Morya Foundation

Morya Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Morya Foundation, Non-Governmental Organization (NGO), Nagpur.

*मोरया फाउंडेशनतर्फे वट सावित्री पौर्णिमानिमित्त ‘सखी उत्सव’ उत्साहात*🌳🌳🌳🎉🎉🎉नागपूर : मोरया फाउंडेशनच्या वतीनेवटसावित्री ...
06/07/2026

*मोरया फाउंडेशनतर्फे वट सावित्री पौर्णिमानिमित्त ‘सखी उत्सव’ उत्साहात*🌳🌳🌳🎉🎉🎉

नागपूर : मोरया फाउंडेशनच्या वतीने
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी विशेष ‘सखी उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम २७ जून रोजी लौंदे ज्वेलर्स, तिरंगा चौक नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. कल्पना पराते व सौ.मनीषा उमरेडकर यांचे स्वागत करण्यात आले. मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका सौ.रजनी अविनाश चौहान यांनी वटसावित्री पौर्णिमेचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व उपस्थित महिलांना सांगितले. तसेच महिलांमध्ये सांस्कृतिक जाणीव जागृत करणे, परंपरांचे जतन करणे आणि परस्पर स्नेहभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मोरया फाउंडेशन तर्फे दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. उत्सवात एक मिनिट गेम्स, म्युझिकल चेअर, उखाणा स्पर्धा तसेच नृत्य सादरीकरण अशा विविध मनोरंजक स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला पारंपरिक भारतीय पेहरावात सहभागी झाल्या होत्या. उत्स्फूर्त सहभाग, आनंदी वातावरण आणि सांस्कृतिक रंगत यामुळे ‘सखी उत्सव’ अविस्मरणीय ठरला.

*शहरी आणि ग्रामीण भागातील गैस सिलिंडर चा वाढता तुटवडा, ग्राहकांना भेडसावणाऱ्या लांबच लांब रांगा**जिल्हा पुरवठा अधिकाऱ्या...
18/04/2026

*शहरी आणि ग्रामीण भागातील गैस सिलिंडर चा वाढता तुटवडा, ग्राहकांना भेडसावणाऱ्या लांबच लांब रांगा*

*जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना शिष्टमंडळांनी दिले निवेदन*

शहरी आणि ग्रामीण भागातील गैस सिलिंडर चा वाढता तुटवडा, ग्राहकांना भेडसावणाऱ्या लांबच लांब रांगा आणि सदोष वितरण प्रणालीची गंभीर दखल घेऊन मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका व सचिव आणि इतर अधिकारी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांची भेट घेऊन निवेदन सादर करून परिस्थितीची माहिती दिली. चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने सर्वसामान्य जनता विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, आणि रोजंदारी कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी सविस्तरपणे मांडल्या. सकाळपासून लांब लांब रांगेत उभे राहणे आणि घरपोच गैस वितरण बंद असणे या सारख्या समस्या वर प्रकाश टाकन्याय आला.गैस ऑपरेटरच्या वितरण प्रणालिवर ऑनलाइन बुकिंग करूनही सिलिंडर उपलब्ध ना होने आणि ऑनलाइन बुकिंग मधे येणाऱ्या अडचणी वर प्रकाश टाकण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री आनंद पडोळे यांनी तत्काळ कारवाई चे निर्देश दिले आणि परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला जाईल असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात ग्राहक न्याय परिषदेचे प्रमुख डॉ विप्लव मजूमदार,श्री संदीप हाडके,श्री मोहन ठाकरे आणि अंकिता नगरारे उपस्थित होते.
👆🏾

Address

Nagpur

Telephone

+919922090582

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Morya Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share