Chetan bapat

Directions

Chetan bapat Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chetan bapat, Non-Governmental Organization (NGO), Murum.

10/09/2024

धाराशिव_2.0 फेसबुक पेज आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा 2024
जर वर्षी प्रमाणे धाराशिव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घेऊन आले आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्व महिलांकरिता गौरी गणपती सजावट स्पर्धा. प्रथम द्वितीय आणि त्रितीय क्रमांकावरील स्पर्धकांना भेटवस्तू मिळतील तर सर्व सहभागी महिलांना ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.नियम व अटी- स्पर्धकांनी आपल्या संपूर्ण नावासह गावचे नाव व आपल्या गौरी गणपतीच्या देखाव्याचे फक्त 3 फोटो पाठवावे.
2- ज्यांच्या देखाव्याच्या फोटो ला जास्त लाईक असतील ते स्पर्धक अनुक्रमे प्रथम द्वितीय प्रमाणे विजयी होतील
3- स्पर्धेचा कालावधी हा 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर च्या मध्यरात्री पर्यन्त असेल.
4- विजेते हे dharashiv_2.0 फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर असलेल्या लाईकवर ठरवले जातील.
5- स्पर्धेचा निकाल हा 13 सप्टेंबर ला दुपारी 4 ला पेज वर घोषित होईल.
6- सर्व सहभागी स्पर्धकांना pdf सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल
स्पर्धा
कालावधी
10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर रात्री 12 पर्यन्त

10/09/2024
10/09/2024
09/09/2024

मुख्यमंत्री योजनादूत'च्या माध्यमातून काम
जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराची उत्तम संधी..

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.

या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करण्यासाठी त्यांचे नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री योजनादूत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून आपला अर्ज १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत करावा.

09/09/2024

लेडीज क्लबच्या वतीने गौरी-गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन : हजारोंची बक्षीस जिंकण्यासाठी नक्की सहभागी व्हा!

लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गौरी गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतून धाराशिव जिल्ह्यातील महिलांना आपले कलाविष्कार सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

यावर्षी दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेच शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती आगमनानंतर दि.१० सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होईल. जिल्हाभरात गौरी-गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी-गणपतीसाठी भक्त सूुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो.
महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यामध्ये लेडीज क्लबचा नेहमीच पुढाकार असतो. याच अनुषंगाने लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने या स्पर्धेचे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेतील प्रथम पारितोषक रु.१०,००१ असून दुसरे पारितोषिक रु.७००१ तर तिसरे पारितोषिक रु.५००१ ठेवण्यात आले आहे. दि.११ व १२ सप्टेंबर २०२४ रोजी परीक्षक हे स्वतः येऊन परीक्षण करतील. त्यानंतरच विजेत्यांची नावे जाहीर होतील. संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील महिला या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील. तरी जास्तीत जास्त जणांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृपया खालील नंबर वर संपर्क करावा. श्री.गडकर- ७९७२२३९९२०, श्री.लक्ष्मण माने-८१६९५६६५१७, श्री.अतुल अदमाने- ९४२०४७७८८७, श्री.अविराज खांडेकर -७६६६५८१४५१, श्रीमती सर्जे मॅडम- ८९९९३८५४८६ , सौ.अस्मिता कांबळे - ९९७५२२७७७४, सौ.अर्चना पाटील - ९८२१३३९३९०

#गौरी #गणपती #महिला #स्पर्धा #धाराशिव

06/09/2024

धाराशिवचे सुपुत्र श्री.चेतन सपकाळ यांनी जागतिक डेफ नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत २५ मीटर (रॅपिड फायर पिस्तूल) मध्ये ब्राॅंझ पदकाची कमाई केली या यशाबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन..

२०२४ जर्मनी (हॅनहोअर) येथे सुरू असलेल्या दुसऱ्या जागतिक डेफ नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत चेतनने तिसरे स्थान प्राप्त करून २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मध्ये वैयक्तीक ब्राॅंझ पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतील चेतनचे हे दुसरे पदक आहे.

चेतन हा गेल्या सहा वर्षांपासून पुणे येथील बालेवाडी क्रिडा संकुलमध्ये तर गेल्या वर्षापासून भोपाळ येथील राष्ट्रीय क्रिडा संकुलाच्या रेंज मध्ये सराव करीत आहे.

प्रशिक्षक जयवर्धनसिंह, पी.एन.प्रकाश, कॅप्टन सी.के.चौधरी व आंतरराष्ट्रीय पातळीवरील एन.आर.ए.आय च्या प्रशिक्षक प्रिती शर्मा यांनी चेतनला मार्गदर्शन केले आहे.

चेतनने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून त्यामुळे देशात धाराशिव शहराची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन.

#जर्मनी #डेफ_नेमबाजी_चॅम्पियनशिप

06/09/2024

मुख्यमंत्री वयोश्री योजना : ज्येष्ठांनी आवर्जून लाभ घ्यावा!

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने व उपकरणे खरेदी करिता एकवेळ, एकरकमी ३,००० रुपये रक्कम देण्यात येणार असून या योजनेची अंमलबजावणी अत्यंतिक अग्रक्रमाने करण्याच्या सूचना या योजनेचे जिल्हास्तरीय अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी व सदस्य सचिव असलेल्या समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त यांना दिल्या आहेत..

वय वर्षे ६५ आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जगता यावे, त्यांच्या आरोग्यासंबंधित गोष्टींची व सुविधांची पूर्तता करता यावी याकरिता रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनेद्वारे पात्र व्यक्तींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. या रकमेतून लाभार्थ्यांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टीक, व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खूर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाईकल कॉलर यासारखी उपकरणे खरेदी करता येणार आहेत. तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देऊन त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवले जाणार आहे.

धाराशिव जिल्ह्यात आजवर जवळपास १०,००० अर्ज प्राप्त झाले असून १,५०२ अर्जाची छाननी पूर्ण करून पात्र करण्यात आले आहेत. यापूर्वी योजनेचे अर्ज समाजकल्याण विभागाचे कार्यालय व त्या अंतर्गत येणारे वसतिगृह व शाळा येथे स्वीकारण्याबाबत समाजकल्याण विभागाने कळविले होते. मात्र ज्येष्ठांची होणारी गैरसोय विचारात घेवून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सदर अर्ज गावातच ग्रामपंचायत मध्ये जमा करून पुढे समाजकल्याण विभागाकडे देण्याबाबत केले होते.

त्यानुसार आता गावातच ग्रामपंचायतीमध्ये अर्ज जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेला तर प्राधान्याने योजनेच्या अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वृध्दांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी युवकांनी देखील पुढे येऊन सहकार्य करावे..

वृध्दांसाठी आधार ठरलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल व यासाठी तत्परतेने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महायुती सरकारचे आभार..

#मुख्यमंत्री_वयोश्री_योजना

Address

Murum
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chetan bapat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share