Tejaswini Bahuddeshiya Sevabhavi Vikas Sanstha

Tejaswini Bahuddeshiya Sevabhavi Vikas Sanstha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tejaswini Bahuddeshiya Sevabhavi Vikas Sanstha, Non-Governmental Organization (NGO), Shrikrushna Nagar, Opposite Babde Hall, Hingna Road, Wanadonagri, Nagpur.

शुक्रवार या दिवशी वानाडोंगरी शिवनगर येथे श्रीसाई स्वयं साहा. म‌हीला बचत गटाने वटपोर्णिमेचे  औचित्य साधून वडाचे झाडाचे  व...
27/06/2024

शुक्रवार या दिवशी वानाडोंगरी शिवनगर येथे श्रीसाई स्वयं साहा. म‌हीला बचत गटाने वटपोर्णिमेचे औचित्य साधून वडाचे झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच औषधी गुणधर्म असलेली बेलाचे झाड लावण्यात आले. तेजस्विनी बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली केळकर मॅडम यांचे स्वागत गटाच्या सचिव सौ. कविता मरसकोल्हे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. संस्थेच्या सचिव सौ.वर्षा रोकडे मॅडम यांचे स्वागत गटाच्या अध्यक्षा सौ दिपीका लेवस्कर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तेजस्विनी बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्थेचे कर्मचारी यांचे स्वागत गटातील सदस्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.वृक्षारोपणाचा कार्यक्रम
तेजस्विनी बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्थेच्या अध्यक्षा वैशाली केळकर मॅडम यांचे हस्ते वडाचे झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. यांनी वडाचे झाडाचे महत्व आणि झाडे लावा झाडे जगवा.असा महत्वाचा संदेश दिला.संस्थेच्या सचिव सौ वर्षा रोकडे मॅडम यांनी गटाचे फायदे व व्यवसाय तसेच समुपदेशन यावर महिलांसोबत हितगुज केलं.शेवटी कार्यक्रमा नंतर चहा नाश्ता देऊन कार्यक्रमाचि सांगता करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री साई महिला बचत गट, वैदही महिला बचत गट आणि ओवी महिला बचत गट यांनी विशेष सहकार्य केले.
ओवी बचत गटाच्या अध्यक्षा सौ. किरण मिरापुरे यांनी सर्वांचे आभार मानले.
धन्यवाद

दि. 21.06.2024 रोजी मैत्रेय बौध्दविहार, श्रीराम नगर, वानाडोंगरी येथे  तेजस्विनी बहु उद्देशीय सेवाभावी विकास संस्था मार्फ...
27/06/2024

दि. 21.06.2024 रोजी मैत्रेय बौध्दविहार, श्रीराम नगर, वानाडोंगरी येथे तेजस्विनी बहु उद्देशीय सेवाभावी विकास संस्था मार्फत जागतिक योग दिवस शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिरामध्ये तेजस्विनी संस्थेच्या सचिव सौ. वर्षा रोकडे तसेच संस्थेच्या क्षेत्र समन्वयक माधुरी कळस्कर , संगीता ठाकरे, दीपा धामणकर उपस्थित होत्या.तसेच जागतिक योग दिवसा विषयी योगाची प्रात्यक्षिक छकुली गटातील सौ. नंदिनी वानखेडे यांनी घेतली.
प्रथम तेजस्विनी संस्थेच्या सचिव सौ. वर्षा रोकडे यांनी महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून वंदन कऱण्यात आले व नंतर योगा शिबिरास सुरूवात जागतिक दिवसा बद्दल माहिती देण्यात आली.
जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याच्या फायद्याची जाणीव करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. 21 जून हा वर्षात सर्वात मोठा दिवस मानला जातो. ज्याला उन्हाळी संक्रांती असे म्हटले जाते. शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळेच गेल्या दशकभरापासून दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.
त्यानंतर सौ.नंदिनी वानखेडे यांनी योगा शिकवण्यास सुरूवात केली, अशा प्रकारे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला यामध्ये श्रुती, छकुली, जुही, जानव्ही इ. बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

Tejaswini Bahuddeshiya Sevabhavi Vikas Sanstha organized "Sanman "Ti" cha " program and Cultural program on 16th Feb, 20...
20/02/2024

Tejaswini Bahuddeshiya Sevabhavi Vikas Sanstha organized "Sanman "Ti" cha " program and Cultural program on 16th Feb, 2024 at Anil Palkar Sabhagruh for the SHG and JLG members.

दिनांक 03.01.2024 रोजी तेजस्विनी बहुद्देशीय सेवाभावी विकास संस्थाच्या कार्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंत...
04/01/2024

दिनांक 03.01.2024 रोजी तेजस्विनी बहुद्देशीय सेवाभावी विकास संस्थाच्या कार्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी यावेळी संस्थेच्या अध्यक्ष वैशाली केळकर, संस्था सचिव वर्षा रोकडे, मुख्य अधिकारी मंगेश बोंदरे आणि संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दिनांक 01.01.2024 रोजी तेजस्विनी बहुद्देशीय सेवाभावी विकास संस्थाच्या कार्यालयामध्ये संस्थेचा वर्धापन दिनाचा आणि नूतन वर...
04/01/2024

दिनांक 01.01.2024 रोजी तेजस्विनी बहुद्देशीय सेवाभावी विकास संस्थाच्या कार्यालयामध्ये संस्थेचा वर्धापन दिनाचा आणि नूतन वर्षाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष वैशाली केळकर, संस्था सचिव वर्षा रोकडे, मुख्य अधिकारी मंगेश बोंदरे आणि संस्थे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Awareness Program for SHG & JLG women on Banking facilities, technology and schemes....
14/12/2023

Awareness Program for SHG & JLG women on Banking facilities, technology and schemes....

Address

Shrikrushna Nagar, Opposite Babde Hall, Hingna Road, Wanadonagri
Nagpur
441110

Opening Hours

Monday 9:30am - 6am
Tuesday 9:30am - 6am
Wednesday 9:30am - 6am
Thursday 9:30am - 6am
Friday 9:30am - 6am
Saturday 9:30am - 6am

Telephone

+919422331536

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejaswini Bahuddeshiya Sevabhavi Vikas Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Tejaswini Bahuddeshiya Sevabhavi Vikas Sanstha:

Share