असावा असं कोणत्या बहिणीला आवडेल, ज्याने तिच्या नवऱ्यालाच ठार मारलं ?
- रावणाने स्वतःच्या सख्ख्या बहिणीच्या (शूर्पणखेच्या) नवर्‍याला म्हणजे विद्युज्जिव्ह याला ठार मारलं !

▪️रावणासारखा नवरा असावा असं कोणत्या स्त्रीला आवडेल, ज्याने तिच्याच बहिणीवर बलात्कार केला ?
- रावणाने स्वतःच्या पत्नीच्या (मंदोदरीच्या) बहिणीवर (मायावर) बलात्कार केला !

▪️रावणासारखा सासरा असावा असं कोणत्या सुनेला आवडेल, ज्याने आपल्या सुनेवर बलात्कार केला ?
- रावणाने स्वतःचा सख्खा भाऊ कुबेर (लंकेचा मूळ राजा, ज्याचं राज्य रावणाने बळकावलं) याच्या मुलाच्या (नलकुबेराच्या) पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला !

▪️रावणासारखा नेता असावा असं कुणाला वाटतं, ज्याने वालीकडून पराभव पत्करला ?
- किष्किंधानरेश वालीने रावणाला दोन वेळा पराभूत केलं आणि क्षमा करून जिवंत सोडले. तरीही तो त्रास देत राहिला. म्हणून एकदा वालीने त्याला बगलेत धरून प्रचंड वेगाने पृथ्वीप्रदक्षिणा केली. तेव्हा भीतीने रावण बेशुद्ध पडला.

▪️रावणासारखा राज्यकर्ता असावा असं कुणाला वाटतं, ज्याने संपत्ती आणि स्त्रीच्या मोहापायी प्रजेचा नाश केला ?
- देवांची संपत्ती आणि कुबेराचे राज्य बळकावून, अनेकांच्या स्त्रिया पळवून रावणाने लंकेच्या प्रजेवर युद्ध लादले. परिणामी लंकेचा नाश झाला.

▪️रावणासारखा अहंकारी शासक असावा असं कुणाला वाटतं, ज्याने उन्मत्त होऊन राज्य गमावले ?
- ब्रम्हदेवाच्या वराने मदोन्मत्त झालेल्या रावणाने अहंकाराने स्वतःचे भाऊ, मुलगा, सेनापती, नातलग, सैन्य, राज्य, संपत्ती इ. सर्वस्व घालवले.
----------------------------------------------
#रावणदहन

15/11/2023

Jankalyan Blood Bank, Pune, has successfully transitioned to our state-of-the-art NAT testing platform, conducting tests on over 200,000 blood bags to ensure the utmost safety for their patients. To mark this achievement, we hosted a comprehensive installation program and a workshop, TechVigyan 2023. The installation event welcomed Heads of Departments from affiliated blood banks, providing a platform for them to share insights on NAT testing and the effective collaboration facilitated by Jankalyan Raktapedhi's centralisation model. Additionally, the workshop featured a targeted training program for technicians from participating blood banks, enhancing their understanding of the platform's functionalities.

| | |

Address

जनकल्याण संकुल, उत्तमनगर, सिडको, नासिक
Nashik
४२२००९

Opening Hours

Monday 7:30am - 9pm
Tuesday 7:30am - 9pm
Wednesday 7:30am - 9pm
Thursday 7:30am - 9pm
Friday 7:30am - 9pm
Saturday 7:30am - 9pm
Sunday 7:30am - 9pm

Telephone

9371804937

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनकल्याण संकुल समिती,उत्तमनगर ,नासिक JSS,uttamnagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जनकल्याण संकुल समिती,उत्तमनगर ,नासिक JSS,uttamnagar:

Share