वीर युवा फाउंडेशन ने राबवलेले काही उपक्रमांची थोडक्यात माहिती
1. २०१३ सालापासून महातमा बसवेश्वर महाराजांची जयंती निमीत्त भव्य शोभायात्रा प्रवचन व महाप्रसाद सुरु आहे
2. १० वी १२ वी पदवी प्राप्तः विद्यार्थीच्या सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबीर घेतले.
3. महिलांसाठी पाकस्पर्धा ,एक मिनिट शो. स्पर्धा,तसेच फॅन्सी डेस स्पर्धा इ. चे आयोजन
4. घरगुती श्री. गौरी-गणपती ,महालक्ष्मी, आरास स्पर्धेचे आयोजन व पु
रस्कार प्रदान.
5. महिलांसाठी महिला मेळावा चे आयोजन करून या मेळाव्याद्वारे महिलांसाठी आरोग्य मंत्र. महिलाच्या सूप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा चे आयोजन आणि सामाजिक हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या आयोजन यशस्वीरीत्या केले गेले.
6. मागील दोन वर्षापासून गोर-गरीब, आदिवासी व गरजू लोकांसाठी विविध पाडे , वाड्यावर जाऊन कपडे, शैक्षणिक साहित्य व भांडी , वस्तूचे वाटप .
7. स्मशान्भूमीची साफसफाई व वृक्षारोपण व संवर्धन.
8. ”पैशांचे आर्थिक नियोजन” या बाबद युवक, नोकरदार , व्यावसायिक यांना मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन.
9. नाशिक येथे झालेल्या सिहंस्थ कुंभमेळ्याच्या प्रसंगी प्रथमोपचार माहिती केंद्र व पिण्याच्या पाण्याचे वाटप इ.
यासारखे उपक्रम तसेच भविष्यात देखील विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रम राबवण्याचा मानस असून आपण सर्वाना तन-मन-धनानेमदत करावी . आपल्या’ सर्वच्या मार्गदर्शनाची , बहुमोल सहकार्याची आवशकता आम्हाला आहे. धन्यवाद ! जय वीरशैव !