Abhivyakti Media For Development

Call Directions Contact the organization

Abhivyakti Media For Development Non-profit organization engaged in fulfilling the media and communication needs of grassroots organizations and strengthening their leadership abilities.

विनायकनगर येथे CLCचा उत्साहपूर्ण शुभारंभ!विनायकनगर येथे Community Learning Centre (CLC) चे उद्घाटन गावातील दोन आजींच्या ...
26/08/2026

विनायकनगर येथे CLCचा उत्साहपूर्ण शुभारंभ!

विनायकनगर येथे Community Learning Centre (CLC) चे उद्घाटन गावातील दोन आजींच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुलींनी सहयात्री म्हणून झालेला प्रवास, कार्यशाळांमधून मिळालेले अनुभव आणि वाढलेला आत्मविश्वास याबद्दल मनोगत व्यक्त केले.

हे केंद्र ग्रामीण भागातील मुला-मुली, महिला, युवक आणि समुदायासाठी वाचन, स्व-अध्ययन, करिअर मार्गदर्शन, संवाद, कौशल्यविकास आणि सामूहिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रेरणादायी आणि सक्षम व्यासपीठ ठरणार आहे.

जागतिक आदिवासी दिन!त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कौलपोंडा, बेहाडपाडा आणि पेगलवाडी या गावांमध्ये यावर्षी प्रथमच जागतिक आदिवास...
12/08/2026

जागतिक आदिवासी दिन!

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कौलपोंडा, बेहाडपाडा आणि पेगलवाडी या गावांमध्ये यावर्षी प्रथमच जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी संस्कृती, परंपरा, कला आणि आदिवासी हक्क व अधिकार याविषयी जनजागृती करत गावकऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांमधून हा दिवस साजरा केला.

विराचा पाडा येथेही नेहमीप्रमाणे आदिवासी दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.

अभिव्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये यावर्षी गावातच एकत्र येऊन आदिवासी दिन साजरा करण्याचा प्रस्ताव संस्थेने गावकऱ्यांसमोर ठेवला. गावकऱ्यांनी सर्वांच्या सहमतीने हा उपक्रम स्वीकारला आणि उत्स्फूर्त सहभागातून आदिवासी दिन साजरा केला.

हा केवळ उत्सव नव्हता, तर आपली संस्कृती, ओळख, हक्क आणि अधिकार यांचा अभिमानाने उत्सव साजरा करण्याचा एक सामुदायिक प्रयत्न होता.

या निमित्ताने गावागावात उमटलेला उत्साह, सांस्कृतिक वैविध्य आणि सामुदायिक सहभाग टिपणारे काही क्षण...

#आदिवासीसंस्कृति #आदिवासीहक्क

A three-day Social Media Workshop was successfully conducted from 11–13 June 2026 at the Leslie Sawhney Centre, Deolali,...
17/06/2026

A three-day Social Media Workshop was successfully conducted from 11–13 June 2026 at the Leslie Sawhney Centre, Deolali, Nashik, Maharashtra.

The workshop brought together 16 participants from various grassroots organizations and NGOs across Maharashtra and Gujarat. Through interactive sessions and practical exercises, participants gained valuable knowledge and skills in social media platforms, content creation, social media campaigns, mobile photography and videography, storytelling, and the use of AI tools for communication and outreach.

The workshop received an overwhelmingly positive response from participants, who appreciated the practical learning opportunities and the relevance of the sessions to their work. Many participants shared that they felt more confident and better equipped to use digital and social media tools to amplify their organizations' impact and reach wider audiences.

We extend our sincere thanks to all the participants, resource persons, and supporters who contributed to making this workshop a great success.

*आनंदालय कम्युनिटी लर्निंग सेंटरमध्ये महिलांसाठी आरोग्यविषयक सत्र संपन्न*आनंदालय कम्युनिटी लर्निंग सेंटर, धुमोडी येथे गा...
25/05/2026

*आनंदालय कम्युनिटी लर्निंग सेंटरमध्ये महिलांसाठी आरोग्यविषयक सत्र संपन्न*

आनंदालय कम्युनिटी लर्निंग सेंटर, धुमोडी येथे गावातील महिला आणि युवतींसोबत मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता आणि सकस आहार या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर माहितीपूर्ण सत्र घेण्यात आले.

या सत्रामध्ये मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या विविध साधनांची माहिती देण्यात आली. तसेच त्यांचा योग्य वापर, स्वच्छतेची काळजी आणि मासिक पाळीबाबत असलेल्या गैरसमजांवर खुली चर्चा करण्यात आली.

