beliefsindia

beliefsindia Working with rural and tribal communities to strengthen systems and build sustainable livelihoods.

beliefsindia foundation is the next phase of the BELIEFS journey focused on long-term and institutional impact.

15/04/2026
ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत…रोजगार, माहिती, आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा कमी सहभाग…पण जेव्हा महिला पुढे येतात, तेव्...
10/04/2026

ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत…
रोजगार, माहिती, आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा कमी सहभाग…
पण जेव्हा महिला पुढे येतात, तेव्हा गाव बदलू लागतो.
हा व्हिडिओ अशाच एका प्रवासाची कथा आहे —
जिथे महिलांनी स्वतः पुढाकार घेतला, प्रश्न मांडले, आणि बदल घडवला.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयुष्य वाहिलेल्या
महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन.
त्यांच्या 200 व्या जयंती वर्षाच्या पूर्वसंध्येला
हा व्हिडिओ प्रसारित करत आहोत.
👉 पूर्ण व्हिडिओ पाहा:
https://youtu.be/SpbAP2vKcEU

A powerful story of tribal women leading change in their villages.BELIEFSINDIA presents the journey of empowering tribal women through grassroots leadership,...

🕯️ श्रद्धांजली 🕯️BELIEFS संस्थेचे सहयोगी फाउंडर मेंबर, विश्वस्त व उपाध्यक्षश्री. एकनाथ सहादू चित्ते यांचे दीर्घ आजारामुळ...
08/04/2026

🕯️ श्रद्धांजली 🕯️
BELIEFS संस्थेचे सहयोगी फाउंडर मेंबर, विश्वस्त व उपाध्यक्ष
श्री. एकनाथ सहादू चित्ते यांचे दीर्घ आजारामुळे दुःखद निधन झाले.
त्यांच्या जाण्याने संस्थेचे मोठे नुकसान झाले असून, BELIEFS ने एक समर्पित, संवेदनशील आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या सहवासातील आठवणी, तसेच त्यांचे साधेपण आणि आपुलकी कायम स्मरणात राहतील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏
तसेच चित्ते कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना.
🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️
BELIEFS संस्था
(BeliefsIndia Foundation)

BELIEFSINDIA FOUNDATION च्या पुढाकारातून 3 एप्रिल 2026 रोजी नाशिक येथे “हवामान बदल आणि समुदाय – विभागीय कार्यशाळा” यशस्व...
07/04/2026

BELIEFSINDIA FOUNDATION च्या पुढाकारातून 3 एप्रिल 2026 रोजी नाशिक येथे “हवामान बदल आणि समुदाय – विभागीय कार्यशाळा” यशस्वीरीत्या पार पडली.

या कार्यशाळेत उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या स्वयंसेवी संस्था, ग्रामसभा प्रतिनिधी, शेतकरी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

हवामान बदलाचा स्थानिक स्तरावर होणारा परिणाम, समुदायाच्या उपजीविकेवर होणारे परिणाम आणि ग्रामसभा यांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली. सहभागी संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनुभव मांडत परस्पर शिकण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया घडवून आणली.

या माध्यमातून भविष्यात एकत्रितपणे काम करण्याच्या दिशा निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मानसिक स्वास्थ विकास प्रकल्पाची सुरुवातBilifsindia Foundation तर्फे ग्रामीण भागातील महिलांच्या मानसिक स्वास्थाच्या बळकटी...
26/03/2026

मानसिक स्वास्थ विकास प्रकल्पाची सुरुवात
Bilifsindia Foundation तर्फे ग्रामीण भागातील महिलांच्या मानसिक स्वास्थाच्या बळकटीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज 30 महिलांसोबत या प्रकल्पाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत महिलांनी केवळ सहभाग नोंदवला नाही, तर आपल्या आयुष्यातील खऱ्या समस्या जसे की उपजीविका आणि दारूचे प्रश्न मोकळेपणाने मांडले.
यातून एक महत्त्वाची जाणीव झाली की मानसिक स्वास्थ हा वेगळा प्रश्न नसून तो जीवनाच्या परिस्थितीशी घट्ट जोडलेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत महिलांसोबत 16 सत्रांचा कृतीआधारित कार्यक्रम राबवला जाणार आहे. प्रत्येक सत्रात संवाद, अनुभव शेअरिंग, आत्मपरीक्षण आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे उपाय यावर भर दिला जाईल.
बैठकीदरम्यान सर्व महिलांनी या प्रवासात शेवटपर्यंत सहभागी राहण्याची तयारी दर्शवली. हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे. हा प्रकल्प केवळ मानसिक आरोग्यापुरता मर्यादित नसून महिलांचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि सामूहिक नेतृत्व विकसित करण्याचा एक प्रयत्न आहे.

