Gramayan Pratishthan, Nagpur

Gramayan Pratishthan, Nagpur Platform for all individuals & organizations for Social Change in Vidarbha for Betterment.

07/08/2026
07/08/2026
05/08/2026

*निवृत्त सक्रिय सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती कळवा*
नागपुरातील ज्या व्यक्ती निवृत्तीनंतर काही ना काही सामाजिक काम करतात त्यांच्या कामाचा परिचय एका जाहीर कार्यक्रमात करून घ्यायचा आहे .तरी कृपया अशांनी किंवा अशांची माहिती असलेल्यांनी कृपया त्यांची माहिती ग्रामायणला कळवून सहकार्य करावे,ही विनंती धन्यवाद
राजेंद्र वाडी 9423632230
विलास खनगन
9823157099
मिलिंद गिरिपुंजे
9822942203
जयश्री अलकरी
9822561671

निवृत्त नागरिकांना समाजकार्याची नवी दिशा देणारी कार्यशाळा 16 ऑगस्ट रोजीनागपूर : नोकरी किंवा व्यवसायातून नुकतेच निवृत्त झ...
04/08/2026

निवृत्त नागरिकांना समाजकार्याची नवी दिशा देणारी कार्यशाळा 16 ऑगस्ट रोजी

नागपूर : नोकरी किंवा व्यवसायातून नुकतेच निवृत्त झालेल्या नागरिकांचा अनुभव, ज्ञान आणि कौशल्य समाजाच्या विकासासाठी प्रभावीपणे उपयोगात यावे, या उद्देशाने ग्रामायण प्रतिष्ठान यांच्या वतीने "निवृत्तीनंतर समाजासाठी... एक नवी दिशा" या विषयावरील मार्गदर्शन व परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा रविवार, 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत श्री शिवाजी सभागृह, श्री शिवाजीनगर नागरिक मंडळ, 146, शिवाजीनगर, नागपूर येथे होणार आहे.

कार्यशाळेत समाजकार्याची आजची गरज, निवृत्त नागरिकांची समाजातील भूमिका, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, ग्रामविकास, संस्कार, महिला सक्षमीकरण, युवक विकास, सेवा संस्थांमधील स्वयंसेवेच्या संधी, तसेच आपल्या अनुभवाचा समाजहितासाठी प्रभावी उपयोग कसा करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समाजकार्यात सक्रिय सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या निवृत्त नागरिकांना विविध क्षेत्रांतील कार्याची ओळख करून देत त्यांना प्रत्यक्ष कार्याशी जोडण्याचाही प्रयत्न या कार्यशाळेत केला जाणार आहे.

निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, बँक कर्मचारी, अभियंते, डॉक्टर, उद्योजक, व्यावसायिक तसेच समाजासाठी वेळ देण्याची इच्छा असलेल्या सर्व निवृत्त नागरिकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सहभागासाठी इच्छुकांनी राजेंद्र वाडी (मो. 9423632230), विलास खनगन (मो. 9823157099), विश्वास पंत (मो. 9371124544) किंवा वर्षा देशपांडे (मो. 9422108824) यांच्याशी संपर्क साधावा, असे ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.
गुगल फॉर्म नोंदणीसाठी

https://forms.gle/Z6AqpQw4AwZdgGLr7
03/08/2026

https://forms.gle/Z6AqpQw4AwZdgGLr7

ग्रामायण प्रतिष्ठान आयोजित तिसरे अभ्युदय सेवा प्रदर्शन – २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी हा अर्ज भरावा. कृपया सर्व ...

*तिसरे अभ्युदय सेवा प्रदर्शन नागपुरात २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान* सेवा संस्थांच्या कार्याचा प्रभाव समाजासमोर मांडण्यासाठी ग्र...
03/08/2026

*तिसरे अभ्युदय सेवा प्रदर्शन नागपुरात २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान*

सेवा संस्थांच्या कार्याचा प्रभाव समाजासमोर मांडण्यासाठी ग्रामायण प्रतिष्ठानचा उपक्रम

नागपूर, दि. ___ : ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने चिटणवीस सेंटर व चिटणवीस ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्याने "तिसरे अभ्युदय सेवा प्रदर्शन – २०२६" चे आयोजन २, ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी चिटणवीस सेंटर, ५६, टेंपल रोड, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे करण्यात आले आहे.

अभ्युदय सेवा प्रदर्शन हे वस्तू विक्रीचे प्रदर्शन नसून, महाराष्ट्रातील स्वयंसेवी व सेवाभावी संस्थांना आपल्या कार्याचा सामाजिक प्रभाव (Impact) समाज, उद्योगजगत, CSR कंपन्या, देणगीदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे.

यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या दोन प्रदर्शनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. २०२४ मध्ये ४५ तर २०२५ मध्ये ६१ सेवा संस्थांनी सहभाग नोंदविला. या प्रदर्शनांमुळे अनेक संस्थांना नवीन संपर्क, सहकार्याच्या संधी आणि समाजापर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम उपलब्ध झाले.

यंदाच्या प्रदर्शनात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कृषी व ग्रामीण विकास, बालविकास, दिव्यांग सेवा, ज्येष्ठ नागरिक, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आदी विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक सेवा संस्थांना निःशुल्क स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

प्रदर्शनादरम्यान CSR कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योगसमूह, देणगीदार, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांना सेवा संस्थांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यामुळे संस्थांना भविष्यातील सहकार्य, आर्थिक पाठबळ आणि नेटवर्किंगसाठी नवी दारे खुली होतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.

प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी सन २०२५–२६ चा वार्षिक अहवाल सादर करून Google Form द्वारे नोंदणी करावी. मर्यादित व निवडक संस्थांनाच सहभागाची संधी दिली जाणार आहे.

आयोजकांनी स्पष्ट केले आहे की अभ्युदय सेवा प्रदर्शनात वस्तूंची विक्री करता येणार नाही.

अधिक माहितीसाठी संबंधित विभागनिहाय संपर्क प्रतिनिधींशी संपर्क साधावा किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. गुगल फॉर्म नोंदणीसाठी
https://forms.gle/Z6AqpQw4AwZdgGLr7

*निवृत्ती म्हणजे शेवट नाही... ती आयुष्याला नव्याने अर्थ देण्याची सुरुवात आहे*आपल्या आयुष्यातील ३०-३५ वर्षे आपण कुटुंब, न...
01/08/2026

*निवृत्ती म्हणजे शेवट नाही... ती आयुष्याला नव्याने अर्थ देण्याची सुरुवात आहे*

आपल्या आयुष्यातील ३०-३५ वर्षे आपण कुटुंब, नोकरी, व्यवसाय आणि जबाबदाऱ्यांसाठी दिली. आता स्वतःसाठी, समाजासाठी आणि आपल्या अनुभवाच्या अमूल्य ठेव्याला योग्य दिशा देण्याची वेळ आली आहे.

आज अनेक जण निवृत्तीनंतर एकटेपणा, रिकामेपणा किंवा "आता पुढे काय?" या प्रश्नाशी झुंजत आहेत. पण तुमचा अनुभव, तुमचे ज्ञान आणि तुमचे संस्कार समाजासाठी अमूल्य आहेत. फक्त त्यांना योग्य व्यासपीठ मिळण्याची गरज आहे. हीच गरज ओळखून *ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूरने "दुसरी इनिंग्स – समाजासाठी नव्या प्रवासाची सुरुवात"* ही विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे.
खरं म्हणजे "दुसरी इनिंग्स" ही केवळ कार्यशाळा नाही, तर आयुष्याला नव्याने उमेद, नवे मित्र, नवे ध्येय आणि समाजासाठी जगण्याची नवी प्रेरणा देणारा प्रवास आहे.

🙏 *आपल्या घरातील आई-वडील, काका-काकू, मामा-मामी, शिक्षक, अधिकारी, उद्योजक किंवा ५० ते ६० वयोगटातील कोणतीही व्यक्ती असेल तर त्यांना या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नक्की प्रेरित करा.*
एक दिवस त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो.

*📅 रविवार, १६ ऑगस्ट | 🕑* *दुपारी २.०० ते ४.३०*
📍*श्री शिवाजी सभागृह, नागपूर*

*🙏🏻एक विनंती🙏🏻* हा संदेश फक्त वाचू नका. आपल्या संपर्कातील किमान १० पात्र व्यक्तींना पाठवा. कदाचित तुमच्या एका संदेशामुळे एखाद्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल

*सहभाग नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :*

मिलिंद गिरिपुंजे 9822942203
प्रसाद बर्वे 7276051697
विजय चौबे 8208700249
जयश्री आलकरी 9822561671

*आयोजक : ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर*

50 ते 60 वयोगटातील व्यक्तींसाठी निवृत्ती नंतरच्या सामाजिक जीवनाचे पूर्वनियोजन कार्यशाळा नमस्कार! ग्रामायण प्रतिष...

Address

24, Yogkshem Layout, Snehnagar, Wardha Road
Nagpur
440015

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919225210130

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gramayan Pratishthan, Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gramayan Pratishthan, Nagpur:

Shortcuts

Share