Marathvarhad Milk Producer Organisation

Marathvarhad Milk Producer Organisation A women-owned collective, established on 9th January 2025.

We empower small & marginal women dairy farmers by ensuring fair opportunities, better livelihoods, and sustainable rural development.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳स्वातंत्र्याचा अभिमान, देशाच्या प्रगतीचा संकल्प आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीची नवी...
14/08/2026

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

स्वातंत्र्याचा अभिमान, देशाच्या प्रगतीचा संकल्प आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीची नवी दिशा! 🇮🇳

जय हिंद!

13/08/2026

स्वागत नहीं करोगे हमारा…

National Dairy Development BoardSAG-Superior Animal Genetics
#रंगीलो #रंगीलोकाशी

11/08/2026

लवकरच पुन्हा सजणार आहे रंगीलोचा मंच… 🎨✨

शेतकऱ्यांची मेहनत, पशुपालकांचा अभिमान आणि ग्रामीण भारताच्या समृद्धीच्या रंगांनी!

रंगीलो काशी — १९–२० सप्टेंबर | BHU, वाराणसी

यावेळी काशीमध्ये…
भेटूया, शिकूया आणि एकत्रितपणे पुढे जाऊया! 🌾🐄🤝

National Dairy Development BoardSAG-Superior Animal Genetics

🐄 शेतकरी जागृती बैठकीतून ज्ञानाची नवी दिशा! 🌱दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध गावांमध्ये शेतकरी जागृती बैठका आयोजित करण...
11/08/2026

🐄 शेतकरी जागृती बैठकीतून ज्ञानाची नवी दिशा! 🌱

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध गावांमध्ये शेतकरी जागृती बैठका आयोजित करण्यात आल्या.

या बैठकीमध्ये दुग्ध उत्पादन वाढ, संतुलित पशुखाद्य, खनिज मिश्रण, पशू आरोग्य व योग्य पशुपालन पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वैज्ञानिक दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांची समृद्धीकडे वाटचाल! 🥛🌾

अकोला जिल्ह्यातील एलदापूर येथे शेतकरी जनजागृती बैठक संपन्नअकोला जिल्ह्यातील एलदापूर येथे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जनज...
06/08/2026

अकोला जिल्ह्यातील एलदापूर येथे शेतकरी जनजागृती बैठक संपन्न

अकोला जिल्ह्यातील एलदापूर येथे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत VMDDP योजनेची माहिती, संतुलित पशुखाद्य, मिनरल मिक्स्चर, डिवॉर्मिंग बोलस आणि फर्टिलिटी फीड यांचे महत्त्व व त्यांचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध प्रश्न विचारले. त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले तसेच जनावरांचे आरोग्य सुधारण्यासाठी, दूध उत्पादन वाढवण्यासाठी आणि दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

संध्याकाळीही शेतकरी जागरूकता बैठका... महिलांच्या अधिक सहभागासाठी एक सकारात्मक पाऊल!🌅 मराठवऱ्हाड दुग्ध उत्पादक संस्थेतर्फ...
04/08/2026

संध्याकाळीही शेतकरी जागरूकता बैठका... महिलांच्या अधिक सहभागासाठी एक सकारात्मक पाऊल!🌅

मराठवऱ्हाड दुग्ध उत्पादक संस्थेतर्फे शेतकरी जागरूकता बैठका आता संध्याकाळच्या वेळेतही आयोजित केल्या जात आहेत, जेणेकरून दिवसभरातील जबाबदारी पूर्ण केल्यानंतर अधिकाधिक महिला दुग्ध उत्पादक या बैठकींमध्ये सहभागी होऊ शकतील.

या बैठकीत पशू आरोग्य, स्वच्छ दूध उत्पादन, संतुलित पशुखाद्य, तसेच आधुनिक दुग्धव्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात येते.

महिलांचा वाढता सहभाग म्हणजेच सक्षम दुग्धव्यवसाय आणि समृद्ध ग्रामीण भविष्य. 💙🐄

#मराठवऱ्हाड #महिलासक्षमीकरण #दुग्धउत्पादक #शेतकरीजागरूकता #पशुआरोग्य #स्वच्छदूधउत्पादन

सत्य की गैरसमज?तुम्हालाही वाटतं का की जास्त गूळ खाऊ घातल्याने दूध वाढते?चला जाणून घेऊया यामागील वैज्ञानिक सत्य.👉 योग्य म...
03/08/2026

सत्य की गैरसमज?