राष्ट्रीय महिला दिन – १३ फेब्रुवारी | BELIEFS महिला मेळावा यशस्वीआज त्र्यंबकेश्वर तालुक्यात BELIEFS संस्थेच्या वतीने राष...
13/02/2026

राष्ट्रीय महिला दिन – १३ फेब्रुवारी | BELIEFS महिला मेळावा यशस्वी

आज त्र्यंबकेश्वर तालुक्यात BELIEFS संस्थेच्या वतीने राष्ट्रीय महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा उत्साहात पार पडला.

महिला मजूर संमेलन, भव्य कागदपत्र शिबीर, ग्रामीण विकास कार्यशाळा (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने) तसेच PMCC (विवाहपूर्व संवाद केंद्र) यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या नागरिकत्व, आरोग्य, रोजगार आणि नेतृत्वाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या मेळाव्यात अनेक भगिनींना रेशन कार्ड, जातीचे दाखले यांसारख्या शासकीय कागदपत्रांचा लाभ मिळाला. मनरेगा, ग्रामसभा सहभाग, गाव विकास आराखडा आणि महिला नेतृत्व विकास या विषयांवर अनुभव मांडण्यात आले. महिलांनी उत्साहाने स्पर्धांमध्ये सहभाग घेत आत्मविश्वासपूर्ण वातावरण निर्माण केले.

चार महिलांच्या पाडा समित्या आणि त्यांच्या पाडा समिती संघाची भूमिका अधोरेखित करत स्थानिक नेतृत्व अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या मेळाव्याचा संदेश स्पष्ट होता —
महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम नसून प्रक्रिया आहे.
हक्क मागणे हा अधिकार आहे.
आणि संघटित महिला परिवर्तन घडवू शकतात.

BELIEFS चा पुढील प्रवास “BELIEFS India Foundation” या व्यापक स्तरावर नेण्याची दिशाही या वेळी स्पष्ट करण्यात आली.

#जयमहिलाशक्ती #महिलाआयोग #महिलानेतृत्व #ग्रामीणनेतृत्व

विवाहपूर्व संवाद / समुपदेशन उपक्रमराष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) मार्गदर्शनाखालीBELIEFS संस्थेच्या माध्यमातूननाशिक जिल्...
21/01/2026

विवाहपूर्व संवाद / समुपदेशन उपक्रम

राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) मार्गदर्शनाखाली
BELIEFS संस्थेच्या माध्यमातून
नाशिक जिल्ह्यात ‘तेरे मेरे सपने’
विवाहपूर्व संवाद / समुपदेशन केंद्राची सुरुवात

महिला, कुटुंब आणि सामाजिक नातेसंबंध यामध्ये संवाद, समज आणि स्थैर्य वाढावे या उद्देशाने BELIEFS संस्थेच्या कार्यालयात या केंद्राची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

यावेळी परिसरातील आणि समुदायातील महिलांसोबत तसेच कार्यकर्त्यांसोबत हळदी–कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून संवादात्मक बैठक घेण्यात आली. लग्न ठरण्याआधी मुलगा–मुलगी व कुटुंबीयांमध्ये संवाद का आवश्यक आहे, अपेक्षा स्पष्ट न झाल्यास पुढे येणाऱ्या अडचणी, तसेच विवाह टिकावासाठी समज आणि संवादाची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की,
लग्न म्हणजे केवळ विधी नसून दोन माणसांचे आयुष्य आहे.
त्या आयुष्याची सुरुवात संवादाने झाली तर नातेसंबंध अधिक समजूतदार आणि स्थिर होतात.

या केंद्रामध्ये प्रशिक्षित (trained) समुपदेशकांच्या माध्यमातून विवाहपूर्व संवाद व समुपदेशन करण्यात येणार असून, हा उपक्रम केवळ एकदाचा कार्यक्रम नसून संरचित व जबाबदार कार्यपद्धतीनुसार सातत्याने राबविला जाणार आहे.

ग्रामीण–शहरी मिश्र सामाजिक परिस्थिती आणि महिलांसोबत सातत्याने काम करण्याचा अनुभव लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. या अनुभवांच्या आधारे पुढील काळात जिल्ह्यातील इतर भागांमध्येही अशा संवादात्मक उपक्रमांचा विस्तार करण्याचा मानस आहे.

