आनंदाश्रम AVJNM नागपुर

आनंदाश्रम AVJNM नागपुर Welfare of Senior Citizens.

एक अतिशय थरारक घटना Operation Thunder bolt.
05/10/2026

एक अतिशय थरारक घटना Operation Thunder bolt.

04/10/2026

🙏आभार 🙏

दिनांक ३ ऑक्टो २०२६ रोजी आर्य वैश्य जेष्ठ नागरिक मंडळाची आमसभा संपन्न झाली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही आमसभा असली तरी या निमित्ताने, आनंदाश्रमात हा एक वार्षिक उत्सव असतो. कार्यक्रमाचा वृत्तांत व क्षण चित्रे टाकली आहेत
या कार्यक्रमाच्या अनुषंघाने आलेले बहुमोल प्रतिसाद व अभिप्राय इथे देण्यात, आम्हाला भुषण वाटते आहे.
*********
( श्री गणेश चिंतावार पुणे)

माननीय अध्यक्ष व सर्व कार्यकारिणी मंडळ,
आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळ, नागपूर

सप्रेम नमस्कार,

आपल्या मंडळाच्या शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या आमसभेचे निमंत्रण मला मिळाले. या आमसभेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची माझी मनापासून इच्छा होती; परंतु ऐनवेळी उद्भवलेल्या काही अडचणींमुळे मला उपस्थित राहता येत नाही, याची खंत आहे.

आपण हाती घेतलेला ज्येष्ठ नागरिकांसाठीचा प्रकल्प अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद आहे. एकदा काही कामानिमित्त वणी येथे आलो असताना मला आपल्या या प्रकल्पाला भेट देण्याची संधी मिळाली. आपल्या समाजाने उभारलेला एवढा भव्य, सुंदर आणि समाजोपयोगी प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात क्वचितच पाहायला मिळतो.

आपण स्वतः ज्येष्ठ नागरिक असतानाही ज्येष्ठ बांधवांप्रती असलेली आपली तळमळ, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी या प्रकल्पातून प्रकर्षाने दिसून येते. कोणतीही सरकारी मदत न घेता, निःस्वार्थ भावनेने आणि केवळ देणगीदारांच्या सहकार्याने एवढा मोठा प्रकल्प उभारणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. यासाठी आपण सर्वजण मनःपूर्वक अभिनंदनास पात्र आहात.

या शुभप्रसंगी माझ्याकडून रु. २५,०००/- (पंचवीस हजार रुपये) ही छोटीशी देणगी आपल्या प्रकल्पासाठी पाठवत आहे. यापूर्वीही मी माझ्या परीने काही देणगी दिली आहे आणि भविष्यातही या समाजोपयोगी कार्यासाठी माझे सहकार्य व योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील.

आपल्या या स्तुत्य आणि समाजहिताच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा! हा प्रकल्प अधिकाधिक यशस्वी होवो आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग व्हावा, हीच सदिच्छा.

पुन्हा एकदा आपण सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आपला,
गणेश चिंतावार
पुणे
********

*श्री सुरेन्द्र व सौ.श्रध्दा सिध्दावार*

कै. श्री. केशवराव जी. सिद्धावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ , आनंदाश्रमाच्या या सेवाभावी उपक्रमात आमच्या परीने छोटासा वाटा उचलण्याची संधी मिळावी, अशी मनापासून इच्छा आहे.

आनंदाश्रमाच्या गरजेनुसार आवश्यक वस्तू Spanday Industries मार्फत पुरवण्याचा आमचा मानस आहे. आमच्या सर्वात कमी कोटेशननुसार, ₹51,000 पर्यंतच्या किमतीचे साहित्य देण्याचे आम्ही ठरवले आहे.

यामध्ये पडदे, ब्लाइंड्स, मॅट्रेस/बेडिंग तसेच इतर आवश्यक फर्निशिंग साहित्याचा समावेश असेल.

