बांधिलकी महिला बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था Bandhilki

  • Home
  • India
  • Nagpur
  • बांधिलकी महिला बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था Bandhilki

बांधिलकी महिला बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था Bandhilki प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या विकास करणे

आमच्याबद्दल

सामाजिक जाणिवेच्या भावनेतून सर्वसामान्य, गरजू, गरीब, दिव्यांगांना मदत आणि महिला सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने नागपुरात "बांधिलकी" महिला बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात आली. बांधिलकीच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक गरजू गरीब व्यक्ती, विद्यार्थी यांचा याना मुख्य समाजप्रवाहात आणून त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि बौद्धि

कदृष्ट्या विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.

ग्रामीण महिला व बालकांसाठी ही संस्था काम करते. बालकांवर सुसंस्कार व महिलांचे सबलीकरण करून देशाची भावी पिढी सुसंस्कृत करावी व कुटुंब व्यवस्था मजबूत करावी या विचाराने काही सुविद्य महिला एकत्र आल्या व त्यांनी ही संस्था सुरू केली. माता व बालकांच्या विकासासाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय, अत्याचाराविरुद्ध संघर्ष, अर्थिक स्वावलंबन, रोजगार आणि कौशल्य विकास ही उद्दिष्टे समोर ठेवून संस्थेचे काम सुरू आहे. अल्पावधीतच या संस्थेची ख्याती सर्वत्र पसरली आहे. समाजातील दानशूरांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत ही चळवळ पुढे नेण्यासाठी हातभार लावला आहे. ही प्रगती दिवसेंदिवस सुरू आहे.

संस्थेची बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि काम करण्याची तळमळ यामुळे संस्था झपाट्याने नावारूपाला आली. त्यामुळे अनेक महिलांना आत्मविश्वास आला आहे. या संस्थेमार्फत अनेक उपक्रम चालविले जातात. त्यात शिक्षणावरही भर दिला गेला आहे. मुलांना वाचनाची गोडी लागावी, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी संस्थेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्व समाजघटकांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी आणि त्यांच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, आर्थिक स्वावलंबन व पर्यावरण साक्षरता अशा विषयांसांबधी जागृती व्हावी, म्हणून त्यांचे संघटन करणे, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात. शिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य, कौशल्य विकास, उद्योजकता विकासासाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे घेतली जातात.

Address

Plot No. 302, Maharshi Sankul Apartment, 319/C, Laxmi Nagar
Nagpur
440022

Alerts

Be the first to know and let us send you an email when बांधिलकी महिला बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था Bandhilki posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to बांधिलकी महिला बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था Bandhilki:

Share