Samatva.Nashik

Samatva.Nashik We Samatva Foundation helps people in need and spread joy and happiness

07/04/2026

ही majhi satravi शाळा आणि सुंदर अनुभव .
वाटले नवते एकाच वेळेस 550 मुलींना प्रशिक्षण देण्यात येईल . त्र्यंबक येथील M R p H कन्या विद्यालय येथे प्रोजेक्ट ऋतूकल्प –मासिक पाळी व्यवस्थापन व मार्ग दर्शना साठी आम्ही गेलो . खूप उत्स्फूर्तपणे आम्ही या चिमुकलीन सोबत संवाद साधला . संख्या जास्त प्रमाणात असल्याने एका वेळेस इतक्या मुलींना मार्गदर्शन करणे शक्य नव्हतं. म्हणून तीन टप्प्यात हे प्रशिक्षण देण्यात आले . पाहायला गेलो तर एकच शाळा पण प्रशिक्षण तीन वेळा देण्यात आले. कारण मुलींना समजावून सांगणे गरजेचे होते .थोडी मेहनत झाली पण त्या चिमुकल्यांचे चेहऱ्यावरचे हास्य पाहून मनाला खूप समाधान मिळालं
आणि शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचारी यांनी देखील खूप छान सहकार्य दिले .

01/04/2026

आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास ठरला. कारण ज्या शाळेत मी कधीकाळी विद्यार्थिनी म्हणून शिकले, त्याच शाळेत आज मला पुन्हा जाण्याची संधी मिळाली — पण यावेळी विद्यार्थी म्हणून नाही, तर एक मार्गदर्शक म्हणून.
“Project ऋतुकल्प” अंतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता. तीच शाळा, तेच शिक्षक आणि तोच वर्ग… पण माझी भूमिका मात्र पूर्णपणे वेगळी होती. मनात प्रचंड आनंद आणि अभिमानाची भावना होती.
या उपक्रमात विद्यार्थिनींना मासिक पाळी म्हणजे काय, तिची शारीरिक प्रक्रिया कशी असते, तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच Tampons, Menstrual Cup, Period Panty, Period Diaper आणि Sanitary Pad या विविध साधनांविषयी माहिती देऊन त्यांचा योग्य आणि सुरक्षित वापर कसा करावा हेही समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीबाबत जागरूकता निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि स्वच्छ व आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहित करणे हा होता.
यासोबतच सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर, त्याची सुरक्षित विल्हेवाट, संतुलित आहाराचे महत्त्व आणि मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
हा उपक्रम समत्व फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. विद्यार्थिनींकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्यांनी उत्साहाने प्रश्न विचारले आणि आपले अनुभवही शेअर केले.
आजचा हा अनुभव मला नेहमीच प्रेरणा देणारा ठरेल. ज्या शाळेने मला घडवलं, तिथेच जाऊन काहीतरी परत देण्याची संधी मिळणं, ही खरोखरच अभिमानाची बाब आहे.

आजचा “महाराष्ट्र टाइम्स” 📰🗞️४ मार्च २०२६ ✌️
04/03/2026

आजचा “महाराष्ट्र टाइम्स” 📰🗞️
४ मार्च २०२६ ✌️

आपलं महानगर
09/11/2024

आपलं महानगर

Lokmat Times02/11/2024
08/11/2024

Lokmat Times
02/11/2024

म.टा - ३१/१०/२०२४
06/11/2024

म.टा - ३१/१०/२०२४

Address

Bodhale Nagar
Nashik
422011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samatva.Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share