आयुश | नंदुरबार युवा....
आपल्या जिल्ह्यात बरयाच प्रमाणात आदिवासी समाज आहे. हा भाग आजही मागास म्हणुनच ओळखला जातो. आजही येथील काही भागात आदिवासी समाजामध्ये शिक्षण,आरोग्य,सामाजिक प्रगती यांबाबत पुरेसी जागरुकता नाही. त्यांमुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
गुणवत्ता असुनही केवळ माहितीच्या अभावी आणि योग्य मार्गदर्शना अभावी विदयार्थ्यांना शैक्षणिक प्रगती साधता येत नाही.
तसेच शहराच्या इतक्य
ा जवळ असुनही... आजही नवनवीन व्यवसाय करण्याबाबत लोकांमध्ये जागरुकता आढळत नाही.
स्र्त्रीयांचे शिक्षण,आरोग्य यांसारख्या समस्या भेडसावत आहेत.आपल्या आदिवासी परंपरा,संस्कृतीची नव्या पिढीला पुरेशी माहिती नाही.
आपण जर सर्व एकत्र आलो तर आपल्या समाजाच्या ह्या काही समस्यांवर तोडगा काढुन नक्कीच आपल्या आदिवासी समाजाचा विकास करु शकु.आपण आयुश नंदुरबार युवाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना एकत्र आणुन त्यांची तसेच आदिवासी समाजाची प्रगती साधणे,आपली आदिवासी संस्कृती आपल्या परंपरा जपणे.अखंड आदिवासी समाजाची एकता टिकवणे. शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना सोबत आणणे आणि सध्याच्या तसेच भविष्यातील स्पर्धेची ओळख करून देणे.आदिवासी तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि भविष्यात सामोऱ्या जावा लागणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांना तयार करणे यांसारख्या काही गोष्टींसाठी प्रयत्नशील राहणार आहोत"
for more about AYUSH group, please visit AYUSH profile else www.adiyuva.in