कै. केशवरावजींच्या स्मृती जपत, या सुंदर सेवाकार्यात आमच्या परीने थोडासा हातभार लावता येत आहे, याचे आम्हाला मनापासून समाधान आहे. 🙏🌷

— *सुरेंद्र आणि श्रद्धा सिद्धावार*. ‌‌. आर्य वैश्य जेष्ठ नागरिक मंडळाकडून *श्री सुरेन्द्र व सौ श्रध्दा सिध्दावार* या तरुण दाम्पत्याच्या आनंदाश्रम प्रकल्पाबद्दल प्रकट केलेल्या भावना समस्त कार्यकारिणी सदस्यांकरिता ‌कौतुकाचे बोल‌ आहेत. आनंदाश्रम ला रु.51000/- ची आवश्यकतेनुसार वस्तु रुपाने देणगी देण्याचा मानस मंडळाला स्विकारार्य आहे.लवकरच याबाबत आपणांस कळविण्यात येईल. उभयतांचे मनःपूर्वक आभार.

*आर्य वैश्य जेष्ठ नागरिक मंडळाची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा*. वृत्तांत. (कार्यालयीन सचिव श्री सुधाकरराव वीरमलवार) 🎈आर्...
03/10/2026

*आर्य वैश्य जेष्ठ नागरिक मंडळाची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा*. वृत्तांत.
(कार्यालयीन सचिव श्री सुधाकरराव वीरमलवार)
🎈आर्य वैश्य जेष्ठ नागरिक मंडळाची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवार दि.03.10.2026, ला *आनंदाश्रम* टाकळघाट 10.30 वाजता येथे संपन्न झाली.