यासोबतच सकस आहाराचे महत्त्व, योग्य पोषण आणि निरोगी आरोग्यासाठी आवश्यक सवयी याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आणि युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या मनातील अनेक प्रश्न मांडले. या संवादात्मक सत्रातून त्यांच्या शंकांचे निरसन झाले आणि आरोग्याविषयी अधिक जागरूकता निर्माण झाली.

आनंदालय – शिकण्याचे, संवादाचे आणि सशक्तीकरणाचे केंद्र.

सापगावमध्ये ज्ञानाची नवी वाट!२२ मे रोजी सापगाव येथे कम्युनिटी लर्निंग सेंटर (CLC) चे उद्घाटन..हे केंद्र ग्रामीण भागातील ...
23/05/2026

सापगावमध्ये ज्ञानाची नवी वाट!

२२ मे रोजी सापगाव येथे कम्युनिटी लर्निंग सेंटर (CLC) चे उद्घाटन..

हे केंद्र ग्रामीण भागातील मुला-मुली, महिला, युवक आणि समुदायासाठी वाचन, स्व-अध्ययन, करिअर मार्गदर्शन, संवाद, कौशल्यविकास आणि सामूहिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रेरणादायी आणि सक्षम व्यासपीठ ठरणार आहे.
CLC म्हणजे फक्त एक केंद्र नाही, तर ग्रामीण युवकांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे ज्ञानाचे आणि संधीचे दालन आहे.

शिक्षण, संवाद आणि सामूहिक शिकण्याची नवी सुरुवात!

अभ्यास सहल – अनुभवातून शिकण्याची संधी! ३ मार्च ते १६ मार्च २०२६ दरम्यान चार दिवसांची अभ्यास सहल यशस्वीरीत्या पार पडली. य...
30/03/2026

अभ्यास सहल – अनुभवातून शिकण्याची संधी!

३ मार्च ते १६ मार्च २०२६ दरम्यान चार दिवसांची अभ्यास सहल यशस्वीरीत्या पार पडली. या सहलीमध्ये ९ गावांतील गाव विकास समिती व पेसा समितीचे २७ सदस्य तसेच अभिव्यक्ती संस्थेचे ६ कार्यकर्ते सहभागी झाले. एकूण ३३ जणांनी या सहलीत उत्साहाने सहभाग नोंदविला.

या अभ्यास सहलीदरम्यान सहभागी सदस्यांनी चंद्रपूर येथील पर्यावरण मित्र संस्था येथे भेट दिली. पाचगाव गावात सामूहिक व वैयक्तिक वनहक्क दाव्यांबाबत सखोल माहिती घेण्याची संधी मिळाली.

तसेच ग्रामसभेचे कार्य, निर्णय प्रक्रिया, वन व्यवस्थापनातील लोकसहभाग आणि स्थानिक पातळीवरील नियोजन यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले.

या सहलीमुळे वनहक्क कायदा आणि ग्रामसभा व्यवस्थापनाबाबत सहभागी सदस्यांना नवे दृष्टिकोन, अनुभव आणि प्रेरणा मिळाली.

#अभ्याससहल #वनहक्ककायदा

ग्रामपीठ शिक्षणालय - समुदायासाठी खुले शिक्षणाचे दालन शिरसगाव, ता. त्र्यंबकेश्वर येथे गावातील युवांच्या पुढाकाराने ‘ग्राम...
06/03/2026

ग्रामपीठ शिक्षणालय - समुदायासाठी खुले शिक्षणाचे दालन

शिरसगाव, ता. त्र्यंबकेश्वर येथे गावातील युवांच्या पुढाकाराने ‘ग्रामपीठ शिक्षणालय’ (समुदाय शिक्षण केंद्र - CLC) सुरू करण्यात आले. हे केंद्र केवळ युवकांसाठी नसून लहान मुले, तरुण, मुली-महिला आणि सर्व वयोगटातील गावकऱ्यांसाठी शिकण्याचे खुले दालन ठरणार आहे.

या केंद्रामध्ये वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके, तसेच कॉम्प्युटर, प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाचन, स्व-अध्ययन, करिअर मार्गदर्शन, संवाद, कौशल्यविकास आणि माहिती मिळवण्यासाठी गावकऱ्यांना एक प्रेरणादायी शिकण्याची जागा (Learning Space) निर्माण झाली आहे.

हे केंद्र प्रौढ शिक्षण (Adult Learning), अनौपचारिक शिक्षण (Non-formal Education) आणि स्वयंप्रेरित शिक्षण (Self-directed Learning) या संकल्पनांवर आधारित आहे. संवाद, अनुभवांची देवाण-घेवाण आणि सामूहिक शिकण्याच्या प्रक्रियेतून जीवनकौशल्ये (Life Skills) विकसित करण्याचा प्रयत्न येथे केला जाणार आहे.

शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून संवाद आणि अनुभवातून घडते, या विचारातून प्रेरित होऊन पेडॅगॉजी आणि पाउलो फ्रेरे यांच्या सहभागात्मक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून गावात आजीवन शिक्षणाची (Lifelong Learning) संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

उद्घाटन प्रसंगी जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच अभिव्यक्ती संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्त, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शिक्षण, संवाद आणि सामूहिक शिकण्याची नवी सुरुवात…
#ग्रामपीठशिक्षणालय

अभिव्यक्तिचा 39 वा वर्धापन दिन..सर्वांना शुभेच्छा !
21/01/2026

अभिव्यक्तिचा 39 वा वर्धापन दिन..सर्वांना शुभेच्छा !

जागतिक पेसा दिन | २४ डिसेंबर १९९६ साली याच दिवशी पंचायती (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तार) अधिनियम  पेसा कायदा संमत झाला.या...
24/12/2025

जागतिक पेसा दिन | २४ डिसेंबर
१९९६ साली याच दिवशी पंचायती (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तार) अधिनियम पेसा कायदा संमत झाला.
या कायद्याचा उद्देश अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समुदायांना स्वशासन, हक्क आणि निर्णयक्षम अधिकार देणे हा आहे.

आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गारमाळ, देवीचापाडा, विनायक नगर आणि खारवळ या चार गावांमध्ये पेसा ग्रामसभा आणि अभिव्यक्ती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात पेसा मोबिलायझर, ग्रामसभा सदस्य, सरपंच, उपसरपंच, अभिव्यक्तीचे कार्यकर्ते तसेच डॉ.संजय सावळे (विश्वस्त, अभिवक्ती संस्था आणि ग्रामस्थानचा सक्रिय सहभाग होता.
यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना —
- पेसा कायद्याचे महत्त्व
- ग्रामसभेची भूमिका व अधिकार
- नैसर्गिक साधनसंपत्तीवर ग्रामसभेचा हक्क
- वनहक्क व सामूहिक वनहक्क दावे
- विकास प्रक्रियेत स्थानिक लोकांचा सहभाग
- स्थानिक रोजगार व स्थलांतर
यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पेसा कायदा आदिवासी भागातील स्वाभिमान, स्वायत्तता आणि लोकशाही मजबूत करणारा कायदा आहे, आणि ग्रामस्थांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मजबूत ग्रामसभा, सशक्त आदिवासी समाज

पेसा म्हणजे हक्क, सहभाग आणि स्वशासन

#जागतिकपेसादिन #ग्रामसभा #आदिवासीहक्क स्वशासन Trimbakeshwar Abhivyakti

११ डिसेंबर २०२५ रोजी विराचापाडा गावाला पेसा गाव म्हणून घोषित करण्यासाठीची प्रस्तावित फाइल त्र्यंबकेश्वर पंचायत समितीकडे ...
12/12/2025

११ डिसेंबर २०२५ रोजी विराचापाडा गावाला पेसा गाव म्हणून घोषित करण्यासाठीची प्रस्तावित फाइल त्र्यंबकेश्वर पंचायत समितीकडे जमा करण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समितीची टीम दीड वर्ष कसून पाठपुरावा करत होती.

विराचापाडा हे खडकओहळ ग्रामपंचायतीतील एक अतिदुर्गम गाव आहे. या गावाला पेसा गाव म्हणून घोषित करण्यासाठी अभिव्यक्तीची ग्रामशक्ती टीम ऑक्टोबर २०२४ पासून सातत्याने काम करत आहे. गावातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्यामुळे ग्रामसभेसाठी सर्व ग्रामस्थांना एकत्र येणे शक्य होत नव्हते. त्यावर उपाय म्हणून त्यांनी रात्रीच्या वेळी ग्रामसभा आयोजित केल्या. तसेच, काही स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या प्रक्रियेत अडथळेदेखील निर्माण केले जात होते.

यापूर्वी, सुमारे तीन वर्षांपूर्वी गावाची पेसा फाईल तयार करण्यात आली होती; परंतु ती हरवली. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वखर्चाने व स्वतःच्या प्रयत्नांनी सर्व आवश्यक कागदपत्रे पुन्हा एकत्र करून ही नवी फाईल तयार केली.

आता स्वायत्त पेसा ग्रामसभा म्हणून कारभार सांभाळण्यास विराचापाडा गाव सज्ज झाले आहे.

Address

Nashik

Opening Hours

Monday 9:30am - 5pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 5pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 5pm
Saturday 9:30am - 6pm

Telephone

+912532346128

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhivyakti Media For Development posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Abhivyakti Media For Development:

Shortcuts

Share