छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Nagpur
  • छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान

छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान राजर्षी शाहू महाराजांचा विचार जनमानसात रुजवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर  महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ झाली. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने कर्जे दि...
12/03/2024

महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ झाली. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने कर्जे दिली होती. परंतु काहीजणांना त्या कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नव्हते. अशांपैकी काहींनी एस. एम. जोशी यांना विनंती केली की, कर्जाच्या रकमेपैकी निम्मी रक्कम माफ करण्याची विनंती त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना करावी. एस. एम. जोशी यांनी ती गोष्ट यशवंतरावांच्या कानावर घातली तेव्हा यशवंतराव म्हणाले, 'असे कशाला, आपण सर्वच कर्जे माफ करून टाकू.'

सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते, याचा वस्तुपाठच यशवंतरावांनी घालून दिला.

आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन 🙏🏻

#यशवंतरावचव्हाण

साभार Vijay Chormaresir

Address

Nagpur
Nagpur
440025

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share