Shubhamkaroti Foundation

Shubhamkaroti Foundation Shubhamkaroti Foundation is involved in different social activities but emphasizes on the issues of “Sustainable Development Goals ”.

Shubhamkaroti Foundation is Maharashtra, India based organization working in the area of;
Gender equality
Sexual and Reproductive Health and Rights
Women Health and Sustainable Livelihood
Adolescent and Youth
Old Age Help Center
Organ Donation The topic of “SDG's” encompasses a wide range of issues, including freedom of expression, rights, gender equality, livelihood, freedom from poverty and violence etc.

13 वर्षांखाली (2013 साली) Shubhamkaroti Foundation ने शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेल्या मुलांनी मिळवली शासकीय नौकरी..मराठवा...
27/04/2026

13 वर्षांखाली (2013 साली) Shubhamkaroti Foundation ने शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेल्या मुलांनी मिळवली शासकीय नौकरी..

मराठवाड्यात सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शुभंकरोती फाऊंडेशनतर्फे “ज्ञानदा चाइल्ड केअर” या उपक्रमाच्या माध्यमातून कुटुंबाचे छत्र हरविल्यामुळे बूट पॉलिश करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ आलेल्या मालेगाव, जि. नांदेड येथील 3 मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले होते.

आणि आमच्यासाठी आज आनंदाची बातमी ही कि जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यातील राजेश आनंदराव अन्नपूर्वे याची पुणे पोलीस विभागात तर मंगेश आनंदराव अन्नपूर्वे याची समाज कल्याण विभागात नियुक्ती झाली आहे.

यश मिळविणाऱ्या राजेश आणि मंगेश आनंदा यांची प्रेरणादायी कहाणी ही कि वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करत त्यांनी मेहनतीच्या जोरावर पोलीस दलात व समाज कल्याण विभागात स्थान मिळविले. दिवसभर कष्ट करून आणि रात्री अभ्यास करत त्यांनी आपले स्वप्न साकार केले.

शुभंकरोती फाऊंडेशनचा हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारा असून, गरजू मुलांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करणारा ठरत आहे.

In 2013, Shubhamkaroti Foundation took on the educational guardianship of children who have now secured government jobs.

Through its initiative “Gyanada Child Care,” Shubhamkaroti Foundation—well known for its social work in the Marathwada region—adopted the educational responsibility of three children from Malegaon, District Nanded. After losing their father, these children were forced to polish shoes to support their family. The foundation brought them back into the mainstream of education.

Today, it is a matter of great pride and joy that, through determination and perseverance, Rajesh Anandrao Annapurve has been appointed in the Pune Police Department, while Mangesh Anandrao Annapurve has secured a position in the Social Welfare Department.

Their inspiring journey reflects how, even after their father’s demise and in adverse circumstances, they continued their education with dedication. By working hard during the day and studying at night, they turned their dreams into reality and achieved positions in the police force and social welfare department.

This initiative of Shubhamkaroti Foundation is bringing about positive change in society and creating new hope in the lives of underprivileged children.

 #कौतुकाचीथापशुभंकरोती फाऊंडेशन तर्फे परभणी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन मागील 6 वर्षा...
23/04/2026

#कौतुकाचीथाप

शुभंकरोती फाऊंडेशन तर्फे परभणी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन मागील 6 वर्षांपासून चालू असलेल्या सामाजिक कार्याला कौतुकाची थाप देण्यासाठी सेलू येथील सर्व जेष्ठ उद्योजक, कर्मचारी तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमार्फत शुभंकरोती फाऊंडेशन चा सन्मान करण्यात आला..

येणाऱ्या काळात या कार्याची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त महिला व मुलींपर्यंत हे कार्य समर्पित केले जाईल..

शुभंकरोती फाऊंडेशन व सामाजिक शास्त्रे संकुल च्या संयुक्त विद्यमाने पांगरी येथे महिला व मुलींसाठी Candle आणि Diya मेकिंग ...
13/04/2026

शुभंकरोती फाऊंडेशन व सामाजिक शास्त्रे संकुल च्या संयुक्त विद्यमाने पांगरी येथे महिला व मुलींसाठी Candle आणि Diya मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या दृष्टीने महिला व मुलींना दैनंदिन वापरात येणाऱ्या व उच्च दर्जाच्या कँडल चे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले..

Shubhankaroti Foundation, in collaboration with the Faculty of Social Sciences, successfully conducted a Candle and Diya Making Training Program for women and girls at Pangari.

Through this training, participants were taught how to make high-quality candles used in daily life, with a focus on promoting self-employment opportunities for women and girls.

मुंबई येथे शुभंकरोती फाउंडेशनचा "राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार" मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या ह...
08/03/2026

मुंबई येथे शुभंकरोती फाउंडेशनचा "राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार" मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न..

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुभंकरोती फाउंडेशनच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची दखल घेऊन "राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम आज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आमदार मनीषा कायंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शुभंकरोती फाउंडेशनचा हा गौरव करण्यात आला.

We are proud to share that Shubhamkaroti Foundation has been honored with the “State Level Women Gaurav Award” on the occasion of International Women’s Day.

