Banae Nagpur

Banae Nagpur To Organise and foster a sense of unity and fraternity amongst the persons of backward classes belong

उत्तर नागपूर - बानाई अभ्यासिका आणि करियर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आणि गुणवंतांचा सत्कार थाटात संपन्न......!📯        ...
29/07/2024

उत्तर नागपूर - बानाई अभ्यासिका आणि करियर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आणि गुणवंतांचा सत्कार थाटात संपन्न......!📯
बानाई पतसंस्था उत्तर नागपूर येथे सूरू केल्यानंतर गरजवंतं विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी अभ्यासिका आणि करियर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याबाबत बानाई कार्यकारिणीने निर्णय घेतला आणि शनिवार दिनांक २७/०७/२०२४ रोजी सर्वायु. अजय पोहेकर, अनुप सांगोडे, ज्योत्स्ना गवई, के.जी. चव्हाण, पुरुषोत्तम पंचभाई, डॉ पूजा नाखले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बानाई नागपूर अध्यक्ष आयु अरिवद गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात पार पडला.

गरजवंतांना अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र अतिशय उपयुक्त ठरेल अशी उपस्थितांची देहबोली सांगून गेली.
या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी - पालकांचा भरघोस प्रतिसाद लाभला . याप्रसंगी आयु. आनंद शाक्य यांनी अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र याबाबत तपशीलवार माहिती विषद करतांना विविध अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्राच्या विविध पैलू प्रकाश टाकला आणि अभ्यासिका परिसर "मोबाईल विरहित " असेल असे ठासून सांगितले. दुसरे मार्गदर्शक आयु. के.जी. चव्हाण यांनी जोतिबा फुले विद्यालयीन आपल्या मुख्याध्यापकी कारकिर्दीतील रंजक किस्स्यांसह मन आणि मेंदूला एखाद्या बाब कार्यान्वित करण्यात कसे बाद्द केले जाऊ शकते. या बाबत कारच्या उदाहरणासह विद्यार्थी व पालकांना अवगत केले. तर गणित हा क्लिष्ट आणि कठीण विषय असल्याचे संचालनकर्त्याचे म्हणणे खोडून काढतं गणित खूपच सोपा विषय असल्याचे विविधांगी बाजूने उपस्थितांना आयु. पुरुषोत्तम पंचभाई अध्यक्ष म.रा. गणित अध्यापक मंडळ यांनी लिलया पटवून दिले. आयु. पूजा नाखले यांनी यथोचित मार्गदर्शन करतांना जपानी भाषा शिकवणी करण्यास तयार असल्याचे नमूद केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बानाई अध्यक्ष अरविंद गेडाम यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून स्व उदाहरणातुन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
या प्रसंगी अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल बानाई सदस्य आयु. राजू भिवगडे यांचा सत्कार बानाई नागपूर सदस्य आयु. आनंद शाक्य यांच्या हस्ते करण्यात आला. निर्मिश आनंद शाक्य‌ या ऍरिझोना स्टेट विद्यापीठ (यू.एस.ए .) येथे प्रथमवर्षी टाॅपर राहिल्या बद्दल आयु. के जी. चव्हाण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
काका तिलोकचंद विद्यालय, निकुंज विद्यालय, एम.बी. हायस्कूल, पी.एम. एस. हायस्कूल, मी. गांधी सेंटि.स्कुल, हरकिशन पब्लिक स्कूल ,बी.जी. श्राॅफ गर्ल्स हायस्कूल शाळेच्या सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पंचशिल स्कार्फ सह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ दि. १५ जुन २०२४ सायं. ५ : ०० व...
17/06/2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ दि. १५ जुन २०२४ सायं. ५ : ०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कॉन्फरन्स हॉल उरुवेला कॉलोनी वर्धा रोड नागपूर येथे पार पडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर रोजी बानाई नागपूर तर्फे अभिवादन
12/12/2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर रोजी बानाई नागपूर तर्फे अभिवादन

09/11/2023

To Organise and foster a sense of unity and fraternity amongst the persons of backward classes belong

दि. 28/10/2023  रोजी, 70 वर्षे व अधिक वयोगटातील जेष्ठ अभियंता बानाई सभासदांचा बानाई नागपूर तर्फे सत्कार करण्यात आला .
07/11/2023

दि. 28/10/2023 रोजी, 70 वर्षे व अधिक वयोगटातील जेष्ठ अभियंता बानाई सभासदांचा बानाई नागपूर तर्फे सत्कार करण्यात आला .

67 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बानाई नागपूर तर्फे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वितरण करण्यात आले. दीक्षाभूम...
01/11/2023

67 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बानाई नागपूर तर्फे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वितरण करण्यात आले. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर स्टॉलचे उदघाटन बानाई चे अध्यक्ष इंजि. अरविंद गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित बानाई चे सचिव जयंत इंगळे व बानाईचे सदस्यगण उपस्थित होते .

08/10/2023
06/10/2023
द्वितीय महायुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका पुस्तक प्रकाशन
06/10/2023

द्वितीय महायुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका पुस्तक प्रकाशन

बानाई नागपूर सर्वसाधारण सभा दि. २४ -०९-२०२३ बानाई नागपूर च्या सर्व साधारण सभेमध्ये ज्या सदस्यांनी या वर्षी वयाची ७५ वर्ष...
26/09/2023

बानाई नागपूर सर्वसाधारण सभा दि. २४ -०९-२०२३ बानाई नागपूर च्या सर्व साधारण सभेमध्ये ज्या सदस्यांनी या वर्षी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेली आहेत त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.
१) इंजी. मधुकर सोनकुसरे स. क्र. १२६ २) इंजी. एन.एस. आठवले स. क्र. १८२ ३) इंजी. बाबुराव बेले स. क्र. २३७ ४) इंजी. टी. एन. आवधरे स. क्र. ३७७ ५) इंजी. डी. एस. सांगोळे, स. क्र. ३८३ ६) इंजी. सुरेश खोब्रागडे, स. क्र. ६८१ ७) इंजी. अरविंद मेश्राम, स. क्र. ८८४,
पदोन्नती प्राप्त अभियंत्यांचा सत्कार
१) स. क्र. 366 इंजी. शैलेष टेंभूणीकर प्रधान मुख्य वन संरक्षक २) स. क्र. ४८१ इंजी. नीलकमल चौधरी,मुख्य अभियंता कोषाध्यक्ष – इंजी. अनुप सांगोळे ३) स. क्र.४६९ इंजी. ललित खोब्रागडे सहाय्यक संचालक नगर रचना ४) स. क्र. ६१६ इंजी. विश्वजित मेश्राम,नगर रचनाकार ५) स. क्र. १२४६ इंजी. सुहास खोब्रागडे, कार्यकारी अभियंता ६) स. क्र. १४५९ इंजी. रवींद्र बोरकर, श्रेष्ठ शिक्षक २०२३

अभियंता पुरस्कार
बानाई दर वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियंता पुरस्कार वितरीत करीत असते, यावर्षी या पुरस्कार करिता स. क्र. ६४४ शिवराज के .खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे. करिता अभियंता पुरस्कार देण्यात येत आहे.

Address

Gajanan Nagar Near Nagpur
Nagpur
440015

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Banae Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share