🎈सभेचे प्रमुख पाहुणे आर्य वैश्य समाज दिग्रस‌चे अध्यक्ष *श्री सचिन भाऊ बनगिनवार* होते.
🎈याच कार्यक्रमात आर्य वैश्य महासभा बीड द्वारे *महाराष्ट्र समाज भुषण पुरस्कार 2026* ने गौरविण्यात आलेले‌ मंडळाचे माजी उपाध्यक्ष व वर्तमान कार्यकारिणी सदस्य *प्रा.श्री भाऊराव जी बिरेवार* यांचा मंडळाद्वारे सत्कार व अभिनंदन सोहळा आयोजित केला होता. सभेची सुरुवात मंडळाच्या सदस्या *सौ.मनीषा ताटपल्लीवार* यांच्या सुंदर संचलनाने झाली. ‌🎈माता कन्यका परमेश्वरी चे स्तवन , मंडळाचे ध्येय गीत नंतर *सौ.अर्चना विरमलवार* यांनी गायलेल्या सरस्वती वंदना सोबतच मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व माता कन्यका परमेश्वरी ला माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे *श्री सचिन बनगिनवार* यांचा परिचय व शाल श्रीफळ तसेच माता कन्यका परमेश्वरी चा फोटो देऊन स्वागत करण्यात आले.
🎈 *प्रा.श्री भाऊराव जी बिरेवार* यांना शाल ,श्रीफळ ,मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
🎈दिवंगत सदस्यांना 2 मिनिटाचे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . 🎈सहसचिव यांनी *श्री दिलीप रेगुंडवार* यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून सभागृहाची मंजुरी घेतली. 🎈आर्थिक वर्ष 2025-26 चा मुख्य सचिवांचा अहवाल प्रभारी मुख्य सचिव *श्री किशोर बिरेवार* यांनी वाचून दाखविला.
🎈31‌ मार्च2026 ला संपलेल्या आर्थिक वर्षांचे अंकेक्षीत नफा तोटा पत्रक व ताळेबंदाचे वाचन तसेच वर्ष 2026-27 च्या अंदाज पत्रकाचे वाचन कोषाध्यक्ष *श्री अरुण कोंतमवार* यांनी केले व सभागृहाची मंजुरी मिळविली.
🎈उपस्थित सदस्यांना आनंदाश्रम प्रकल्पाची अद्ययावत माहिती मंडळाचे उपाध्यक्ष *श्री प्रकाश उपगन्लावार* यांनी दिली. मंडळाचे अध्यक्ष *श्री सुरेश भाऊ तन्नीरवार* यांनी अध्यक्षीय भाषण केले. 🎈मंडळाच्या महिला उपाध्यक्ष *सौ.संध्याताई उत्तरवार* यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता *सौ मनीषा आईंचवार* हिच्या पसायदानाने झाली.
🎈कार्यक्रमाला आर्य वैश्य समाज युवक सभा चे अध्यक्ष श्री लक्ष्मणराव उपगन्लावार, महाराष्ट्र आर्य‌‌‌ वैश्य समाज नागपूर च्या महिला उपाध्यक्ष सौ.स्नेहल गौरशेट्टीवार व सदस्या सौ.श्रध्दा सिध्दावार यांची उपस्थिती होती. 🎈या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सचिन भाऊ बनगिनवार यांनी आपले वडील स्व.लक्ष्मणराव बनगिनवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ रु.111111/- देणगी चा चेक मंडळाला सोपविला व यानंतर हि देणगी देण्याचा मनोदय व्यक्त केला.
🎈आनंदाश्रमला पुणे येथील व्यवसायी श्री गणेश चिंतावार यांनी रु.25000/- ची देणगी पाठविली. यापूर्वी पण त्यांच्या कडून आनंदाश्रमला रु.51000/- प्राप्त झाली. मंडळाचे सल्लागार सदस्य श्री अनिल भाऊ राजकोंडावार यांनी रु.18000/- ची देणगी देऊन रु.101000/- देणगी चा संकल्प पूर्ण केला. पुणे निवासी श्री विलास तन्नीरवार यांनी रु.18000/- ची देणगी देऊन आपला रु51000/- देणगी चा संकल्प पूर्ण केला. डॉक्टर सुधीर मामीडवार यांनी रु.26000/-ची देणगी देऊन आपला रु.51000/- चार संकल्प पूर्ण केला. श्री.राजेश विरमलवार यांनी यापूर्वी रु.51000/- ची देणगी दिली होती ती वाढवून रु.251000/- देणगी चा संकल्प जाहीर केला. डॉक्टर श्री अशोक गुंडावार यांनी रु.30000/- ची देणगी देऊन रु.51000/- चा संकल्प पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला. श्री अशोक जगशेट्टीवार यांनी आनंदयात्री करिता आनंदाश्रमात झुल्याची सोय करून देण्याची घोषणा केली.

01/10/2026

🌺निमंत्रण 🌺
सर्व सन्माननीय सभासद व देणगीदारांना कळविण्यात येते की, आर्य वैश्य जेष्ठ नागरिक मंडळा ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 3/10/26 ला सकाळी 10.30 वाजता आनंदाश्रम चे सभागृहात होत आहेत सभेचे रीतसर निमंत्रण आपणास पाठविलेले आहेच परंतु पोस्टाच्या दिरंगाईमुळे किंवा चुकीच्या पत्त्यामुळे न मिळाल्यास आपण वरील निमंत्रण समजून अवश्य येण्याचे करावे ही विनंती.
🙏🙏🙏

किशोर बीरेवार , प्रभारी मुख्य सचिव.

