23/07/2026
बालरंगभूमी परिषद (नागपूर शाखा) व बालकला अकादमी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बालगंधर्व स्मृती प्रित्यर्थ ‘नाट्यगीत गायन स्पर्धा - २०२६’ महिला महाविद्यालय, नंदनवन, नागपूर येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडली! 🌟
विविध शाळांमधील तब्बल ६१ बालकलाकारांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. रवींद्र फडणवीस यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बालरंगभूमी परिषदेच्या कार्याचे कौतुक केले. प्रमुख अतिथी ज्येष्ठ संगीतकार व गायक मा. मोरेश्वर निस्ताने यांनी बालकलावंतांना समाजभान जोपासत कला जपण्याचा मोलाचा सल्ला दिला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वीरेंद्र लाटणकर व प्राची भट - मुळे.हे होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी मा. नरेश गडेकर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद नागपूरच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
🏆 स्पर्धेचे विजेते बालकलावंत 🏆
🎼 गट 'अ'
🥇 प्रथम: ध्रुवी रायटर (ब्रह्मनाद संगीत अकादमी)
🥈 द्वितीय: सानिका करमाळेकर (स्कूल ऑफ स्कॉलर्स, बेलतरोडी)
🥉 तृतीय: वरा सदाचार (सेवासदन सक्षम शाळा)
🎗️ उत्तेजनार्थ: श्रावणी पिसे (संचेती पब्लिक स्कूल) | सावली राऊत (दि साऊथ पॉईंट स्कूल)
🎼 गट 'ब'
🥇 प्रथम: धनश्री खापरे (स्कूल ऑफ स्कॉलर्स, वानाडोंगरी)
🥈 द्वितीय: श्रीराम सदाचार (सेवासदन सक्षम शाळा)
🥉 तृतीय: केसरी लांडे (भवन्स, कोराडी)
🎗️ उत्तेजनार्थ: सौख्खा गडेकर (भारती कृष्ण विद्या विहार) | मानस पाटील (संजुबा हायस्कूल, बहादुरा)
सर्व विजेत्यांचे व सहभागी बालकलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन! 👏💐