Mankar Trust

Mankar Trust “Eklavya Ekal Vidyalay”, One teacher. One village. Endless dreams. Kai. Our inspiration is Shri. Join us in shaping a brighter tomorrow.

Laxmanrao Mankar Smruti Sanstha is dedicated for providing education, skills, and hope to the tribal heartlands of Vidarbha.
● We run one-teacher schools (Eklavya Ekal Vidyalay) in 1035 remote villages where classrooms are often temples, homes, or open spaces.
● Beyond literacy, we work on de-addiction, health awareness, and skill development to uplift entire communities.
● With 30,000+ tribal students and 1,200 teachers, our goal is to reach 1,50,000 students and create a new generation of confident, value-driven youth. Laxmanrao Mankar “Guruji”, whose dream was to light up every corner of Vidarbha with knowledge.

22/09/2026

स्वतःची गाडी टॅक्सी म्हणून चालवण्याची परवानगी दिल्यामुळे ४ कोटी लोकांना रोजगार मिळाला!

22/09/2026

६,४१७ महिलांचा ५ लाखांचा प्रीमियम विमा संस्थांनी भरला!

22/09/2026

१ लाख आदिवासी महिलांना मिळणार विमा संरक्षण!

21/09/2026

मानकर ट्रस्टतर्फे एक लाख मातांना विमा कवच!

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था (मानकर ट्रस्ट) तर्फे विदर्भातील दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने एक लाख आदिवासी विद्यार्थ्यांच्या मातांना जीवन विमा आणि वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी गडकरी वाडा, महाल, नागपूर येथे केंद्रीय मंत्री, आदरणीय श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते १० लाभार्थी मातांना प्रातिनिधिक स्वरूपात विमा प्रमाणपत्रांचे वितरण करून करण्यात आला, तसेच या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ६,४१७ आदिवासी विद्यार्थ्यांच्या मातांना विमा प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

एक लाख मातांना विमा कवच!दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने कै....
21/09/2026

एक लाख मातांना विमा कवच!
दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था (मानकर ट्रस्ट) तर्फे एक लाख आदिवासी विद्यार्थ्यांच्या मातांना जीवन विमा व वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ६४१७ मातांना विमा प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते १० मातांना प्रातिनिधिक स्वरूपात विमा प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मानकर ट्रस्टचे अध्यक्ष श्री.अतुल शिरोडकर, उपाध्यक्ष प्रा.श्री.राजीव हडप, डॉ. मुरलीधर चांदेकर, सचिव श्री.प्रशांत बोपर्डीकर, कोषाध्यक्ष सी.ए. मिलिंद कानडे, एक्स्पर्टिअस इंशुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.चे निमेश खट्टर, सेवा नीतीचे किरण कुलकर्णी,राहुल मेंघर यांच्यासह विश्वस्त, पदाधिकारी व संबंधित संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

20/09/2026

Live | 📍नागपूर | आदिवासी ग्रामीण भागातील एकलव्य एकल विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मातांसाठी आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) वितरण सोहळा.

03/09/2026

माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आदिवासी विकास मंत्री मा. डॉ. अशोकजी उईके यांच्या माध्यमातून आदिवासी आणि अनुसूचित विद्यार्थांसाठी शिक्षणासोबतच आरोग्यसुविधा आणि सुरक्षितता यांना आता प्राधान्य मिळणार!


03/09/2026

#आदिवासी समाजातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधींना गती देणे, #पेसा क्षेत्रातील आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर कालबद्ध आणि सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत सांगितले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, आदिवासी युवक-युवतींना त्यांच्या हक्काचा न्याय मिळावा, पेसा क्षेत्रातील आरक्षणाची प्रभावी आणि कायदेशीर अंमलबजावणी व्हावी तसेच सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक, कालबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित विभागांना निश्चित कालमर्यादेत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रत्येक मागणीची सकारात्मक दखल घेऊन त्यावर नियमानुसार आणि प्राधान्याने निर्णय घेण्यात येईल.

या बैठकीस खासदार हेमंत सावरा, आमदार राजू तोडसाम, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे खजिनदार, श्री. मिलिंदजी कानडे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या आर्थिक प्रकोष्ठाच्य...
26/08/2026

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे खजिनदार, श्री. मिलिंदजी कानडे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या आर्थिक प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

आपल्या अनुभवातून आणि कार्यक्षम नेतृत्वातून आपण ही जबाबदारी निश्चितच प्रभावीपणे पार पाडाल, असा आम्हास विश्वास आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आपल्या कार्याला यश लाभो, हीच सदिच्छा.

आपल्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !

- समस्त मानकर ट्रस्ट परिवार

25/08/2026

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय’ शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्ग २०२६ सामारोप सोहळा केंद्रीय मंत्री आदरणीय श्री. नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Address

101, Amar Palace, Opp. Patrakar Bhavan, Dhantoli
Nagpur
440012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mankar Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share