S. M. Zade Foundation

S. M. Zade Foundation कला •शिक्षण •साहित्य. आरोग्य •बालरंजन • कथाकथन •ग्रामविकास •स्वयंरोजगार

तीर्थरूप बाबा (सी. मो. झाडे), आदर्श शिक्षक, पत्रकार, नाटककार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता अशा विविध प्रेरणादायी भूमिका...
01/08/2026

तीर्थरूप बाबा (सी. मो. झाडे), आदर्श शिक्षक, पत्रकार, नाटककार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता अशा विविध प्रेरणादायी भूमिका तुमच्या आयुष्यात तुम्ही वठवल्यात. तुम्ही केलेला संस्कार आणि उपदेशाची ऊर्जा कायम सोबत आहे. सामाजिक कार्याची आमची अल्पशी धडपड सुरु आहे. आज तुमचा जन्मदिवस. तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. ❤️🙏🌸🌸

डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र, दाभा, नागपूर यांच्या द्वारे वाडी पोलीस स्टेशन येथे व्यसनमुक्ती जनजागृती...
31/07/2026

डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र, दाभा, नागपूर यांच्या द्वारे वाडी पोलीस स्टेशन येथे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. मगर सर यांनी परवानगी व सहकार्य केले.

कार्यक्रम मा. पोलीस निरीक्षक आगरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महिला व पुरुष पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस हे समाजातील जबाबदार व प्रभावी घटक असल्याने त्यांच्यामार्फत व्यसनमुक्तीचा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व तसेच व्यसनाधीन व्यक्तींना योग्य उपचार व समुपदेशनाची गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

🌷 खरा गुरु ओळखा 🌷"गुरु कोणत्याही देशाचे असोत, कोणत्याही पंथाचे असोत, कोणतेही साधन करणारे असो, कोणत्याही जातीचे असो, किती...
29/07/2026

🌷 खरा गुरु ओळखा 🌷
"गुरु कोणत्याही देशाचे असोत, कोणत्याही पंथाचे असोत, कोणतेही साधन करणारे असो, कोणत्याही जातीचे असो, कितीही वयाचे असो यावर त्यांचा गुरुपणा अवलंबून नाही; तर जे ज्ञानाने, आचरणाने, अनुभवाने, प्रेमळपणाने जनतेला उन्नत करु शकतात तेच खरे गुरु होण्याला लायक आहे. त्यांचाच हितबोध जीवाला मानवतो, पण हे ज्या साधकांना कळत नाही त्यांना संसारात भटकावेच लागणार. कारण त्यांना कुणीतरी सांगितले असते की, चमत्कार करणार ते गुरु, मनातले ओळखतात ते गुरु, आपल्या आसनातुन पेढे-मिठाई काढतात ते गुरु, वेष घेउन नटतात-थटतात ते गुरु, पुजेचे ढोंग करतात ते गुरु असे समजणारे अनेक आहे. पण ही विद्या अज्ञानी माणसाला, नास्तिकाला, धंदेवाईकाला, मंत्रतंत्र करणाऱ्याला, विद्येचा प्रयोग करणाऱ्यालाही प्राप्त होते. ते तर गारुडीही करु शकतात. म्हणून ते सद्गुरु म्हणायला लायक नसतात. ज्यांनी प्रेमळपणाने आपणाला उन्नतीचा, माणुसकीचा, निर्व्यसनीपणाचा, सदाचाराचा, अध्यात्माचा अनुभव दिला तेच गुरुतुल्य असतात हे लक्षात घेऊन तुम्ही आपले कल्याण करा." . . . ✍🏼 - वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

World Nature Conservation Day!🌿
28/07/2026

World Nature Conservation Day!🌿

श्रीमती राजश्री शिवाजीराव जाधव पाटील यांना सी. मो. झाडे फाउंडेशनचा 'डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार' दे...
20/07/2026

श्रीमती राजश्री शिवाजीराव जाधव पाटील यांना सी. मो. झाडे फाउंडेशनचा 'डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार' देऊन सन्मानित करताना पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, महाकवी सुधाकर गायधनी, प्रा. श्याम मानव, डॉ. स्वाती धर्माधिकारी, भारती झाडे, बळवंत मोरघडे.

"जब तक सांस है, तब तक आस है."As long as there is life, there is hope. 26 June 2026 | International Day Against Drug Abus...
26/06/2026

"जब तक सांस है, तब तक आस है."
As long as there is life, there is hope.