The award was presented by Hon. Deputy Chief Minister Mrs. Sunetra Ajit Pawar at Pu. La. Deshpande Maharashtra Kala Academy, Mumbai, in a program organized by the Maharashtra State Commission for Women.
This prestigious recognition acknowledges the Foundation’s dedicated efforts towards women’s empowerment and impactful social work.

The award was presented in the presence of Chairperson of the Maharashtra State Commission for Women Rupali Tai Chakankar, MLA Manisha Kayande, Mumbai Mayor Ritu Tawde, and other distinguished dignitaries.
This honor motivates us to continue working with even greater commitment for the empowerment, dignity, and well-being of women in our society.

आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण..महाराष्ट्र शासनाने शुभंकरोती फाऊंडेशनला "राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार जाहीर". मह...
05/03/2026

आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण..

महाराष्ट्र शासनाने शुभंकरोती फाऊंडेशनला "राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार जाहीर". महिला क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची ही मोठी दखल आहे.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. महाराष्ट्र शासनाचा "राज्यस्तरीय" हा सन्मान आणि यापूर्वी मिळालेले सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मला सतत शिकत राहण्यासाठी, वाढत राहण्यासाठी आणि उत्कृष्टतेकडे प्रयत्न करत राहण्यासाठी प्रेरणा देतात.

हा पुरस्कार केवळ माझाच नाही, तर माझ्या या प्रवासात साथ देणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास ठेऊन माझ्या सोबत काम करणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.

हा महाराष्ट्र शासनाचा "राज्यस्तरीय" पुरस्कार मिळाल्याने माझे मन कृतज्ञतेने भरून आले आहे. माझ्या या प्रवासात माझ्या सोबत उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी हा सन्मान समर्पित करतो.

We are proud to share that the Government of Maharashtra has declared a "State Level Award" for Shubhamkaroti Foundation in recognition of its dedicated social work and contribution to the society in the women sector..

I am truly grateful and humbled to receive this award. It motivates me to keep learning, growing, and striving for excellence.

This award belongs not only to me, but to every person who supported, inspired, and walked with me through this journey.

Receiving this award fills my heart with gratitude. I dedicate this honor to everyone who stood beside me during my journey.

  WorkshopWe have honored to have had the opportunity to participate as a speaker at the National Workshop on "Social En...
20/09/2025

Workshop

We have honored to have had the opportunity to participate as a speaker at the National Workshop on "Social Entrepreneurship", organized under Prime Minister -USHA initiative..

It was also an honor to share the dias with distinguished dignitaries of the PMO office and dignitaries of organizing Institution..

We (Shubhamkaroti Foundation) are Happy to partner with irrigation department of Maharashtra state for the irrigation pr...
13/04/2025

We (Shubhamkaroti Foundation) are Happy to partner with irrigation department of Maharashtra state for the irrigation projects in Nanded district. We look forward to the great things that will be accomplished together

18/11/2024

शिलाई, पार्लर आणि कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा..

शुभंकरोती फाउंडेशन, देसाई फाउंडेशन व स्कोर एसई इंडिया यांच्यामार्फत चालणाऱ्या शिलाई प्रशिक्षण, पार्लर प्रशिक्षण, कॉम्पुटर प्रशिक्षण यामध्ये तीन महिन्याचा मोफत कोर्स करून स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक सक्षमीकरनाच्या दिशेला वाटचाल करत कुटूंबाला ही आर्थिक हातभार लावत असल्याबद्दल हे प्रमाणपन्न देऊन महिलांना गौरविण्यात आले.

महिलांनी व मुलींनी प्रशिक्षण शिबिराचा स्वत:च्या विकासासाठी कसा उपयोग करून घ्यावा, याबाबत माहिती दिली. शुभंकरोती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किरण चौधरी सर यांनी उपस्थित महिलांना सांगितले व संस्थेच्या विविध आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. सेलू तालुक्यातील महिलांच्या उपस्थितीने भरगच्च भरलेले हे बाबासाहेब मंदिर सभागृह हे शुभंकरोती फाऊंडेशन च्या कार्याची पावती आहे अशी भावनिक प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ललिता गिल्डा, नयना बोर्डीकर व डॉ. रूपाली मालानी तसेच बाबासाहेब मंदिर येथील विश्वस्त श्री मनोज मंडलिक गुरु हे उपस्थित होते. शुभंकरोती फाउंडेशन सेलू तालुक्यात महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवते आणि त्या अनेक उपक्रमांची मी साक्षीदार आहे आहे अशी भावपुर्ण प्रतिक्रिया ललिता गिल्डा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. कोणताही गोष्ट सुरु करणे सोपे असते पण ती सातत्याने टिकविण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागतात आणि हे सामाजिक कार्यातील सातत्य मी शुभंकरोती फाऊंडेशन च्या कार्यात पाहते असे मत डॉ. रुपाली मालिनी यांनी दिले. तर शिक्षण हे महिलांच्या जीवनाचा मूलभूत पाया आहे जो तिला सक्षम करून आर्थिक उन्नतीकडे घेऊन जातो अशी भावना नयना बोर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या श्वेता गबाळे यांनी तर आभार निशिकांत पाटील यांनी केले.

Address

Block No. 03, First Floor, Pawade Complex, Opp. Lokmat Office, Shivaji Nagar
Nanded
431602

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

9766668339

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubhamkaroti Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shubhamkaroti Foundation:

Share