तुम्हालाही वाटतं का की जास्त गूळ खाऊ घातल्याने दूध वाढते?

चला जाणून घेऊया यामागील वैज्ञानिक सत्य.

👉 योग्य माहिती जाणून घेण्यासाठी स्वाइप करा.

📲 ही माहिती आपल्या इतर पशुपालक बांधवांनाही नक्की शेअर करा.

#पशुपोषण #दुग्धव्यवसाय #निरोगीपशू #दूधउत्पादन #सत्यकीगैरसमज

🚀 गोंदिया जिल्ह्यात मराठवऱ्हाडच्या विस्ताराची नवी सुरुवात! ⭐आज, १ ऑगस्ट २०२६ रोजी गोंदिया क्लस्टर अंतर्गत बेरडीपार, चिखल...
01/08/2026

🚀 गोंदिया जिल्ह्यात मराठवऱ्हाडच्या विस्ताराची नवी सुरुवात! ⭐

आज, १ ऑगस्ट २०२६ रोजी गोंदिया क्लस्टर अंतर्गत बेरडीपार, चिखली आणि कावळेवाडा येथे नवीन Bulk Milk Cooler (BMC) केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले.

या विस्तारामुळे ४४ नवीन Milk Pooling Points (MPPs) कार्यान्वित झाले असून, गोंदिया जिल्ह्यातील दुग्ध संकलनाचा विस्तार अधिक बळकट झाला आहे.

महिला दुग्ध उत्पादकांना अधिक सक्षम सेवा, गुणवत्तापूर्ण दूध संकलन आणि ग्रामीण विकासाच्या दिशेने मराठवऱ्हाडची आणखी एक भक्कम पायरी! 🥛🌱

#मराठवऱ्हाड #दुग्धक्रांती #गोंदिया #महिलासक्षमीकरण

🌾 गावागावात शेतकरी जागरूकता बैठकींचे यशस्वी आयोजन! 🐄🥛मराठवऱ्हाड दूध उत्पादक संस्थेमार्फत विविध गावांमध्ये शेतकरी जागरूकत...
31/07/2026

🌾 गावागावात शेतकरी जागरूकता बैठकींचे यशस्वी आयोजन! 🐄🥛

मराठवऱ्हाड दूध उत्पादक संस्थेमार्फत विविध गावांमध्ये शेतकरी जागरूकता बैठकींचे आयोजन करण्यात आले. या बैठकींमध्ये स्वच्छ दूध उत्पादन, पशू आरोग्य, संतुलित पशुखाद्य आणि आधुनिक दुग्धव्यवसाय पद्धती याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

जागरूक शेतकरी – समृद्ध दुग्धव्यवसाय! 🌱🥛

📍 पशुवंध्यत्व निवारण शिबिराचे यशस्वी आयोजनमराठवऱ्हाड दूध उत्पादक संस्थेतर्फे एमसीसी परंडा (जि. धाराशिव) आणि एमसीसी मलकाप...
29/07/2026

📍 पशुवंध्यत्व निवारण शिबिराचे यशस्वी आयोजन

मराठवऱ्हाड दूध उत्पादक संस्थेतर्फे एमसीसी परंडा (जि. धाराशिव) आणि एमसीसी मलकापूर (जि. बुलढाणा) अंतर्गत पशुवंध्यत्व निवारण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी जनावरांची तपासणी करून योग्य उपचार व मार्गदर्शन केले. पशुधनाचे प्रजनन आरोग्य सुधारून दूध उत्पादन वाढविण्यासाठी अशा शिबिरांचा मोठा लाभ दुग्ध उत्पादकांना होत आहे.

सुदृढ पशुधन – समृद्ध दुग्ध व्यवसाय! 🐄🥛

Address

Mahanand Dairy, B/11/11/1 , MIDC Hinga Road
Nagpur
440016

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathvarhad Milk Producer Organisation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share