01/09/2026
*आनंद वार्ता*
*बेलदार समाज@ पुणे कडून दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी बासुरी हॉल,हॉटेल श्रीकृष्ण पॅलेस, जुना मुंबई पुणे रोड,पिंपरी, पुणे येथे बेलदार समाजाचा भूजलिया कार्यक्रम आणि स्नेह मिलन कार्यक्रम (वर्ष ११ वे)आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून पुणे स्थित बेलदार समाजातील बहुसंख्य कुटुंब उपस्थित होती.*
*कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री शेषरावजी बमनोटे अमरावती, श्री सुधाकरराव चौरे वर्धा, व श्री नामदेवरावजी बढीये, हिंगणघाट आणि श्री अरुणराव बमनोटे या मान्यवरांची उपस्थिती होती. श्री संत हरिहर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व सोलर दिवे प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कुटुंबीयांचे फुलांची रोपे देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर लहान मुलांचे व महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये विविध नृत्य प्रकार,सोलो परफॉर्मन्स झाले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना व सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग घेतलेल्या मुला मुलींना पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. याच प्रसंगी सोलर बास्केट या सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपनीचे संचालक श्री अक्षय बमनोटे यांना यावर्षीचा उद्यमशीलता पुरस्कार प्राप्त झाल्या निमित्त सुद्धा सत्कार करण्यात आला.*
*या कार्यक्रमासाठी श्रीमती रेखाताई गेटमे सातारा, सौ.शोभाताई गेटमे अहिल्यानगर, श्रीमती श्वेता बमनोटे, श्री व सौ पंकज बढीये, हिंगणघाट, श्री व सौ पंकज देवगडे, सौ. प्रियंका मयूर गेटमे, सौ. जया बडीये (हेडाऊ), श्री शरदराव बढीये, श्री पंकज बढीये व व सौ.डॉक्टर स्वाती बडीये, श्री व सौ.मयूर गेटमे, श्री व सौ.सौरभ चौरे, श्री अशोकराव व सौ. ऋचा पांडे (बाजूळगे), सौ. पुष्पाताई रामभाऊ पांडे नाशिक ,श्री अरुणराव व सौ सुनंदाताई बमनोटे, श्री व सौ गौरव बमनोटे, श्री रोहित बमनोटे श्री तेजस सुरेशराव बमनोटे सौ लताताई सुरेशराव बमनोटे नागपूर श्री सुधाकरराव व सौ प्रभाताई चौरे वर्धा, सौ. वैशाली स्वप्निल चौरे, श्री शेषरावजी व सौ.नंदाताई बमनोटे अमरावती, श्री व सौ तेजस बमनोटे ,श्री राजेश बडिये व सौ प्रियाताई बढीये,श्री अभिजीत गवारले व डॉ.तनुजा गवारले, श्री पराग सराफ व डॉ.कांचन सराफ (गेटमे), श्री व सौ सुरेंद्र बमनोटे, श्री जयंत व शिल्पाताई गेटमे, श्री व सौ मनीष बढीये , श्री जयेश बमनोटे व सौ प्रियंका बमनोटे, श्री अक्षय व सौ सुप्रिया बमनोटे, श्री राजाभाऊ व सौ विद्या बडीये,हे सर्व समाज बांधव* *कुटुंबीयांसमवेत उपस्थित होते*
*त्यानंतर सामाजिक भूजलीयाचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी सर्व उपस्थित यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच तसेच स्नेह भोजनाचा आनंद घेण्यात आला*.
*या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती पंकज बडीये यांनी केले तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन सौ.प्रिया राजेश बढीये आणि श्री. सौ.डॉ.तनुजा अभिजीत गवारले यांनी केले कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री जयेश बमनोटे, सौरभ बढीये व मयुरी बढीये यांनी केले.सदरचा कार्यक्रम बेलदार समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे अत्यंत हर्ष उल्हासात संपन्न झालेला आहे.*
*राजाभाऊ बढीये*
*बेलदार समाज @ पुणे*