21/04/2025
2023 सालापासून जनमंचतर्फे नागपूर शहरातील सदोष तसेच निकृष्ट दर्जाच्या , काँक्रीट मॅन होल कव्हर च्या बाबतीत, महानगरपालिकेशी पाठपुरावा चालू होता. त्या प्रयत्नांना यश मिळून चांगल्या प्रतीचे, सारखे डिझाईन असलेले,जे चोरीला जाणार नाहीत व गाड्यांच्या वजनांमुळे तुटणार नाही असे मॅन होल कव्हर्स लावण्याचा निर्णय अखेरीस महानगरपालिकेने घेतला. मॅन होल कव्हर्सच्या बाबतीतील *ही मागणी ,जनमंच तर्फे नुकत्याच दाखल केलेल्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे. शेवटी जनमंच च्या या लढ्याला यश मिळाले. सर्व नागपूरकरांसाठी ही आनंदाची बाब असून रस्ते अपघातात सुद्धा घट होण्यास यामुळे मदत मिळेल असे वाटते.🙏🙏