26/07/2025
नांदेड जिल्ह्याचा भूमिपुत्र व राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू श्री. शेख रमज्जु यांची निवड महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे क्रीडा शिक्षक म्हणून झाली असून, ही अत्यंत गौरवाची बाब आहे.
श्री. रमज्जु यांनी यूजीसीमार्फत आयोजित नेट परीक्षा शारीरिक शिक्षण या विषयात उत्तीर्ण केली आहे.
हे यश त्यांनी अत्यंत प्रतिकूल व खडतर परिस्थितीत मिळवले असून, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.
नांदेड जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा! 🌟