नाशिकच्या युवा वर्गाकरिता एक सामाजिक संघटना स्थापन करून सर्व युवा वर्गाला एकत्र आणन्या चे काम ह्या संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे.
ह्या संस्थेत कोणत्याही प्रकारचा राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसणार आहे.
ह्या संस्थेचे उद्धिष्ट म्हणजे :-
१) रक्त दाना विषयी जनजागृती करणे. गरीब व खेडे गावातून येणार्या गरजू लोकांकरता लागणारे रक्त कमीत कमी दरात उपलब्धकरून देणे. जेणे करून त्यांची होणारी पिळवणूक थांबेल
. त्यामुळे कोणाचा न कोणाचा जीव वाचेल. हि कल्पना माझा मित्र मनोज देवगिरे याने दिली असून ह्या संस्थेत तो सुद्धा माझ्या बरोबरच काम करणार आहे.
२) आज काल चा सर्व युवकान करिता भेडसावणारा प्रश्न म्हणजे शिक्षण आणि रोजगार. लवकरच आमच्या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा करिता मार्गदर्शन केंद्र सुरु केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना रोजगार नाही अश्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. जेणे करून त्या युवकाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्या वर व्यवस्तीत चालेल.
३) सांस्कृतिक कार्यक्रमा मध्ये सहभाग घेणे. विविध कलांचे शिक्षण उपलब्ध करून देणे. एखाद्या कलाकारसोबत चर्चा सत्र घेणे. ज्या तरुणाला एखाद्या चांगल्या क्षेत्रात काम करण्याची आवड आहे पण परिस्थिती नाही त्या करता त्याला होईल तितकी मदत करणे.
ह्या संस्थेत जो कोणी सभासद होईल त्याचा वैयक्तिक १लाख रुपय किमतीचा विमा संस्था उतरवणार आहे.
आपला ,
स्वप्नील श्रीकांत येवले
नाशिक.
मोबा.९९२३१९९९११.