22/08/2026
केजीएस शुगर, पिंपळगाव निपाणी यांच्या धोरणानुसार व ऊस विकास अभियानांतर्गत “कारखाना आपल्या दारी” उपक्रमाच्या माध्यमातून गोंडेगाव येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादन चर्चा सत्र आयोजित करण्यात आले.
यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत ऊस उत्पादन वाढ, दर्जेदार ऊस व कारखान्याशी शेतकऱ्यांचे हिताचे संबंध याबाबत मार्गदर्शन केले.
“शेतकरी समाजाचे हित हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला, अचूक ऊस वजन आणि वेळेवर पेमेंट मिळावे, यासाठी केजीएस शुगर कटिबद्ध आहे. आपल्या शेतातील सर्व ऊस केजीएसला नोंदवून गळीतासाठी द्यावा. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आमचे संचालक मंडळ व तज्ञ अधिकारी सदैव आपल्या सोबत आहेत.”
यावेळी संचालक किशोर आण्णा होळकर व प्रकाश शेठ दायमा यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेती अधिकारी वसंत शिंदे, अधिकारी शरदजी बोडके, राजेंद्र कातकाडे, महेश घुगे यांच्यासह गट सुपरवायझर, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🌾 शेतकऱ्यांचा विकास • ऊसाचे अधिक उत्पादन • केजीएसची विश्वासाची साथ 🌾