26 June 2026 | International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking

The International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking was observed at Dr. Satyanarayan Nuwal Gurukul De-Addiction Centre through a meaningful and interactive awareness programme dedicated to hope, recovery, and building a drug-free society.

The session focused on understanding why people begin using drugs, exploring biological, psychological, and social factors, along with curiosity and escapism. The devastating impact of substance abuse on the brain (neurological changes), mental health, physical health, relationships, families, and society was also discussed in detail.

Special emphasis was placed on how addiction can gradually affect every aspect of a person's daily life, including family relationships, friendships, education, employment, financial stability, decision-making, emotional well-being, and overall quality of life. At the same time, it was reinforced that recovery is possible with the right treatment, support, and determination.

A role-play activity was conducted in which beneficiaries shared practical solutions to reduce illicit drug trafficking, prevent drug peddling, strengthen community awareness, improve access to rehabilitation, and contribute towards building a safer and healthier society.

Through this initiative, awareness was spread, stigma surrounding addiction was challenged, and the importance of seeking timely help and supporting individuals on their recovery journey was reinforced. Together, we move one step closer towards a healthier, safer, and drug-free future.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सत्राचा अहवालआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, राम नगर, ना...
21/06/2026

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सत्राचा अहवाल

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, राम नगर, नागपूर यांच्या सदस्यांनी डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र, दाभा येथे लाभार्थ्यांसाठी योग सत्र आयोजित केले. या सत्रात विविध योगासने व प्राणायामाचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच लाभार्थ्यांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगण्यात आले.

यावेळी उपस्थितांना निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले. लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रात ॲड. गोविंदभाई विठ्ठल पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शनॲड. पाटील यांनी...
09/06/2026

डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रात ॲड. गोविंदभाई विठ्ठल पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

ॲड. पाटील यांनी सन १९७२ ते २०१५ या कालावधीत नागपूर उच्च न्यायालयात यशस्वी वकिली केली. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि ॲड. मा. म. गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. सध्या ते सामाजिक कार्यात सक्रियपणे कार्यरत आहेत.

त्यांनी ॲड. मा. म. गडकरी यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा आपल्या जीवनावर झालेला प्रभाव सांगितला. त्यांचा प्रामाणिकपणा, निष्ठा, समाजाभिमुख दृष्टिकोन आणि कर्तव्यपरायणतेमुळे आपण प्रेरित झालो असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच जीवनातील अडचणींना धैर्याने सामोरे जाऊन सकारात्मक विचारसरणी स्वीकारल्यास कोणतीही व्यक्ती यशस्वी आणि समाधानकारक जीवन जगू शकते, असा संदेश त्यांनी दिला.

केंद्रातील लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले आणि आत्मविश्वास, शिस्त, कुटुंबीयांचे सहकार्य व समाजाशी सकारात्मक नाते जपण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे उपस्थित रुग्णांना नव्या उमेदीने जीवनाकडे पाहण्याची प्रेरणा मिळाली.

05/06/2026
*जागतिक पर्यावरण दिन – ५ जून २०२६*स्वच्छ व संतुलित पर्यावरणाशिवाय मानवाचे अस्तित्व अशक्य आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि सं...
05/06/2026

*जागतिक पर्यावरण दिन – ५ जून २०२६*

स्वच्छ व संतुलित पर्यावरणाशिवाय मानवाचे अस्तित्व अशक्य आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जाणीव निर्माण करण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या निमित्ताने सी. मो. झाडे फाउंडेशन, नागपूर हे पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासासाठी आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करते.

पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने केंद्रामध्ये सौरऊर्जा निर्मितीसाठी सोलर पॅनलची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ओला व सुका कचरा यांचे योग्य पद्धतीने वर्गीकरण, सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्टिंग, तसेच नियमित वृक्षारोपण यांसारखे उपक्रम सातत्याने राबविले जातात. या उपक्रमांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होत असून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत आहे.

निरोगी समाजासाठी पर्यावरण आवश्यक आहे. चला, आपण सर्वजण मिळून हरित, स्वच्छ आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी योगदान देऊया.

Address

270/271 Government Press Employees Co-operative Housing Society, Post/Wadi
Nagpur
440023

Alerts

Be the first to know and let us send you an email when S. M. Zade Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share