समृद्धी महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती

  • Home
  • India
  • Nashik
  • समृद्धी महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती

समृद्धी महामार्ग  बाधीत शेतकरी संघर्ष समिती समृद्धी महामार्गाविरुद्ध लढणारी शेत?

"अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे केवळ कर्मकांड, रूढी आणि परंपरांविरुद्ध लढणे नाही, तर माणसा-माणसांमधील अज्ञान, भीती आणि गैरसम...
20/08/2025

"अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे केवळ कर्मकांड, रूढी आणि परंपरांविरुद्ध लढणे नाही, तर माणसा-माणसांमधील अज्ञान, भीती आणि गैरसमज दूर करणे आहे"
- डॉ नरेंद्र दाभोलकर
अंधश्रद्धा दूर करून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे विचारवंत शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांना शहीद दिनी विनम्र अभिवादन! लाल सलाम!!

#डॉ_नरेंद्र_दाभोलकर #अंनिस #वैज्ञानिक_दृष्टिकोन

12/06/2025

12 जून 2017 समृध्दी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती मेळावा संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाला होता. आदरणीय शरद पवार साहेब व अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यासमोर भूमिका मांडली होती. याची आठवण!!

: आपण लढलो.. त्यामूळे भूसंपादन कायदा 2013 ची अंमलबजावणी झाली.
एकत्र आलो.. खूप आपण लढलो.. आज ही जप्त केलेला मोबाइल मिळाला नाही. केसेस सुरू आहेत.
शेतकरी एकजूट जिंदाबाद!! लडेंगे _ जीतेंगे!!
_ राजू देसले राज्य उपाध्यक्ष किसान सभा महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील प्रख्यात जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन लोकवाङ्मय प्रकाशनातर्फे करण्यात येत आ...
12/05/2024

महाराष्ट्र राज्यातील प्रख्यात जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन लोकवाङ्मय प्रकाशनातर्फे करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील नेमोचि असणारा दुष्काळाचा फेरा,
पाणी वाटपातील विषमता आणि सिंचन घोटाळे,
वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणारे नवनवे संकटे,
पाणी हक्काचे कायदे आणि शेती विकासात निर्माण होणारे अरिष्ट,
पर्यावरण पूरक आणि समतोल व शाश्वत विकास,
जनहक्काचा आक्रोश
या महत्वाच्या विषयावर नवी दृष्टी आणि दिशा देणारा विषय एका पुस्तकात शास्त्रीय व पारिभाषिक शब्दांना सहज सोप्या शब्दातून सांगितला तसेच दुसऱ्या कविता संग्रहात हाच विषय प्रहार करणाऱ्या कवितांच्या माध्यमातून देखील मांडला आहे. एकाचा वेळी लोकाभिमुख शास्त्रज्ञ, पाणीवाटपातून समतेकडे नेणारी क्रांतिकारक भूमिका आणि प्रस्थापित हितसंबंधावर प्रहार करणारा कलावंत अशा आगळ्या वेगळ्या भूमिका असणाऱ्या प्रदीप पुरंदरे यांना सलाम !!
या कार्यक्रमात सहभागी होण्याची पाणी हक्काच्या लढ्यातील कार्यकर्ता महणून संधी मिळाली धन्यवाद !!
कार्यक्रमाला जरूर या जलवंचित शेतकरी कामगार, लोकाभिमुख विकास प्रक्रियेचा आग्रह धरणारे जागरूक नागरिक, विचारवंत, तंत्रज्ञ, लोकशाही आणि कायदे याचा आग्रह धरणारे कार्यकर्ते, अभिजात मराठी भाषा आणि जीवनवादी कला याचा आग्रह धरणारे लेखक कलाकार आणि पाण्याचे राजकारण जाणून घेवू पाहणारे सर्वजण जरूर या !!

#प्रदीप_पुरंदरे #पाणीहक्क #लोकवाङ्मय #लोकशाही

Address

A 25, Meghdoot Shoping Centre, Old CBS
Nashik
422002

Telephone

9890267112

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when समृद्धी महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share