🌷मनःपूर्वक आभार.🌷आज आनंदाश्रम येथे *कन्यका कपल बी सी  ग्रुपच्या 15 सदस्यांनी सपत्नीक भेट दिली*.  त्यांच्या व्यवस्थेसाठी ...
27/09/2026

🌷मनःपूर्वक आभार.🌷

आज आनंदाश्रम येथे *कन्यका कपल बी सी ग्रुपच्या 15 सदस्यांनी सपत्नीक भेट दिली*. त्यांच्या व्यवस्थेसाठी *श्री दिलीप रेगुंडवार व विजय मारावार हे होते* आणि सोबतच भीसी ग्रुप मध्ये किशोर बिरेवार असल्याने त्यांनी सर्वांना आवाहन केले की आनंदाश्रला काही गिझर आणि काही टीव्ही ची आवश्यकता आहे, तेव्हा त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन *श्री व सौ रवींद्र कांडूरवार* यांनी एक गिझर *श्री व सौ किशोर वरगंटीवार* यांनी प्रत्येकी एक गिझर आनंदाश्रमला भेटी दाखल दिला.
आर्य वैश्य जेष्ठ नागरिक मंडळाकडून भेट वस्तू बद्दल कांडुरवार व वरगंटीवार परिवाराचे मनःपूर्वक आभार.

*स्व. रमेश मारोतराव भास्करवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*ही खूप दुखद घटना आहे की रमेश भाऊ आपनातून निघून गेले. खूप हुशार...
25/09/2026

*स्व. रमेश मारोतराव भास्करवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*

ही खूप दुखद घटना आहे की रमेश भाऊ आपनातून निघून गेले. खूप हुशार, संयमी, नेहमीच माणुसकीने वागणारे, मदतीला धावून जाणारे शांत स्वभावाचे ,आनंदाश्रम प्रकल्पात हिरीरीने भाग घेणारे, आपना सर्वांचे मार्गदर्शक माननीय श्री रमेश भाऊ आपणात नाही ही कल्पना पण सहन होत नाही. मी त्यांना एक, दोन महिन्यांनी फोन करायचो परंतु तीन दिवसांपुर्वी केलेला फोन त्यांनी उचलला नाही. त्यांचा व माझा संबंध आनंदाश्रम प्रकल्पामुळेच. प्रकल्पाचे मार्गदर्शक होण्याची विनंती त्यांनी मान्य केली व ते आमच्याशी जुळल्या गेलेत व खूप प्रामाणिकपणे त्यांनी कार्य केलेत. खूप आदराने ते बोलायचे. आज रमेश भाऊ आपनात नाही परंतू त्यांनी केलेले कार्य त्यांची आत्मीयता, प्रेमळ स्वभाव, सर्वाना सामावून घेण्याची वृत्ती आर्य वैश जेष्ठ नागरिक मंडळ कधीही विसरू शकत नाही.
परमात्मा त्यांचा आत्म्याला शांती प्रदान करो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
( प्रकाश उपगंलावार)
🙏🙏🙏

*भावपूर्ण श्रद्धांजली*

*स्व. रमेश मारोतराव भास्करवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*

