27/11/2023
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ ला विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्र (वाचनालय) येथे ७४वें संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित मुख्य अतिथी डॉ. चंद्रशेखर पाटील सर विभाग प्रमुख, इतिहास विभाग ( डॉ. मधुकरराव वासनिक पी. डब्ल्यू. एस. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कामठी रोड, नागपूर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. नागसेन लांडगे सर, विभाग प्रमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग (डॉ. मधुकरराव वासनिक पी.डब्ल्यू.एस.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कामठी रोड, नागपूर) प्रा. बालू वणकर सर अर्थशास्त्र विभाग (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. लखन इंगळे सर ( अध्यक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना नागपूर )आणि वाचनालयातील समस्त विद्यार्थीगण उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा प्रविण धांडे( उपाध्यक्ष) प्रास्ताविक वाचन कु. साक्षी बोरघाटे (सह- सचिव), कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आतिश चौधरी ( सह-को षाध्यक्ष) तथा कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. करूणा सावतवान ( प्रवक्ता) यांनी केले.