🔹 समुपदेशन सेवा पूर्वनियोजित (Appointment) वेळेनुसार उपलब्ध
🔹 अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६३१०९५४२
🕑 दुपारी २ ते ५ या वेळेत

📍 स्थळ: BELIEFS संस्थेचे कार्यालय, नाशिक







01/01/2026



BELIEFS संस्थेचे पाडा समिती प्रशिक्षण उत्साहात संपन्न. प्रशिक्षणात ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाचा नवा टप्पा! दिनांक 25/11...
26/11/2025

BELIEFS संस्थेचे पाडा समिती प्रशिक्षण उत्साहात संपन्न. प्रशिक्षणात ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाचा नवा टप्पा!

दिनांक 25/11/2025 रोजी नाशिक येथे हॉटेल 24 सेवन येथे BELIEFS संस्थेमार्फत आयोजित पाडा समिती प्रशिक्षणासाठी कार्यक्षेत्रातील 26 महिला सदस्य उत्साहाने उपस्थित होत्या.

प्रशिक्षणाची सुरुवात महिलांनी मागील तीन महिन्यांत त्यांच्या गावात/पाड्यात/वस्तीत राबवलेल्या उपक्रमांचे अनुभव शेअर करून झाली. या उपक्रमांद्वारे कागदपत्र शिबिरे, मनरेगा आराखडे आणि जनजागृती, ग्रामसभा आग्रह, तसेच दारूबंदी व विधवा पेन्शनसारख्या महत्वाच्या सामाजिक प्रयत्नांची मांडणी त्यांनी आत्मविश्वासाने केली.
उपक्रमांमध्ये स्थानिक महिलांचा झालेला सहभाग आणि ग्रामस्थांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेरणादायी होता, तर काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून सहकार्य मिळविताना येणारी समस्या त्यांनी व्यक्त केली.

यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. एल. बी. जाधव यांनी मनरेगा कायदा आणि पेसा ग्रामसभांचे महत्व अतिशय सोप्या, संवादात्मक पद्धतीने समजावून सांगितले. या दोन्ही कायद्यांच्या माध्यमातून महिलांची निर्णयप्रक्रियेतली भागीदारी कशी वाढू शकते आणि प्रत्येक कुटुंबासाठी शाश्वत उपजीविका कशी घडवून आणता येते, यावर त्यांनी भर दिला.

शेवटच्या सत्रात ग्रामविकासासाठी संघटित प्रयत्नांचे महत्व, तसेच पाडा समिती आणि पाडा समिती संघाची रचना किती आवश्यक आहे, हे सहजसोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आले.
महिलांनी पाडा समिती सदस्य या नात्याने स्वतःच्या जबाबदाऱ्या निश्चित करत, पाडा समिती संघाच्या कोअर कमिटी निवडीच्या निकषांचा समूहचर्चेत आढावा घेतला. काही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने पुढील प्रशिक्षणात यावर अधिक विचारमंथन करण्याचे ठरले.

या वेळी संस्थेच्या सचिव वैशाली ताईंनी उपस्थित महिलांच्या नेतृत्वाचे कौतुक करून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किरण गवळी, गंगूताई घाणे आणि सारिका शिंदे यांनी परिश्रम घेऊन उत्तम साथ दिली.

आजच्या प्रशिक्षणात गेल्या वर्षभरातील बिलिफ्सच्या प्रक्रियेमुळे महिलांच्या नेतृत्व प्रवासात दिसलेला आत्मविश्वास, बदलाची उर्मी आणि संघटितपणाची ताकद स्पष्ट जाणवत होती.

पुढील महिन्यात प्रत्येक गावात PESA ग्रामसभा आयोजित करण्याचा आणि मनरेगा प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी सक्रिय पुढाकार घेण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला. आणि महिलांचा हाच निर्धार भविष्यातील ग्रामविकासाचा पाया ठरणार आहे.



Laxmikant Jadhav

#बिलिफ्स #महिलासक्षमीकरण #मनरेगा #पेसा #ग्रामसभा #संविधान #संविधानदिवस #पाडा #नाशिक

21/10/2025

Best wishesh for happy dewali..!

Address

Nashik

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919763109542

Alerts

Be the first to know and let us send you an email when beliefsindia posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to beliefsindia:

Share