रमेश मारोतराव भास्करवार हे मूळचे वरूड येथील. घरातील भावंडांमध्ये ज्येष्ठ असल्यामुळे लहानपणापासूनच कुटुंबातील लहान भाऊ-बहिणींची काळजी घेणे, त्यांना आधार देणे आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणे ही जबाबदारी त्यांनी मनापासून स्वीकारली. कुटुंबासाठी असलेली त्यांची ही जबाबदारी केवळ कर्तव्यापुरती मर्यादित नव्हती, तर त्यामागे प्रेम, आपुलकी आणि मोठ्या भावाची मायेची भावना होती.
शासकीय सेवेत त्यांनी आयकर निरीक्षक, आयकर अधिकारी आणि पुढे आयकर आयुक्त अशी प्रदीर्घ आणि गौरवास्पद कारकीर्द केली. मात्र मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही त्यांच्या स्वभावातील साधेपणा, शांतपणा आणि माणुसकी कधीच कमी झाली नाही.
रमेश भाऊ यवतमाळ येथे आयकर अधिकारी असताना त्यांनी अनेकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत केली. माझ्या स्वतःच्या आयुष्यातील एक प्रसंग मला आजही आठवतो. एका व्यक्तीचे काम घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. ते काम सहजासहजी आणि लवकर होण्यासारखे नव्हते; परंतु रमेश भाऊंनी अत्यंत आनंदाने आणि आपलेपणाने ते काम करून दिले. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने या कामाचे श्रेय मलाच दिले. प्रत्यक्षात माझी भूमिका फक्त त्या व्यक्तीला रमेश भाऊंकडे घेऊन जाण्यापुरतीच होती. खरे श्रेय रमेश भाऊंच्या मदतीचे होते. मात्र त्यांनी कधीही या गोष्टीचा गाजावाजा केला नाही.
नंतर त्यांची बदली नागपूरला झाली आणि पुढे मुलं पुण्यात असल्यामुळे ते पुण्याला स्थायिक झाले. यवतमाळशी मात्र त्यांचे नाते कायम राहिले. यवतमाळ येथे पूर्वी झालेल्या समाजाच्या मेळाव्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
मागील वर्षी यवतमाळ येथे झालेल्या भास्करवार परिवाराच्या गेट-टुगेदरच्या वेळी माझी त्यांच्याशी पुन्हा भेट झाली. त्या वेळी मी तयार केलेल्या भास्करवार परिवाराच्या वंशावळीचे त्यांनी मनापासून कौतुक केले आणि त्या वंशावळीची एक प्रतही माझ्याकडून मागून घेतली. त्यांच्या त्या कौतुकात केवळ औपचारिकता नव्हती; आपल्या परिवाराच्या इतिहासाबद्दल आणि नात्यांबद्दल असलेली त्यांची आत्मीयता त्यातून जाणवत होती.
रमेश भाऊंचे एक वैशिष्ट्य मला नेहमी जाणवायचे—ते स्वतःहून कोणालाही मदत करण्यास सदैव तयार असायचे. आयकर खात्यातील त्यांच्या मोठ्या पदाचा फायदा कळत-नकळत अनेक नातेवाईक, मित्र आणि परिचितांना झाला. आम्हीही अनेक वेळा कोणत्याही कार्यालयीन कामासाठी गेलो असता, त्यांच्या नावामुळे किंवा त्यांच्या पदाच्या ओळखीमुळे कामाला सहजता मिळायची.
माझ्या मुलासोबत घडलेला एक प्रसंग तर आजही आठवतो. पुण्यात वाहतूक पोलिसांनी त्याला वाहन चालविताना अडविले होते. काही कारणाने त्याचा संबंधित अधिकाऱ्याशी वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने रमेश भाऊंना फोन लावला. ‘आयुक्तांचा फोन आहे’ असे लक्षात येताच त्या अधिकाऱ्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि माझ्या मुलाला सोडून दिले. अशा प्रकारे त्यांच्या पदाचा फायदा अनेकांनी घेतला असेल.
परंतु विशेष गोष्ट अशी की, या सगळ्या गोष्टींचा कदाचित रमेश भाऊंना पूर्णपणे अंदाजही नसेल. कुणी त्यांना सांगितले असेल किंवा नसेल; पण त्यांनी कधीही कोणावर रागावून ‘माझ्या नावाचा गैरवापर करू नका’ असे म्हटले नाही. उलट त्यांचा साधा विचार होता—
“माझ्या नावामुळे जर कोणाचे एखादे चांगले काम होत असेल, कोणाला मदत मिळत असेल, तर त्यांनी ती करून घ्यावी.”
या एका विचारातूनच त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.
मोठे पद, अधिकार आणि प्रतिष्ठा असूनही मनाने मात्र ते अत्यंत प्रेमळ, शांत, संयमी, मितभाषी आणि मदतीला धावून जाणारे होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी श्रीमंती त्यांच्या पदात नव्हती, तर त्यांनी जपलेल्या माणुसकीत होती.
आज रमेश भाऊ आपल्यात नाहीत, ही जाणीव मनाला चटका लावून जाते. काही माणसे आपल्या आयुष्यात फार मोठा गाजावाजा न करता येतात; पण त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या आठवणींची उणीव मात्र प्रकर्षाने जाणवते. रमेश भाऊ हे त्यापैकीच एक होते.
भास्करवार परिवारातील एक ज्येष्ठ, प्रेमळ आणि आधार देणारी व्यक्ती आज आपल्यातून निघून गेली आहे. त्यांच्या जाण्याने परिवाराचीच नव्हे, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या असंख्य माणसांचीही मोठी हानी झाली आहे.
त्यांच्या प्रेमळ आठवणी सदैव आमच्या मनात जिवंत राहतील.
परमेश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती, सद्गती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

*भावपूर्ण श्रद्धांजली!*

*राम भास्करवार*
*यवतमाळ.*
दि.24/09/2026

24/09/2026
*प्रा.श्री दत्तात्रय बाबुराव चिंतावार* रा मुल यांच्या कडून आनंदाश्रमला रु.25000/-ची देणगी जेष्ठ कार्यकारिणी सदस्य *श्री ...
10/09/2026

*प्रा.श्री दत्तात्रय बाबुराव चिंतावार* रा मुल यांच्या कडून आनंदाश्रमला रु.25000/-ची देणगी जेष्ठ कार्यकारिणी सदस्य *श्री दिवाकरराव सिध्दमसेट्टीवार* यांच्या मार्फत प्राप्त झाली. यापूर्वी पण त्यांच्या कडून आनंदाश्रमला रु.43000/- ची देणगी प्राप्त झाली आहे. आर्य वैश्य जेष्ठ नागरिक मंडळाकडून देणगी बद्दल प्रा.दत्तात्रय चिंतावार यांचे मनःपूर्वक आभार.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🌷🌷सौ.अश्विनी काणे , संगीत शिक्षिका, यांच्या विद्यार्थीनींनी गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम आनंदाश्रमात साजरा केला. 🌷🌷या कार्यक...
31/08/2026

🌷🌷सौ.अश्विनी काणे , संगीत शिक्षिका, यांच्या विद्यार्थीनींनी गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम आनंदाश्रमात साजरा केला. 🌷🌷
या कार्यक्रमाला सौ.कल्पनाताई कुणावार ,सौ.अल्काताई पाम्पट्टीवार, श्रीमती ज्योती ताई गुंडावार ,सौ.शोभाताई कोंतमवार, श्रीमती वैशाली ताई गंधेवार ,सौ.ज्योती ताई उपगन्लावार या समाज भगिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी आनंदाश्रमची निवड केल्या बद्दल उपस्थित समस्त भगिनींना धन्यवाद. वरुण राजानी याप्रसंगी उपस्थिती लावल्यामुळे कार्यक्रमाला मजा आली अशी प्रतिक्रिया भगिनींनी व्यक्त केली.

गुरु पुजन करताना संगीत उपासक भगिनी. गुरु शिष्य परंपरेचा उत्कृष्ट परिचय भगिनीं द्वारे देण्यात आला. कौतुकास्पद कार्यक्रम.

सगळ्यांनी लावलेल्या उपस्थिती मुळेच ही ट्रिप छान झाली …
आणि आनंदाश्रमात मिळालेली मायेची ऊब , जेवण , व मुख्य म्हणजे सगळ्यांचं केलेलं आवभगत , गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सगळच माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होत
खुप मस्त झाली ट्रीप. आनंदाश्रम खुप छान ,जेवण 1 नंबर.
पावसामुळे खूप मजा आली. *सौ.अलकाताई पाम्पट्टीवार* यांच्या शब्दांत.

Address

Khanolibara Road, Takalghat
Nagpur
441122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आनंदाश्रम AVJNM नागपुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आनंदाश्रम AVJNM नागपुर:

Shortcuts

Share